घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई जगदंबेचा आशीर्वाद, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धीचा वास!
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
#घटस्थापना#शारदीयनवरात्रोत्सव#नवरात्रीच्याशुभेच्छा
📍 सांगली
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर मेळावा
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ निमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि सौ. हर्षदा जाधव-देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगलीत आयोजित मेळाव्याप्रसंगी शिक्षक व पदवीधरांशी संवाद साधला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनुदान, माध्यमिक शाळांच्या अडचणी तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांसमोरील प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचे काम प्रा. जयंत आसगावकर यांनी केले आहे. तर सौ. हर्षदा जाधव-देशमुख या संघर्षातून पुढे आलेल्या तरुण आणि जनसामान्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.
शिक्षक-पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि सक्षम प्रतिनिधित्वासाठी ��हाविकास आघाडीची एकजूट निर्णायक ठरेल. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करावे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी माजी मंत्री आ. जयंतराव पाटील साहेब, माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संगीता पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#vishalPatil #sangli
कितीही दडपशाही करा, अत्याचार करा. पण या सर्वांच्या विरुद्ध उभं राहण्याची आमची जिद्द त्याहून अधिक मोठी आहे ! येणाऱ्या काळात ही जिद्द आणखी तीव्र होईल.
@RahulGandhi
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. आपल्या अभिनयाने असंख्य भूमिका जिवंत करणारा आणि आपल्या स्पष्ट विचारांनी समाजमनाला वेळोवेळी जागं करणारा हा अस्सल मराठी माणूस आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही.
नाना केवळ महान कलाकार नव्हते; संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांची उंची मोठी होती. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबे आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेले कार्य बहुमोल होतं.
त्यांचा दमदार आवाज, निर्भीड स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि सर्वसामान्यांच्या दुःखाशी असलेली त्यांची नाळ कायम स्मरणात राहील. एक कलाकार गेला, पण त्याने निर्माण केलेल्या असंख्य आठवणी आणि माणुसकीचा ठसा कायम सोबत राहणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
#भावपूर्ण_श्रद्धांजली #NanaPatekar
कवठेमहांकाळ तालुक्यातील पळशी, घाटनांद्रे, जरंडी, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, वाघोली, शेळकेवाडी, केरेवाडी आणि जाखापूर या गावांना भेट देत ग्रामस्थ व शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी गावकऱ्यांनी मांडल���ल्या प्रश्नांवर संबंधित अधिकारी व विभागांशी समन्वय साधून आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या.
#vishalpatil #sangli #kavthemahankal #गावभेटदौरा
‘वोटचोरी’चे हे आरोप अत्यंत गंभीर असून त्यामागचं सत्य देशासमोर येणं गरजेचं आहे. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
@RahulGandhi#VoteChori#IndianPolitics#SaveDemocracy
देशाचे माज��� पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची साधी, संयमी कार्यशैली सदैव स्मरणात राहील.
#ManmohanSingh #Jayanti
एशियन गेम्स २०२६च्या सुवर्णपदकाच्या लढतीत इराणवर मात करत भारतीय महिला कबड्डी संघाने दिमाखदार कामगिरी केली. मैदानावरील जिद्द, एकजूट, आत्मविश्वास आणि अखेरच्या क्षणापर्यंतची लढण्याची वृत्ती याच्या जोरावर आपल्या महिला खेळाडूंनी भारताच्या तिरंग्याचा मान अभिमानाने उंचावला ज्याला खरंच तोड नाही. या सर्व सुवर्णकन्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या या ऐतिहासिक यशाला खूप साऱ्य��� शुभेच्छा !
#AsianGames2026 #IndianWomensKabaddi #IndianKabaddi #GoldenGirls #GoldMedal
निरोप घेताना डोळ्यांत दाटली आस,
पुढच्या वर्षी लवकर येशील, हीच मनात आस.
चुकले असेल काही तर देवा क्षमा असावी,
तुझी कृपा सदैव आमच्यावर असावी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏
#AnantChaturthi
मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
भारतातील लोकशाही नष्ट होत असताना आम्ही गप्प बसणार नाही. दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. ज्ञानेश कुमार यांनी आपण ज्या पदावर आहोत, त्याचा गांभीर्याने विचार करावा. या वोटचोरी प्रकरणात सरकारी साक्षीदार (Approver) बनून देशहिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलावे.
-लोकसभा विरोधी पक्षनेते @RahulGandhi