*राधानगरी-दाजीपूर अभयारण्यातील गावांच्या पर्यटन विकासाला मिळणार गती!*
राधानगरी आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्यातील निसर्गसंपन्न भूमीच्या शाश्वत ��िकासासाठी आणि पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध कामांचा शुभारंभ सोहळा पार पडला. तसेच हसणे येथील निसर्ग पर्यटन केंद्राचे लोकार्पणही करण्यात आले.
सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीतून साकारली जाणारी ही कामे लवकरच पूर्ण होऊन जनतेच्या सेवेत दाखल होतील आणि पर्यटनाला नवी उभारी देतील.
मंजुर झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे -
• हसणे धरण राधानगरी येथे कृत्रिम ��बधब्यांचे बांधकाम करणे. – ३ कोटी
• श्री उगवाईदेवी येथे ३६० अंश डिग्रीमध्ये कोकणकडा दर्शनासाठी विविंग टॉवर बांधकाम करणे. – ८० लाख
• सुरंगी जंगल येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे. – २५ लाख
• दाजीपूर येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे. – २ कोटी
• राधानगरी धरण बॅकवॉटर दाजीपूर येथे कृत्रिम समुद्र किनारा बांधणे – २ कोटी ५० लाख
• ठक्याचावाडा येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे. – २ कोटी २६ लाख
• शिवगड येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे. - १ कोटी ६९ लाख
• शिवगड येथे रेसींगसाठी डर्ट ट्रॅकचे बांधकाम करणे. - २० लाख
• राधानगरी, दाजीपूर ते राऊतवाडी येथील विविध ठिकाणी निविण्यपूर्ण कलाकृती करणे. – १ कोटी
• माळेवाडी धरण परिसरात बोटींगची सुविदा विकसीत करणे व परिसर सुशोभिकरण करणे. - १ कोटी १४ लाख
• दुधगंगा (काळम्मावाडी) धरण परिसरातील गार्डन परिसर सुशोभिकरण करणे. - ७ कोटी
• दाजीपूर येथे साहसी खेळ निर्मिती व परिसर सशोभिकरण करणे. - ४ कोटी ३४ लाख
• दुधगंगा (काळम्मावाडी) धरण परिसरातील निरीक्षण बंगला इमारतीचे नुतनीकरण करणे. – ३ कोटी ७ लाख
• दाजीपूर येथे साहसी खेळ निर्मिती व परिसर सुशोभिकरण करणे.- ४ कोटी ३४ लाख
• दुधगंगा (काळम्मावाडी) धरण परिसरातील निरीक्षण बंगला इमारतीचे नुतनीकरण करणे. – ३ कोटी ७ लाख
• दाजीपूर येथे माहिती व दिशा दर्शक फलक बसविणे . - १५ लाख
प्रस्तावित विकास कामे-
1) ऐतिहासिक हत्तीमहल (राधानगरी) येथील परिसर सुशोभिकरण करणे. – २ कोटी ५२ लाख
2) तोरस्करवाडी (वाकीघोल) धबधबा परिसर सुशोभिकरण करणे. – ७ कोटी
या विकासकामांचा मुख्य उद्देश केवळ पर्यटनाला चालना देण�� नसून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे आहे. ल त्यामुळे जनतेच्या विश्वासावर आणि सहकार्यावर आधारित विकासाचा हा प्रवास असाच अखंडपणे सुरू राहील.
