कंबाइन गट “ब” आणि गट “क”२०२४ च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ व्हावी या राज्यातील लाखो तरुण तरुणींच्या मागणीस आमचा
जाहीर पाठिंबा आहे.
अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ!
#Combine_जागावाढ_2024
#evm_हटाओ_लोकतंत्र_बचाओ #evmscam
महाराष्ट्र संयुक्त गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.
#Combine_जागावाढ_2024
Group: ASO, STI, PSI, SR, SI
Group: Clerk, Tax Asst, Excise Insp, Tech Asst, Industrial inspector, AMVI
@CMOMaharashtra@mpsc_office
आदरणीय देवेंद्रजी,
मुख्यमंत्री महाराष्ट्र,
विषय :- महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा गट ब आणि क 2024 साठी जागावाढ करून ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाला पाठवण्याबाबत,
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
SR 100+
कर सहायक 1000+
लिपीक 10000+
या पदांची ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाकडे पाठवून बळकट प्रशासकिय व्यवस्था आणि बेरोजगारांना नोकऱ्या आपले सरकार देईल अशी अपेक्षा आहे.
🔸 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित परीक्षा 2024
गट -ब व गट - क दोन्ही जाहिराती तब्बल 8 महिने विलंबाने प्रसिद्ध झाल्या.
👉मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
महोदय, आपल्या गृहखात्याने PSI च्या
441 जागांच्या #MPSC कडे पाठविलेल्या मागणीपत्रकाला कात्री लावून त्याला 50% पेक्षा कमी केले. इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार PSI पदासाठी झाला आहे.
यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून पदसंख्येत वाढ करण्यात यावी.
👉 मा. @cbawankule साहेब आपल्या विभागाच्या दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या संवर्गाचा गट -ब जाहिरातीत समावेशच नाही.तात्काळ मागणीपत्रक पाठविण्यासंबंधीचे निर्देश आपण द्यावेत.
👉 @AjitPawarSpeaks दादा
गट -क जाहिरातीत Excise S.I .ची
पदे लवकरात लवकर समाविष्ट करण्यात यावीत व यासोबतच अत्यल्प पदांच्या STI ( गट -ब) च्या पदसंख्येत वाढ करण्यात यावी.
👉 मा. @PratapSarnaik साहेब
AMVI सहायक मोटार वाहन निरीक्षक
या संवर्गाचे एकही पद गेल्या काही वर्षापासून भरले गेले नाही.
2024 च्या जाहिरातीत या संवर्गाचे जास्तीत जास्त्त पदभरती कशी होईल
याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी.
"4 लाख उमेदवारांतर्फे "मी आपल्या सर्वांना नम्रपणे या सर्व पदभरती व जागावाढची मागणी करत आहे.
@mieknathshinde@CMOMaharashtra@NANA_PATOLE@ssaunik
🔸 मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉 1. महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त राजपत्रित परीक्षा 2023 अंतर्गत 'स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा' होऊन जवळपास एक वर्ष होत आहे. अद्याप निकाल जाहीर न करण्याचे कारण काय?
एकतर निकाल तात्काळ जाहीर करण्यात यावा किंवा विलंबाची कारणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करावीत.
परीक्षार्थ्यांनी अजून किती संयम ठेवायचा ? जास्तीत जास्त तीन महिन्यात निकाल अपेक्षित असताना त्याच्या 4 पट कालावधी झाला. नेमका
निकालाचा "पत्ता " हरवला कुठे?
#MPSC
#Civil
👉 2. महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित परीक्षा
2023 अंतर्गत लिपिक व कर सहायक 7000 पेक्षा जास्त पदांसाठीचा अंतिम निकाल #Typingskilltest
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे जाहीर करता येत नाही.
आतापर्यंत सुनावणीच्या 9 तारखा झाल्या.
अजून किती महिने "तारीख पे तारीख"
मिळणार आहे?
#MPSC ला हे प्रकरण लवकरात लवकर मिटवण्यासाठी कसलीच जबाबदारी घ्यायची नाही काय?
पूर्व परीक्षा होऊन 20 महिने उलटले.
