मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
https://t.co/mvSTSEWESJ
आता कोणतीही कागदपत्रे किंवा अर्ज प्रत्यक्ष देण्याची गरज नाही.
#आपले_सरकार
होम लोन 🏠Repayment करणे का गरजेचे आहे ?..
केतन नावाच्या व्यक्तीने ५० लाखांचे होम लोन ८% व्याजदराने पुढील २५ वर्षांसाठी घेतले आहे. सुरवातीला Home Loan Repayment चा फायदा कसा होतो चला तर पाहूया 👉
खालील फोटोत आपण पाहतोय की,
१) केतनचा महिन्याचा EMI ३८,५९१ आहे – ज्यातून ३३,३३३ व्याज (Interest) जाते आणि फक्त ५,२५७ मुद्दल (Principal). 💸
२) पहिल्या वर्षाचे calculation केले तर वर्षाला केतन ४,६३,०९० रक्कम बँकेला EMI च्या स्वरूपात देतो, त्यातून ३,९७,६३५ रुपये व्याज आणि फक्त ६५,४५५ मुद्दल जाते.
Thread
#homeloan_repayment @loan #EMI #आर्थिक_साक्षर #arthfreedom
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC)
ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी ॲप उपलब्ध आहे.
https://t.co/aobL3rZzXx
तक्रार किंवा कोणत्याही मदतीसाठी महामंडळाचा टोल फ्री नंबर उपलब्ध आहे.
☎️ 1800221250
जमीन मोजणी
▪️नियमित मोजणी
2 हेक्टरपर्यंतच्या मोजणीसाठी 2000 रुपये शुल्क राहील तर त्यापुढील प्रत्येक 2 हेक्टरसाठी 1000 रुपये शुल्क आकारले जाईल.
नियमित मोजणी 90 दिवसांत पूर्ण होईल.
▪️ द्रुतगती मोजणी
2 हेक्टरपर्यंतच्या मोजणीसाठी 8000 रुपये शुल्क आकारले जाईल तर त्यापुढील प्रती 2 हेक्टरसाठी 4000 रुपये शुल्क आकारले जाईल.
द्रुतगती मोजणी 30 दिवसांत पूर्ण होईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची आणि मोजणी स्टेटस चेक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
https://t.co/my0NhiASTV
नोंदणी विवाह 👰🤵
विशेष विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जायची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.
आपल्या सोयीच्या वेळेनुसार कार्यालयात जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच दिवशी लगेच विवाह प्रमाणपत्र प्राप्त होईल.
शुल्क 300 रुपये
अर्ज मंजूर झाल्यानंतर 30 दिवसात सगळी प्रक्रिया पुर्ण होईल.
https://t.co/TtUUQT0pLN
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/dBB8DDl0x7 या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी.
SRA CEO महेंद्र कल्याणकर बद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणते बघा
हा प्रकरणभर, कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे आणि जमिनमालकाचे हक्क संरक्षित करणे ही त्यांची सार्वजनिक जबाबदारी असूनही, SRA आणि CEO यांनी ती जबाबदारी सोडून दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
“उलटपक्षी, वस्तुस्थिती SRA कडून पूर्वग्रहदूषित प्रयत्न दिसून येतो, ज्यायोगे कायदेमंडळ आणि न्यायालयीन प्रयत्नांना धक्का देऊन जमीन आणि तिच्या पुनर्वसनाचे लाभ साल्दान्हा याला देण्यात आले.” सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सार्वजनिक प्राधिकरणाची अशी कृत्ये “साठेबाजी आणि संगनमताने कलुषित झाली असून, खासगी बांधकामदारांच्या परकीय नफेखोर स्वार्थामुळे प्रेरित आहेत. ही कृत्ये अत्यंत निंद्य आहेत आणि प्रशासकीय अधिकारांचा कायदेशीर तरतुदींच्या गैरवापरासाठी होणारा संभाव्य वापर अधोरेखित करतात.”
वन विभागाच्या ऑनलाईन सुविधा
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जनावरे / मनुष्य जखमी / मृत झाल्यास भरपाईसाठी, झाडे तोडण्याची परवानगी, विविध दाखले अशा स्वरूपाच्या विविध 43 सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत.
▪️मनुष्य मृत्यू 20 लाख
▪️गाय / म्हैस / बैल मृत्यू 70 हजार
▪️मेंढी / बकरी/शेळी 15 हजार
https://t.co/YQgoA2fdbJ
ऑनलाईन वारस नोंदणी
शेतीची वारस नोंदनी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
ई हक्क प्रणाली अंतर्गत 7/12 वर बोजा चढवणे / कमी करणे, नाव दुरूस्त करणे, वारस नोंदी करणे या सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत.
मृत्यूनंतर तीन महिन्यात वारस नोंद करावी
https://t.co/Yysm7xAKPp
ग्रामपंचायतीत मिळणारे विविध दाखले व शुल्क
दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क
जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना 8 अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला हे सर्व दाखले प्रत्येकी 20 रुपयात मिळतात.
वरील दाखले वेळेत आणि विहित शुल्कात न मिळाल्यास नागरिक सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतात.
गावाकडील मंडळींसाठी महत्वाची गोष्ट
जमीनीचे कोणतेही काम / कागद, उत्पन्नाचा दाखला यासाठी तलाठ्याला भेटा.
जन्म-मृत्यू-लग्न नोंद, घराची नोंद, पाणी /घरपट्टी, रहिवासी दाखला, घरकुल, विहीर किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला भेटा.
आपले सरकार पोर्टल
या संकेतस्थळावर शासनाच्या सर्व विभागांच्या मिळून एक हजारापेक्षा जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत.
ही लिंक प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेली असायला हवी.
ज्यादिवशी प्रत्येक नागरिकाला या संकेतस्थळाची माहिती आणि महती कळेल त्यादिवशी लोकसेवा हक्क कायदा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल.
https://t.co/DvMe8w4RO5
महावितरण
वीज बिलावरील नावात बदल / दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, आधार- मोबाईल-ईमेल लिंक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे
https://t.co/7RDFTIp9OD
महावितरण मधील कोणतीही तक्रार घरबसल्या ऑनलाईन करू शकता
https://t.co/FtfPq3HNUw
☎️ 19120 / 18002333435
ऑनलाईन तक्रार प्रणाली...
ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पोलीस, महावितरण यांसह शासनाच्या कोणत्याही विभागातील कोणत्याही स्वरूपाचे काम अडकले असेल तर खालील लिंकवर जाऊन तक्रार दाखल करा.
शासनाचा नागरिकांची कामे वेळेत झालीच पाहिजेत हा प्रामाणिक उद्देश आहे.
स्वतः मुख्यमंत्री महोदय इथल्या डॅशबोर्डवर वयक्तिक लक्ष देतात.
https://t.co/QIH2RKb5Wn
ऑनलाईन गॅझेट
नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय?
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय.
कोणत्याही कार्यालयात किंवा केंद्रात जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरुन 8 दिवसांत गॅझेट मिळुन जाईल.
शुल्क 523 रू
ऑनलाईन लिंक
https://t.co/xipZspnUmK