मी एक महत्वाची माहिती तुम्हा सर्व मुंबईकरांना शेअर करत आहे. मला नुकतंच फ्रान्समधील कान्स शहराचे महापौर डेव्हिड लिसनार्ड यांच्याकडून ७९व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुंबईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निमंत्रण मिळालं आहे, खरंच एक सुवर्णसंधी!
परंतु, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय दौरे मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रहित आणि नियमांचे पालन हे वैयक्तिक मान-सन्मानापेक्षा सर्वोच्च असल्यामुळे, मी कान्स दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हे सोपे नव्हते, कारण या प्रवासाशी अनेकांचे कष्ट, कला आणि भावना जोडलेल्या होत्या, पण देशासाठी नेहमी ‘राष्ट्र प्रथम’. रेड कार्पेटवरील क्षण पुन्हा येतील, पण देशाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
जय हिंद 🇮🇳, जय महाराष्ट्र!
#NationFirst #RashtraPratham #ModiJiAppeal #CannesFestival #JaiHind #JaiMaharashtra #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@NitinNabin@AmitShah@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ShelarAshish@MPLodha
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
माहिती बाहेर आणणाऱ्या @ivaibhavk या तरुणाचे आभार!
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!
सरकारने हेक्टरी फक्त ₹ १८,५०० ते ३२,५०० नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही काही ठोस मदत नाही तर शेतकऱ्यांचा अपमान आहे..
सत्ताधारी म्हणत आहेत की आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज दिलंय मग पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी ₹५०,००० मदत का नाही दिली?
आज एक एकरी शेतीचा खर्च ₹३० ते ₹४० हजारापर्यंत जातो, मग ₹ १८,५०० ते ३२,५०० रुपयाच्या थोडक्या मदतीतून शेतकरी सावरणार कसा? हा दिलासा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक आहे..
रब्बी आणि विम्याचं गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, कर्जमाफीच्या घोषणेसारखीच ही फसगत आहे..
कर्जमाफीसाठी ही योग्य वेळ नव्हती का? कर्जमाफीसाठी आणखी किती नुकसान होण्याची गरज होती? कधी येणार योग्य वेळ जेव्हा शेवटचा शेतकरी फाशी लावून घेईल तेव्हा का?
विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच, परीक्षा शुल्क जास्त असतो की शैक्षणिक शुल्क हे ही राज्यकर्त्यांना माहीत नाही का? या शब्दांच्या खेळात मुलांचही भविष्य अडकवलंय..
हे सरकार फक्त फसव्या घोषणांचं आणि आकड्यांचं गाजर दाखवत आहे..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#अतिवृष्टी #ढगफुटी #पाऊस #heavyrain #rainfall #नुकसान #भरपाई #मदत #शेतकरी #farmer