उमेदवारांच्या संयमाचा बांध सुटत आहे.
या सर्व उमेदवारांच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करत आहे,
येत्या सुनावणीस आपल्याकडून 100% सहकार्य देऊन याचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा व अंतिम निकाल जाहीर करावा.
ऑस्ट्रेलिया देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून बंदी आणली आहे.
असा कडक नियम आणणारा तो जगातला पहिला देश आहे. परिस्थितीचं गांभीर्य बघता भारताला देखील अश्या कायद्याची गरज आहे का?
भारत हा सनातन काळापासून मूर्ख देश आहे.
ह्या मॅडम अगदी बरोबर शिकवत आहेत.हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा.
विशेषत: आजच जीडीपीचे आकडे आले आहेत, ज्यामध्ये भारताचे उत्पादन क्षेत्र एका वर्षात 14.3% वरून 2.2% पर्यंत घसरले आहे.
चलनवाढीचा दर जीडीपीच्या 5.4% आकड्याला अपयशी ठरला आहे. कंपन्यांचा नफा कमी झाला आहे.
भारतातील लोकांचे पगार नकारात्मक पद्धतीने वाढत आहेत.आमच्या कारखान्यात काहीही बनवले जात नाही. फक्त,आयातीद्वारे परदेशी माल टाकला जात आहे.
ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनाही चीनच्या तांत्रिक यशाची भीती वाटते.अमेरिका त्यांचा माल रोखू शकते, पण भारत चीनला रोखू शकत नाही.
नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार साठी अर्थशास्त्र ही सर्वात मोठी कमजोरी आहे.
तरीही 140 कोटी लोकसंख्येचे भांडवलात रूपांतर कसे करायचे याची कल्पना राहुल गांधींसह देशातील कोणत्याही नेत्याला नाही.
हा व्हिडिओ शेअर करण्यासारखा आहे.
#Repost
शरद पवारांचं वय आता ८४ वर्ष आहे. शरीर आता पहिल्यासारखं धावपळ करण्यासारखं राहिलं नाही. वयाच्या ८४ व्या वर्षी सुध्दा एवढी धावपळ करताना पवारांना बघितल्यावर एक वेगळीच उर्जा मिळते.
गेली 40 वर्ष या माणसाने महाराष्ट्राचा दिल्लीतील दबदबा कायम राखला.
देशात औद्योगिक विकासात महाराष्ट्र नंबर वन ठेवला.
कित्येक MIDC, आयटी पार्क या माणसामुळे महाराष्ट्रात आले.
आजकाल उद्योग गुजरातला चालले हे पाहिले की समजते हा माणुस सत्तेत होता तोपर्यंत कितीतरी व्यवसाय याने राज्याच्या झोळीत टाकले. इतरत्र जाऊ दिले नाहीत.
या माणसाने कधीही भडकाऊ भाषणे करून मराठा बहुजन पोरांना हातात दगड काठ्या घ्यायला सांगितले नाही.
महाराष्ट्रातील तरूणांना धर्मांध बनवण्यास भाग पाडले नाही.
आज सरकारी शाळा बंद पडत चालल्या की जाणवते या माणासाने शाळा, कॉलेज काढून तरूणांना योग्य दिशा दाखवली.
स्वताची पोरे विदेशात, आणि मराठी जनतेची पोरे धर्माच रक्षण नावाखाली दंगलीत. हे या माणसाने कधीही केले नाही.
शरद पवारांमुळे जातीवाद वाढला नाही तर बहुजन विचार टिकला. फुले शाहु आंबेडकरांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राची ही ओळख पवारांमुळे कायम राहिली.
शरद पवारांनी खऱ्या जातीवादी शक्तींना राज्यात डोके वर काढू दिले नाही. शाहू फुले आंबेडकरांचा, शिवरायांचा, अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाणारा महाराष्ट्र हा पुरोगामीच ठेवला.
मतांसाठी शिवरायांना पवारांनी कधीही राजकारणात आणले नाही. मात्र त्यांच्या विचारांचा, सुराज्याचा, विकासाचा, शेतकऱ्यांच्या हिताचा, बहुजनवादाचा वारसा कायम चालवला.
