सोनम वांगचुक यांना पाठिंबा परंतु अभिजित दिपकेला पाठिंबा नाही हे नॅरेटिव्ह अन्यायग्रस्त परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यातील अडथळा ठरू शकते.
त्यातच उपोषणस्थळी काहीजणांनी नाच करणे विषयाचे गांभीर्य नष्ट करणारे आहे.
सोनम वांगचुक हे भारतातील एक महत्वाचे विचारवंत व्यक्ती आहेत. सरकार तर्फे त्यांना कुणीच भेटायला जात नाहीत हा निर्दयीपणा आहे. तसेच राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी सोनम वांगचुक यांना भेटायला न जाणे हा असंवेदनशीलपणा भारतीय राजकारणाचा स्तर खालावणारा आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जारी केलेल्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक होत असल्याचा महत्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
#MonsoonSession2026#पावसाळी_अधिवेशन_२०२६
कामावर प्रश्न विचारणाऱ्या जनतेला अपमानित करणे, ही लोकशाहीची भाषा नाही; ती अहंकाराची भाषा आहे.
जनतेने दोन प्रश्न विचारण्याचे धाडस केले, म्हणून त्यांना "कुत्रा" म्हणणे हे सत्तेच्या संस्कारांचे नव्हे, तर सत्तेच्या मदाचे लक्षण आहे.
महसूल मंत्र्यांची घोषणा: "राज्यात शेतीची जमीन खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती 'शेतकरी' असणे बंधनकारक आहे. यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही."
वस्तुस्थिती: शेतजमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतील अशी तरतूद महाराष्ट्र कुळ आणि शेतजमिनी कायदा, १९४८ अन्वये २८/१२/१९४८ पासूनच लागू आहे. त्यात नवीन काही नाही. त्यात नवीन काही नाही. मी नाशिक जिल्हाधिकारी असतांना या तरतुदींचा वापर करून शेतकरी नसतांना हजारो एकर शेतजमीन खरेदी करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रकरण जमिनीचा महाघोटाळा म्हणून देशभर गाजले होते. सामाजिक स्मृती अत्यल्प असते.
--महेश झगडे
स्व. इंदिरा गांधी यांच्या नावाने रात्रंदिवस खडे फोडणाऱ्यांची बोलती या वारकरी बाबांनी एका वाक्यात बंद केली.. पैशाच्या महापुराने सत्ता स्थापन केलेलं धोतरातल्या माणसांना कळत नाही असा सुटा-बुटातल्या राजकारण्यांचा समज झाला असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा…
New Normal
पैसा तिथे भ्रष्टाचार असणारच
त्यात काय?
पुढारपणाबरोबर अनैतिकपण येणारच
त्यात काय?
बाई म्हंटली की बलात्कार होणारच
त्यात काय?
बांधकाम केलं तर ते पडणारच
त्यात काय?
श्रीमंत वर्ग मातणारच
त्यात काय?
सामान्य गरीब मरणारच
त्यात काय?
जात-धर्म, उच्च- नीच भेद राहणारच
त्यात काय?
यंत्रणांचा बट्ट्याबोळ होणारच
त्यात काय?
न्याय नाही मिळणारच
त्यात काय?
शेतकरी नागवला जाणारच
त्यात काय?
सैनिक मारला जाणारच
त्यात काय?
शिक्षक भिकेला लागणारच
त्यात काय?
वैद्यकक्षेत्र नामोहरम होणारच
त्यात काय?
अतिरेकी निर्माण केले जाणारच
त्यात काय?
दरोडेखोरी वाढीला लागणारच
त्यात काय?
जनतेला मूर्ख बनवणारच
त्यात काय?
धर्माची अफू देणारच
त्यात काय?
..........................
सरकार,
सगळं मान्य केलं
तरी तुमची झुंड
मला मा..रा..य..ला
का...
ये..ते..य..
आssssssssssss
- सुजाता देशमुख
२१व्या शतकात बेसिक शिक्षण घेणं हेच मुळी “लक्झरी” होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळांची दुरावस्था यावरचा हा सुन्न करणारा रिपोर्ट नक्की पहा.
शाळा 😔
@shrikantbangale 🙏🏻@bbcnewsmarathi 🙏🏻
@abhijeetskamble 🙏🏻
पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन ‘विकास’ जन्माला आला…. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला…
हे आहे, महाराष्ट्रातील ‘विकासाचं मॉडेल’.