या लोकार्पण सोहळ्यासाठी स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते, अधिकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
🗓️ २७ डिसेंबर २०२५ | 📍राधानगरी, कोल्हापूर
#shivsena #prakashabitkar #wildlifetourism #ecofriendlydevelopment #adventuretourism
राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील श्री.संग्रा��सिंह पाटील- गुडाळकर, सदस्य तालुका आत्मा समिती यांच्या 'राधानगरी तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड' या भात प्रक्रिया उद्योग प्रकल्पाच्या भूम���पूजन कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
हा प्रकल्प केवळ उद्योग नसून, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य बाजारभाव, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आधुनिक शेती प्रक्रियेचा मजबूत पाया घालणारा उपक्रम आहे.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री. जालिंदर पांगीरे, स्मार्टचे नोडल अधिकारी श्री. विजय माईनकर, तहसीलदार मा. अनिता देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, श्री. शिवाजीराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक श्री. चंद्रकांत पाटील, श्री. श्रीधर पोवार, श्री. विलास कलिकते, श्री.अमर पाटील (CS), श्री. विकास पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
२७ डिसेंबर २०२५ | 📍गुडाळ, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #FarmerEmpowerment #agroprocessing #SustainableAgriculture
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर ओलवण पैकी माळे प्रकल���पाच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून प्रकल्पास गळती लागल्याने पाणी साठवण होत नव्हती. ही समस्या लक्षात घेऊन जलसंपदा विभागामार्फत १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदर दुरुस्ती काम पूर्णत्वास गेले आहे.
या प्रकल्पातून दाजीपूर ओलवण ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने बोटिंग सुविधा निर्माण करणे, परिसर सुशोभीकरण करणे, वनविभाग व पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून टेन्ट उभारणी करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची सूचना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. स्मिता माने यांना करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. दिपक शेट्टी, वन परिक्षेत्रपाल श्री. घुणकीकर, उपअभियंता श्री. प्रवीण पारकर, तालुकाप्रमुख श्री. तानाजी चौगले, माजी सरपंच श्री. सुभाष पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. संतोष तायशेटे, युवा नेते श्री. चैतन्य कोरगावकर, श्री. संजय पाटील (भाया), श्री. भगवान पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
२७ डिसेंबर २०२५ | 📍दाजीपूर ओलवण, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #IrrigationProject
#waterforfarmers #WaterResourceManagement
आमचे सहकारी श्री.याकूब दादासो बक्षू, कसबा तारळे, ता.राधानगरी यांचे चिरंजीव श्री.आमन यांच्या विवाह सोहळ्य��स उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
या मंगलप्रसंगी जेष्ठ नेते श्री. उदयसिंह पाटील-कौलवकर (भोगावती साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन), श्री. संजयसिंह पाटील संचालक भोगावती साखर, श्री. अमर पाटील, श्री. दिपक शेट्टी, श्री. समीर मुल्ला, श्री. इमरान शेख, श्री. बादशहा नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२७ डिसेंबर २०२५ |📍राधानगरी, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #weddingceremony #blessings #goodwishes
काल मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भीषण अपघातात चार नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झा���्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या अपघातात जखमी झालेले सर्व नागरिक लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
राज्य सरकारतर्फे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी पाच ला�� रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. सद्यस्थितीवर राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवले असून, अपघातग्रस्त नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत व सेवा तत्परतेने पुरवली जात आहे.
#भावपूर्ण_श्रद्धांजली
राधानगरी तालुक्यातील पिरळ, चौगलेवाडी, कात्रेवाडी, सावर्धन व डुबलवाडी येथील नागरिकांसाठी विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा अत्यंत आनंदात पार पडला. या विकासकामांमुळे गावांमधील मूलभूत सुविधा बळकट होऊन, नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर होणार आहे.
विकास कामे पुढीलुप्रमाणे -
१. ग्रामपंचायत इमारत बांधकाम – २५ लाख
२. चौगलेवाडी अंतर्गत रस्ते करणे �� १५ लाख
३. चौगलेवाडी प्राथमिक शाळा 2 वर्ग खोल्या बांधकाम करणे – २४ लाख
४. कात्रेवाडी स्मशानभूमी बांधकाम करणे – १० लाख
५. कात्रेवाडी शाळा दुरुस्ती – ६ लाख
६. कबड्डी मॅट लोकार्पण (क्रीडा विभाग) – ७ लाख
७. डुबलवाडी रस्ता डांबरीकरण करणे – ६५ लाख
८. गाव पानंद रस्ता तयार करणे – १ कि.मी.
याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, का��्यकर्ते अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ २६ डिसेंबर २०२५ | 📍राधानगरी, कोल्हापूर
#shivsena #prakashabitkar #InfrastructureDevelopment #InclusiveGrowth #publicwelfare
कोल्हापूरमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, युवा सेना पश्मिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते श्री. ऋतुराज क्षीरसागर यांचा आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेली अनेक वर्ष श्री. ऋतुराज सर्वसामान्य जनतेमध्ये राहून सातत्याने काम करत असून जनतेशी त्याची नाळ घट्ट जुळलेली आहे. त्याची विकासाची दृष्टी आणि काम करण्याची तळमळ यामुळे जनतेचा मोठा पाठिंबा मिळतोय. महायुतीच्या एकजुटीवर आणि जनतेच्या पाठिंब्य���वर त्याचा विजय निश्चित आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.ना. राजेश क्षीरसागर, प. महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मा. कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, माताभगिनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेत सहभागी होत दुधाळी येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
🗓️ ३० डिसेंबर २०२५ |📍 कोल्हापूर
@Rajesh9099
#Shivsena #prakashabitkar #ElectionCampaign #YouthLeadership #kolhapur
श्री. राजेंद्र श्रीकांत सु���ार यांच्या लाकूड कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही दुर्दैवी घटना समजता घटनास्थळी भे�� देऊन त्यांना धीर देण्याचे काम केले.
श्री. राजेंद्र सुतार हे तरुण उद्योजक असून, त्यांच्या कष्टावर, स्वप्नांवर आणि रोजगारावर या आगीचा मोठा आघात झाला आहे.
या घटनेतून एक महत्त्वाचा धडा सर्व उद्योजकांनी घ्यायला हवा. प्रत्येक उद्योजकाने आपल्या उद्योगाचा योग्य प्रकारे विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. आग, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य अपघात कोणालाही सांगून येत नाहीत, पण योग्य विमा संरक्षण असल्यास अशा संकटातून पुन्हा उभे राहणे शक्य होते. या कठीण परिस्थितीत आम्ही सर्व श्री. राजेंद्र सुतार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
🗓️ ३० डिसेंबर २०२५ I📍 कासारवाडा
#Shivsena #prakashabitkar #DisasterRecovery #shortcircuit #BusinessSafety
आज प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी व कर��मचारी यांची आढावा बैठक मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय योजनांच्या माध्यमातून विनासायास, मोफत आणि दर्जेदार उपचार मिळालेच पाहिजेत, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या खाजगी व शासकीय रुग्णालयांनी कोणत्याही कारणास्तव रुग्णांना उपचार नाकारू नय��त, अशा सूचना याप्रसंगी केल्या.
सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी शासन जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवत आहे. शासकीय योजना या नियमानुसारच चालविल्या गेल्या पाहिजेत. मात्र रेशन कार्डाची मूळ प्रत उपलब्ध नसणे यासारख्या किरकोळ कारणांमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवले जाऊ नये. अशा परिस्थितीत डिजिटल रेशन कार्ड व्हेरिफिकेशन करून तातडीने उपचारास प्राधान्य देण्यात यावे. रुग्णांना कागदपत्रे व मंजुरी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी रुग्णालयांतील समन्वयकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करायची आहे, या भावनेतून जनआरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्व संबंधितांनी संवेदनशीलतेने काम कराव���, असे देखील यावेळी स्पष्ट केले.
तसेच, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत राज्यभर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून अधिकाधिक नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकतील, अशा सूचनाही यावेळी दिल्या.
या बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदा��ूरकर तसेच विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि योजनेचे कर्मचारी उपस्थित होते.