कित्येक सामान्य गरीब घरातील मराठा ओबिसी दलित लोकांना या माणसाने मंत्रीपदे मिळवून दिली, मोठे केले.
या माणासाचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. या माणसाने महाराष्ट्रासाठी खुप काही केलेय. याची परतफेड करण्याची वेळ आलीये.
महाराष्ट्राला कायम सावरणाऱ्या या माणासाल मदतीचा हात द्या.
जय महाराष्ट्र!
महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यातील मला चांगल्या वाटलेल्या काही घोषणा, मुख्य घोषणा तर तुम्हाला माहिती आहेतच.
१ ) महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत दोन दिवस ऐच्छिक पगारी रजा देणार
२ ) ९ ते १६ वयोगटातील सर्व मुलींना गर्भमुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत देणार
३ ) महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि हाकेच्या अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार
४ ) महिलांना स्वयंरोजगारासाठी ५ लाखापर्यंत अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार
५ ) MPSC परीक्षांचे निकाल ४५ दिवसात जाहीर करणार, तसेच Mpsc च्या सर्व परीक्षा देण्यासाठी एकदाच शुल्क आकारून विद्यार्थ्यांना युनिफाईड स्मार्ट कार्ड देणार, ज्या आधारे विद्यार्थ्याना वर्षभरात सर्व शासकीय परीक्षा देता येतील. प्रमुख विभागातील भरतीप्रक्रिया mpsc तर्फे राबवणार, आयोगाची सदस्यसंख्या आणि कर्मचारी वाढवणार
६ ) सरकारी नोकरीतील कंत्राटी भरती रद्द करणार
७ ) वर्क फ्रॉम होमटाऊन धोरण राबवणार, ज्यात आयटी कर्मचारी आपआपल्या घरून, गावातून काम करू शकतील.
८ ) राईट टू डिस्कनेक्ट- कामाच्या तासांव्यतिरिक्त इतर वेळेत ऑफिसचे फोन कॉल, मेसेज याला उत्तर देण्यास कर्मचारी बंधनकारक नसेल. ही कृती बेजबाबदारपणाची आणि शिस्तभंगाची नसेल. यासाठी हे धोरण आणणार. कर्मचारी ऑफिस नंतर आनंदी आयुष्य जगू शकेल.
९ ) शाळा, कॉलेज, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची फी नियंत्रित करणार
१० ) विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षा, निकाल या संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी “विद्यार्थी हक्क आयोग” स्थापन करणार.
११ ) आरोग्याचे बजेट वाढवणार, सर्व रिक्त पदे भरणार, प्रत्येक तालुक्यात १०० बेड्स हॉस्पिटल उघडणार, रुग्णांना मोफत औषधे देणार, सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्ण हक्क सनदेची अंमलबजावनी करणार. डॉक्टरावरील हल्ले रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेणार
१२ ) मराठवाड्यात कापूस संशोधन केंद्र उभारणार
१३ ) शहरांच्या अत्याधुनिक, पर्यावरणस्नेही आणि कालसुसंगत नियोजनासाठी “राज्य नागरी आयोग” स्थापन करणार
१४ ) हवामान बदलाचे संकट रोखणे आणि त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी प्राधिकरण स्थापन करणार
१५ ) महाराष्ट्र ऑलिम्पिक मिशन राबवणार
१६ ) सर्व टेकड्या अबाधित ठेवण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा आणणार
१७ ) LGBTQIA+ समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणणार, सरकारी नोकऱ्यात आरक्षण सुचवणार, शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना, समाजाच्या गरजा लक्षात घेऊन प्रचलित कायद्यात बदल करणार,
समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ४८ पानांचा अतिशय अभ्यासू अन परिपूर्ण असा हा जाहीरनामा आहे. मी त्यातील काहीच मुद्दे मांडले. कोणाला हा जाहीरनामा PDF स्वरूपात हवा असेल तर कमेंटमधे रिप्लाय करून कळवा….