रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग क��ले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले!
या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही.
राजकारणा��डे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत.
#रायगड
५६% कमिशन सरकारच्या रस्त्यांची शाळकरी 'Gen Alpha' ने केली पोलखोल!
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? अकोल्यात विद्यार���थ्यांचा उसळला संताप! प्रश्न सरकारला
अकोला जिल्ह्यातील गावातून शाळा पर्यंत असणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था! हे एक उदाहरण आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या अवस्थेचे वास्तव!
या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास अत्यंत खडतर आणि धोकादायक बनला असून, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागत आहे. या परिस्थितीविरुद्ध विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, रस्त्यांची तातडी��े दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे.
मुख्यमंत्री महोदय, या Gen Alpha नी उपस्थित केलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा.
काल बोरगाव येथे माझ्या वाढदिवसानिमित्त प्रतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वृक्षसंवर्धन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी नवविवाहित दांपत्याच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आणि निसर्ग जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आल���.
वाढदिवसाचा आनंद उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करता आला, याचा मनस्वी आनंद आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#वृक्षारोपण
शिक्षणाची झालेली बिकट अवस्था आणि नीती आयोगाच्या आकडेवारीतून उघड पडलेले वास्तव हे स्पष्ट दर्शवते की मोदी सरकार शाळा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अजिबात गंभीर नाही. जातपात, धर्म, द्वेष आणि अंधभक्ती यांच्या जोरावर आपली राजकीय भाकरी भाजून घेणाऱ्या या सरकारला जनतेच्या खऱ्या समस्या कळणार कधी?
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झाड कोसळून एका ११ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका वृद्धाला जीव गमवावा लागला. तुंबलेल्या नाल्यांनी महापालिकेच्या 'नालेसफाई'च्या दाव्याची पोलखोल केली. महानगरपालिकेच्य��� नाकर्तेपणामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे.
या गंभीर घटनांवर आत्मचिंतन करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी मुंबई महानगरपालिका प्रशासन महापौरांच्या स���खसोयी, थाटमाट आणि आलिशान जीवनशैलीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. जनता 'खड्ड्यात' गेली तरी चालेल, पण सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या महापौरांचा थाट किंचितही कमी होता कामा नये ही प्रशासनाची मानसिकता मुंबईकरांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.
आज चेन्नई येथील डॅनफॉस कंपनीला भेट देण्याची संधी मिळाली.
डॅनफॉस ही हवामान ब��लाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, ऊर्जेची बचत, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कार्यरत असलेली जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित भविष्याच्या दिशेने डॅनफॉस करत असलेले काम प्रत्यक्ष पाहण्याचा हा प्रेरणादायी अनुभव ठरला.
#danfoss #chennai
कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रामार्फत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सेवानिवृत्त कामगारांच्या आरोग्याची काळजी अधिक सक्षमपणे घेतली जाणार आहे, अशी ग्वाही आमदार श���री. जयंत पाटील साहेब यांनी दिली.
'कुसुमताई स्मार्ट हेल्थ कार्ड' द्वारे सर्व सेवानिवृत्त कामगारांना सवलतीच्या दरात विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ मिळणार आहे. या स्मार्ट हेल्थ कार्डच्या माध्यमातून वर्षातून एकदा काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
ज्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे कारखान्याच्या प्रगतीसाठी समर्पित केली, त्यांच्या उत्तम आरोग्याची जब���बदारी घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न राजारामबापू सहकारी साखर कारखाना तर्फे करण्यात येत आहे.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यात सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य कें���्र आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या 'कुसुमताई स्मार्ट हेल्थ कार्ड' चे लोकार्पणही मा. आ.जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
'कुसुमताई स्मार्ट हेल्थ कार्ड' हे आरोग्यसेवा अधिक सुलभ, जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल असून, कर्मचाऱ्यांना विविध आरोग्य सुविधांचा लाभ सहजपणे मिळवून देण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे.
��िशेष म्हणजे, या स्मार्ट हेल्थ कार्डद्वारे कारखान्यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत OPD तपासणी, ECG तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डेंटल चेकअप, वर्षातून एकदा रक्त तपासणी (Blood Test) तसेच X-ray तपासणी अशा विविध आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून, त्यांच्या निरोगी आण�� सुरक्षित आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
#rbssk #स्नेहमेळावा #Healthcare
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रतिभेच्या, जिद्दीच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या लेखणीला समाजपरिवर्तनाचे शस्त्र बनवले. त्यांच्या कथा, कादं��ऱ्या, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांमधून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या वेदनांना शब्द दिले.
"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे," हा त्यांचा विचार आजही प्रत्येक श्रमिकाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देतो.
'फकिरा'सारख्या अजरामर कादंबरीतून त्यांनी अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची मशाल पेटवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, सामाजिक समतेचा लढा असो किंवा श्रमिकांच्या हक्कांचा आवाज, अण्णाभाऊ साठे आयुष्यभर सामान्य माणसाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
वाळवा तालुक्यातील वाटेगावची ही भूमी अण्णाभाऊंमुळे गौरवली गेली आहे आणि आम्हा वाळवेकरांना हा वारसा सदैव अभिमानाने जपायचा आहे.
राजवर्धन, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या लहानपणीच्या अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर उभ्या आहेत. आपले खेळणं, वस्तू शेअर करणं, कधीकधी वाद घालणं, आजीच्या कुशीत विसावणं... हे सगळंच कमाल होतं. ��ज स्वतःच्या कर्तृत्वाने, मेहनतीने आणि जबाबदारीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना तुला पाहून खूप आनंद होतो.
लहानपणापासूनच तुझ्यातील जिद्द, शिकण्याची वृत्ती आणि प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याची सवय आज तुला यशाच्या वाटेवर घेऊन जात आहे. तुझ्या या यशस्वी प्रवासाचा भाऊ म्हणून साक्षीदार होता आले, हा अभिमान आहे.
प्रत्येक प्रसंगात तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा असेन. ❤️
आदरणीय बापूंची आज १०७ वी जयंती..
आजच्या जयंती दिना��िमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाला आणि समाजासाठी केलेल्या अथक कार्याला उजाळा देणारा हा छोटासा व्हिडिओ.
आदरणीय बापूंनी सहकार, शिक्षण, जलसिंचन, शेती आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला. आजही गावागावात वृद्ध लोकं भेटली की, आवर्जून बापूंच्या प्रेमळपणाची आठवण सांगतात. 'बापूं'चा मुलगा ही माझी असलेली ओळख सर्वात जास्त अभिमानाची आहे.
त्यांनी दिलेले संस्कार, समाजसेवेची शिकवण आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी हीच आयुष्याची खरी ��्रेरणा आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन! 💐
#स्वराजारामबापूपाटील #१०७वीजयंती #प्रेरणादायीवारसा #सहकार #समाजसेवा