लोक म्हणतात, Single life पण मजेत जगता येतं… मित्र असले की आयुष्य रंगतं...
पण आजकालचं वास्तव थोडं वेगळंच आहे…
ज्यांना आपलं समजतो, तेच कधी online असूनही reply देत नाहीत… Call बघूनही उचलत नाहीत… आणि आपल्यापेक्षा better option मिळाला की हळूहळू दूर जातात…
मित्र बदलतात, गप्पा बदलतात, priority बदलते…
म्हणूनच कधी कधी वाटतं, लग्नानंतर बायकोच एकमेव अशी व्यक्ती असते, जी फक्त partner नाही… तर खरी मैत्रीण, साथीदार आणि कायमची सोबत बनते… ❤️
बाकीचं जग वेळेनुसार बदलतं… पण मनापासून साथ देणारी व्यक्ती मिळाली, तर आयुष्य खरंच सुंदर होतं…!
#Life_Partner
#मित्र
🤔हाच का कृषिप्रधान देश?
अशा बाजारभावामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्या करत आहेत.😥
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात प्रकाश गलधर यांनी
12 क्विंटल कांदा विकला. कांद्याच्या पडलेल्या भावामुळे चांगले पैसे मिळणे दूरच राहिले या शेतकऱ्याला आपल्या खिशातून एक रुपया बाजार समितीला भरावा लागला.😰
#कांदा #बाजारभाव #शेतकरी #महाराष्ट्र #संभाजीनगर
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनास हार्दिक शुभेच्छा. ..
आज एक प्रतिज्ञा घेऊ जिथे जिथे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर अन्याय होत असेल तिथे तिथे सर्व मतभेद विसरून त्यासाठी उभे राहू...
परप्रांतीय लोकांना त्यांची औकात दाखवू...
#जय_महाराष्ट्र
🚩🚩🙏🙏
अकोला आणि अमरावती दोन्ही ठिकाणी आज ४५.६℃ तर वर्धा येथे ४५.५℃ तापमानाची नोंद झाली आहे.
तापमान किती सहज चाळीस पंचेचाळीस पार जात आहे.. याचा विचार एक नागरिक म्हणून आपण करणे गरजेचे आहे.. 'झाडखाऊ' सरकार जरी असले तरी त्याची जबाबदारी आणि परिणाम शेवटी आपल्यावर येतात..कळावे..❤️
#Heat
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
काय पण पुण्याच्या खासदारांचा पाठपुरावा आहे! पुण्याच्या लोकांचा फायदा बघा, जबलपूर च्या नव्हे. पुण्याच्या लोकांचे नातेवाईक जबलपूर ला नव्हे, महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आहेत!
आणि दररोज?? कशाला? म्हणजे का? कशासाठी?
नेहमी तुमचा पाठपुरावा महाराष्ट्राबाहेरच्याच रेल्वे गाड्यांबाबत कसा असतो? मराठवाडा, कोल्हापूर इथे फेऱ्या वाढवायला सांगा की.
टँकर अपघातात लोक मरतायत म्हणून टँकर वाल्यांना पोलिसांनी दणका दिला, तर त्यांनी संप पुकारला आणि महापौरांनी मध्यस्ती करून कारवाई थांबवली! आता आरएमसी प्रकरणात नगरसेवक आले.
पुणे महानगरपालिका बिल्डर, टॅंकर, आरएमसी वाले यांच्याच बाजूने उभी होती, आहे आणि राहणार!
कारण जवळपास सगळे नगरसेवक बिल्डर लोकांचे पार्टनर आहेत, त्यात आरएमसी प्रकार सुद्धा आला. शहराच्या उपनगरांमध्ये जे टॅंकर फिरतात ते सुद्धा नगरसेवकांचेच आहेत. त्यामुळे नागरिक किंवा पुणेकरांच्या हिताचे निर्णय येतील अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.
@MarathiRojgar@PuneriSpeaks
आज पुणे जिल्ह्यात भाजपचा
1 खासदार,
6 आमदार,
119 नगरसेवक आहेत.
यांची राज्यात सत्ता,
केंद्रात सत्ता आहे.
पण फक्त 2 तासांचा पाऊस -
2-3 वर्षापूर्वी बळचंच पुण्याचे शिल्पकार बनायला निघालेल्या फडणवीस आणि भाजपला नागव करायला पुरेसा आहे.