🗓️१ जानेवारी २०२६ | 📍मंत्रालय
#prakashabitkar #HealthMinister #freehealthcare #MJPJAY #GovernmentInitiative
वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट,
१९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित पत्रांचे वितरण
आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले. गेली २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न सोडवता आला, याचे समाधान आहे.
यापूर्वी १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित करण्यात आला आहे. अशा प्रक���रे आतापर्यंत एकूण ३४५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली असून, उर्वरित सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या एका महिन्याच्या आत सेवाखंड क्षमापित पत्रांचे वितरण करण्यात येईल, असे याप्रसंगी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरली जाणार असून, त्यांना पदोन्नती, वेतनवाढ, निवृत्तीवेतन तसेच इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळणार आहेत. त्याम��ळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन २००९ पूर्वी आरोग्य विभागात अनेक वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात कार्यरत होते. सन २००९ मध्ये त्यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात आला. मात्र सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना विविध लाभांपासून वंचित राहावे लागत होते. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगा��े पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आरोग्य सेवेत कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्य सेवेत गुणात्मक स���धारणा होईल, असा मला विश्वास आहे. तसेच नक्षलग्रस्त, आदिवासी व दुर्गम डोंगरी भागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष प्रोत्साहन भत्ता (Incentive) देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
राज्यातील जनतेला अधिक चांगली, सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणे ही डॉक्टरांची मोठी जबाबदारी आहे. डॉक्टरांनी अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच डॉक्टरांच्या हक्काच्या बाबतीत शासन नेहमीच सकारात्मक असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.
या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर सचिव श्री. केंद्रे, सहसंचालक श्री. राजेंद्र भालेराव यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१ जानेवारी २०२६ | 📍 आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई
#prakashabitkar #HealthMinister #DoctorEmpowerment #EmployeeWelfare
#GovernmentDecision
कै. माजी आमदार किसनराव मोरे यांचे चिरंजीव व कै. विजयसिंह मोरे (अण्णा) यांचे लहान बंधू राजेंद्र कृष्णाजी मोरे (बापू) यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ही घटना अतिशय दुःखद असून वेदनादायी आहे. ते गोकुळ दूध संघ व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते. त्यांच्या अकाली जाण्याने सहकार चळवळीचे व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी मोरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
🗓️ ३० डिसेंबर २०२५ 📍 सरवडे
#Shivsena #prakashabitkar #HeartfeltTribute #condolences #Kolhapur
करारानुसार पहिल्या टप्प्यामध्ये २०० रुग्णवाहिका या महिन्याभरामध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील. उर्वरित रुग्णवाहीका या मार्चपर्यंत दाखल होतील, असे स्पष्ट केले.
🗓️ १४ डिसेंबर २०२५ | 📍विधानपरिषद, नागपूर
#prakashabitkar#HealthMinister#108service #emergencyservices #healthcare
निष्काळजी करणाऱ्यांवर आजच एक चौकशी नेमणार असून, एखाद्या एजन्सीने दिरंगा��ने किंवा चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यास त्यावर कारवाई केली जाईल.
नुकसान भरपाईसाठी अहवाल आल्यावर उत्तरदायित्व निश्चित केले जाईल. कारण हा रू��्णांच्या थेट जीवाचा प्रश्न आहे.
जेव्हा १०८ सेवा सुरु झाली होती तेव्हा फक्त सरकारी दवाखान्यातून, सरकारी दवाखान्यात नेले जात होते, जे थोडे अडचणीचे होते. सरकारी रुग्णालय असो किंवा खासगी रुग्णालय, रुग्णाला 'Golden Hours' मध्ये सेवा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही निर्णय घेतोय. याचा फायदा सर्व नागरिकांना होईल, असे स्पष्ट केले.
🗓️ १४ डिसेंबर २०२५ |📍 विधानपरिषद, नागपूर
#prakashabitkar #HealthMinister #GoldenHourCare #emergencyresponse #patientsafety