टिपीकल अंधभक्त लॉजिक नुसार उध्दव ठाकरे घरात बसून राहतात, पक्षाकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांचा पक्ष फुटला, मग शरद पवार, ममता, अरविंद केजरीवाल यांचे पक्ष ते सतत घराबाहेर असतात म्हणून फुटले काय?
असले कोणतेही कारण नाही..
कारण फक्त एकच भाजपला लोकशाहीत अनेक पक्षाचे अस्तित्व नकोय त्याना फक्त एकाधिकारशाही हवीय. भाजपला सत्तेचे विकेंद्रीकरण नकोय, वैविध्यपूर्ण विचारधारा देशात नांदायला नकोय, वैविध्यपूर्ण संस्कृती नकोय. त्याना केवळ त्यांच्या संघाची सनातनी विचारधारा देशावर राज्य करताना हवीय.
अनेक नेते फोडले, पक्ष फोडले, अनेकांवर घोटाळ्याचे आरोप लावले नंतर त्यानाच पक्षात घेतले. ही भाजपची राजकीय संस्कृती आहे. लोक अक्षरशः या भाजपला वैतागून गेले आहेत.
400 पार करू म्हटले, पण याना बहुमताचा आकडा सुद्धा गाठता आला नाही. मग एकेकाळी यांच्या विरोधात असणाऱ्या चंद्राबाबू नायडू, आणि नितीश कुमार यांचा पाठींबा घेऊन सरकार बनवले. खरच जर विचाराचे निष्ठ असते तर अशा लोकांचा पाठींबा घेतला नसता. पण आजघडीला भाजपला कोणतीही विचारधारा नाही. भाजप केवळ एक भांडवली पक्ष झाला आहे. अदानी अंबानी साठी काम करणारा राजकीय पक्ष..
भांडवलदाराचे जे जे हिताचे आहे ते हा पक्ष करतो म्हणुनच याना पक्षात घेताना कोणीही चालतो, स्वतः आरोप केलेला माणुस पक्षात आणून मुख्यमंत्री करण्यापर्यत जातात. आणि यांच्या समर्थकाना विश्वास बसावा म्हणून हे सर्व हिंदुत्वासाठी चाललं आहे सांगतात.. लोक एकदा अंधभक्तीला गेले की त्याना वरून पक्षाने काहीही कारण दिले तरी ते मान्य करतात. अगदी वाईट मधले वाईट काम केले तरी ते हिंदुत्वसाठी महत्वाचे आहे म्हणून त्याची भलामण करतात. ही जी सायकोलॉजिकली भक्तांची फौज केली आहे तिचा वैचारिक पराभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशात विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या नावाच्या आडून भाजप असेच लोकशाहिला पायदळी तुडवत राहणार..
लग्न दोन कुटुंबांचा खाजगी सोहळा आहे..सार्वजनिक नाही..हे मराठा समाजाने डोक्यात घ्या.
वैयक्तिक मी फार स्नेही असतील तरच ते लग्न अटेंड करतो.. अन्यथा नाही.. नंतर चार दोन महिन्यांनी सदिच्छा भेट द्यायची.. आणि सगळ्यांनी तेच करावं तर बदल घडेल..❤️
#BeChange
आपण ना इस्रायलसारखे अमेरिकेच्या काखेत बसू शकतो.. ना चीन सारखे इराणला उघड सहाय्य करू शकतो..ही आपली बौद्धिक आणि आर्थिक कुवत आहे.. आज चीनची २६ ते ३० सालासाठी पंचवार्षिक ब्लु प्रिंट आलीय..महासत्ता व्हायला काय लागतं.? तर शुद्ध हेतू लागतो.. आपला हेतू काय आहे..? इथून सुरवात होऊ शकते..❤️