मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
सध्या भारतात चालू असलेले पेपर फुटीचे सत्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा असंतोष आहे.
इथून पुढे कोणतीही MPSC मार्फत होणारी परीक्षा ऑनलाइन स्वरूपातील होऊ नये, अशी तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची विनंती आहे.
@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra#सरळसेवा_परिक्षा#MPSC
MPSC अराजपत्रित गट-ब जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शून्य जागा असणे चिंताजनक आहे.
प्रशासनाने आरक्षणाच्या नियमावलीनुसार पदभरतीचा आढावा घेऊन सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून रिक्त जागांचा समावेश करावा, ही आग्रही मागणी.
#सर्वांना_समान_संधी#Mpsc#GroupBExams#SocialEquity
Congratulations to the U-19 Indian team for lifting the World Cup once again. Our domination in the age group cricket and beyond continues. Well done to the whole squad and the support staff. 👏🇮🇳
आदरणीय मनोज दादा,
स्पर्धा परीक्षा जाहिराती वेळेवर येणं, जाहिरातीमध्ये न्याय्य जागा असणं, परीक्षा वेळेवर होणं, निकाल वेळेत लागणं, वेळेत जॉईनिंग मिळणं अशा आंदोलनांचं मूळ असलेल्या प्रश्नांना हात घाला..
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळं मुलं अभ्यास करणाऱ्या भागातील लोकांनाही नाहक त्रास होतो. नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची दिशा भरकटते, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊन भविष्य पणाला लागतं हाही भाग आहेच.
आपण या मुलांना परत रस्त्यावर यायची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
#mpsc #MPSCआंदोलन #competitive #exams #YOUTH #Students #YouthEmpowerment
MPSC PSI protest in Pune and Chhatrapati Sambhajinagar as aspirants say delay ruined careers
Politicians and activists extended support, with Jarange Patil going a step further by calling and warning the @CMOMaharashtra , “Do not force me to sit for an agitation”
@satejp@RealBacchuKadu@manojjarange@ManojJarangePTL@Mpsc_Andolan@mpsc_office@IYC@RohitPawarOffic
#MPSC #MPSCStudents #MPSCआंदोलन #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSI_परीक्षा #Pune #ProtestNews #Protest #PSIVivad #MPSC2025
https://t.co/pMKZQt9OX2
पुन्हा एकदा MPSC विद्यार्थी आक्रमक पवित्रा उचलण्याच्या भूमिकेत आहेत…
वेळीच या जुलमी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, हीच कळकळीची विनंती!
PSI वयोवाढीबाबतचा निर्णय लांबवून विद्यार्थ्यांचा संयम संपवला जात आहे.
न्याय मागणं जर गुन्हा ठरत असेल, तर हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज दडपता येणार नाही.
हक्कासाठीचा हा लढा अधिक तीव्र होईल, याची जाणीव सरकारने ठेवावी.
⸻
#PSIवयवाढ #MPSC #महाराष्ट्रलोकसेवाआयोग
#विद्यार्थी_न्याय
#StudentsForJustice
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
#StudentRights
#JusticeForStudents
#लोकशाहीवाचवा
#जुलमी_सरकार
#StopPoliceAtrocity
#SaveDemocracy
#YouthForJustice
#MaharashtraCongress
#CongressWithStudents
#हक्कासाठी_लढा
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@RahulGandhi जी
देवेंद्र फडणवीस विचार करा फार अवघड नाही
मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिली आहे ..
फार स्वप्न असतात पोरांची आणि त्याच्या फॅमिलीची
@Dev_Fadnavis 🙏🙏🙏
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
PSI वय वाढ, जागा वाढीचा निर्णय हक्काचा; राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नाही*
शासनाच्या अपयशी नियोजनामुळे पीएसआय परीक्षेची जाहिरात ७ ते ८ महिने उशिरा निघाली. त्यात चूक विद्यार्थ्यांची नाही तर शासनाची आहे. त्यामुळे एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी, यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा लागला. परीक्षाजवळ आली तरीही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. अखेर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यात काही जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. विद्यार्थ्यांचा हा रोष पाहून शासनाला वयोमर्यादा वाढ आणि एकूण जागा वाढ देण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. परंतु, हे सर्व जाणून-बुजून केले जात असल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत आहे. कारण ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांना खिंडीत पकडायचे आणि त्यानंतर दिलासा देणारा निर्णय घेतल्याची घोषणा करायची, मात्र हा बहुजन वर्गातून आलेला तरुण सुजाण आहे. ढोंगी, बनेलपाणा त्याला ओळखता येतो. हाच बहुजन तरुण पालिका निवडणुकीत त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय पक्षाला त्यांची जागा दाखवून देईल.
.
.
#MPSCआंदोलन #MPSC #Exams #combine_जागावाढ #Age
@MPSCommunities@Mpsc_Andolan@IYCMaha
मा. देवेंद्रजी पुण्यात स्पर्धा परीक्षेचे आंदोलन करणारे विद्यार्थी ही महाराष्ट्राची आणि देशाची संपत्ती आहे कृपया या शक्तीला “दिशा” द्या त्यांच्या आयुष्याची” दशा” होऊ देऊ नका.
ही पिढी तुमची सदैव ऋणी राहील 🙏🏻🙏🏻
एक गुन्हा आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो याचे आम्ही एक उदाहरण आहोत.
पण याची खंत नाही .
व्हावा उज्ज्वल “उद्या “तुमचा
यास्तव दिधला आम्ही “आज” आमुचा 🙏🙏
#mpsc #mpscexam #youth #maharashtra #exam
सरकारने तातडीने PSI परीक्षेच्या वयोमर्यादा वाढीचा जीआर काढावा..
सरकारच्या कानाचे पडदे फाटले आहेत काय ?
सरकारला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकु येत नाही काय ?
PSI वय वाढीबाबत तातडीने सरकारने GR काढावा.
विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दडपू शकत नाही... हा आवाज आणखी तीव्र होणार !
काँग्रेस विद्यार्थ्यांच्या सोबत आहे !
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
सरकारकडून वेळेत जाहिरात न काढल्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठीच्या वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर गंभीर अडचण निर्माण झाली आहेत. या अन्यायाविरोधात पुण्यात तीव्र असंतोष व्यक्त होत असून, या संदर्भात मी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून परिक्षार्थींना न्याय देण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूरातही अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करत असून, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी माझा फोनवरून थेट संवाद घडवून आणला. या विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष ठेवून आहेच, शिवाय विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू, असा विश्वास त्यांना दिला आहे.
@mpsc_office
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ मधील वयोमर्यादेच्या अन्यायकारक अटीविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. परीक्षा पद्धतीत अचानक झालेल्या बदलामुळे आणि १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. डॉ. स्नेहाताई सोनकाटे, पुणे शहर युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना देण्यात आला.
#VBAForIndia
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@INCMaharashtra@IYCMaha
"फडणवीस साहेब तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना PSI वयवाढीबाबत सरकार अजूनही मौन बाळगून आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी आहे. मात्र या परीक्षेची जाहिरात तब्बल 7–8 महिने उशिरा निघाली. या विलंबामुळे हजारो पात्र, मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले. ही चूक विद्यार्थ्यांची नाही, ही संपूर्ण चूक शासनाची आहे.
आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून वयवाढीसाठी आंदोलन करत आहेत. हातात पुस्तके असणारे तरुण आज पोस्टर हातात घेऊन न्याय मागत आहेत, ही बाब राज्यासाठी लाजिरवाणी आहे.
देशात आणि राज्यात आधीच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना, शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबातील लाखो मुलं दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा, नियोजनाअभावी झालेल्या विलंबाचा फटका थेट या उमेदवारांनाच बसतो आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील हा संपूर्ण गोंधळ आयोगाच्या आणि सरकारच्या अपयशी नियोजनाचा परिणाम आहे. जाहिरात वेळेत न काढणे, परीक्षा उशिरा घेणे आणि आता वयवाढीवर निर्णय न घेणे या सगळ्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी शासनावरच येते.
तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरकारने तात्काळ PSI वयवाढीचा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@NCPspeaks@supriya_sule
#PSIवयवाढ
#संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन
#तरुणांचा_न्याय
#बेरोजगारी
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
#mpsc
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC