State General Secretary - NCP, Sharadchandra Pawar, Maharashtra, (Women's Wing). | Member of The Party Since it's Foundation 1999 |#BilateralAmputee#FightingCA
आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाचा २७ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. २६ वर्षे पूर्ण करून २७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा प्रवास केवळ एका राजकीय संघटनेचा नसून, पुरोगामी विचारांचा आदर्श वारसा घेऊन समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आहे. हा प्रवास ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासाचा असून, सामान्य जनतेला न्याय आणि हक्क मिळवून देण्याच्या ध्येयाशी बांधिल आहे.
हा प्रवास कार्यकर्त्यांमधून नेते घडवणाऱ्या 'शरद'रुपी राजकीय विद्यापीठाचा आहे. तो दूरगामी धोरणांचा, महिलांच्या स्वाभिमानाचा, सामाजिक समतेचा, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेणाऱ्या दूरदृष्टीचा आहे.
यावेळी पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे सर्व विद्यमान व माजी खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी पदाधिकारी, पक्षातील सर्व फ्रंटल सेल, विभाग, जिल्हा, तालुका व स्थानिक स्तरावरील पदाधिकारी, तसेच सर्व विभागीय समन्वयक, सेल प्रभारी, बूथ व शाखा स्तरावरील पदाधिकारी आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातून आलेले पक्षाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज टकच्या अंजना ओम कश्यप यांचा मुलगा दिल्लीतील ज्या अमेरिकन एम्बसीच्या शाळेत शिकतो, ती शाळा तब्बल १३ एकर परिसरात पसरलेली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानालगतच्या अतिविशिष्ट चाणक्यपुरी परिसरात या शाळेला तब्बल ८ एकर जमीन अवघ्या १ रुपया वार्षिक भाडेपट्ट्यावर (लीजवर) देण्यात आली आहे, अशी माहिती दिल्लीतील एका पत्रकार मित्राने दिली आहे.
ते असो. हा मुद्दा नाही. खरा मुद्दा पुढेच आहे. या शाळेचे वार्षिक शुल्क फक्त सुमारे 37000 अमेरिकन डॉलर इतके आहे, असे पत्रकार मित्राने लिहिले आहे.
37,000 डॉलर × ₹95.4 = ₹35,29,800
म्हणजे महिन्याला सरासरी विचार केल्यास ती फी जवळपास ₹2.94 लाख प्रति महिना इतकी फी होते. म्हणजे त्या शाळेची वार्षिक फी साधारण 35 लाख रुपये होते. बाकी तुम्ही सगळे जण सुज्ञ आहात स्वतःच सगळा काही अंदाज लावू शकता.
मला यापेक्षा अधिक काहीही बोलायचे नाहीये.
वाचा आणि आज तक बघत थंड बसा.
आधुनिक भारताच्या उभारणीत तंत्रज्ञान, शिक्षण आणि युवक सक्षमीकरणाला प्राधान्य देत नव्या युगाची दिशा देणारे स्व. राजीव गांधी यांनी दूरसंचार, संगणकीकरण आणि पंचायतराज व्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. देशाच्या प्रगतीत युवा शक्तीचा सहभाग वाढवण्याचा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन आजही मार्गदर्शक ठरतो. युवा भारताचा समग्र विचार जोपासणारे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
स्वराज्याच्या रक्षणासाठी अदम्य धैर्य, अपराजित रणनिती आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या बळावर संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्यनिष्ठा अबाधित ठेवली. औरंगजेबाच्या आक्रमणासमोर न झुकता त्यांनी स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि पराक्रमाची परंपरा जपली.तेजस्वी बुद्धिमत्ता, अपराजित रणनिती सह्याद्रीचा लढवय्या धुरंधर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!
गोविंदबाग, शारदानगर (बारामती) येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेल्या ऊस आणि केळी पिकांची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशमामा खोमणे, सदाशिव बापू सातव, मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष तसेच मराठी भाषा-संस्कृतीचे अभ्यासक प्रा. डॉ. दिपक पवार आणि युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
आज मुंबईत 'लक्ष्मणराव गुट्टे रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे' द्वारा आयोजित 'माजी प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी' ह्यांचा कृतज्ञता आणि स्नेह मेळाव्यात (Get Together) सहभागी झालो आणि गेली अनेक दशकं युवक आणि अन्य संघटनांच्या माध्यमातून राज्याच्या, देशाच्या राजकारणात योगदान देणाऱ्या आणि आजमितीला विविधं पक्षांमध्ये कार्यरत असणाऱ्या घटकांशी संवाद साधला आणि ह्या सामूदायिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
---
इथं यायच्या आधी मला सांगण्यात आलं मी महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केलं. युवक काँग्रेसचा अध्यक्ष, सचिव, अन्य पदाधिकारी अशा सगळ्यांचं आज इथे संमेलन आहे. "आम्ही सगळे भेटणार आहोत आणि एकमेकांच्या संबंधीच्या आठवणी सांगणार आहोत. आणि तुम्ही या"
पण इथे आल्याच्या नंतर तुम्ही माझा सत्कार करताय आणि तुमच्या आठवणीच विसरून गेले आहात. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ युवक काँग्रेसच्या संघटनेला दिला. अनेक वर्ष काम केलं. आज कुणी कोणत्या पक्षात असेल-नसेल पण सामान्य लोकांच्यात आहात, आणि लोकांची बांधिलकी ही जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवलेली आहे. सर्वांचं ऐकल्यानंतर मलाही माझे तेव्हाचे दिवस आठवले.
१९५८ साली, वयाच्या १८ व्या वर्षी मी बारामतीतून पुण्यामध्ये शिकायला आलो. बारामतीला तेव्हा कॉलेज नव्हतं. आणि आल्यानंतर युवक चळवळीमध्ये सहभागी झालो, ४ वर्षांनी पुणे शहर युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. त्यानंतर ५ वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो. आणि देशाच्या युवक संघटनेत सहभागी झालो. त्यावेळची स्थिती वेगळी होती. जी राष्ट्रीय लोकांची संघटना होती त्याच्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. आणि आम्ही सगळे त्यात सहभागी होतो. मला आठवतंय की, एकेदिवशी इंदिराजींना आम्ही विनंती केली की, आम्हाला जवाहरलाल नेहरूंना भेटायचं आहे. पंडितजी होते तेव्हा. इंदिराजींनी एक मिटिंग ठेवली, युवकांच्या अध्यक्षांची आणि त्या मीटिंगला पंडित जवाहरलाल नेहरू येतील असं सांगितलं आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळेजण विचार करायला लागलो की आपल्या आयुष्यात ही फार मोठी संधी आहे. आपण काही प्रश्न पंडितजींच्या समोर मांडू. मग ते शेतकऱ्यांचे असतील, तरुणांचे असतील, त्रिमूर्ती हे नेहरूंचं दिल्लीचं निवासस्थान होतं. तिथं ही बैठक होती. आम्ही सगळे बैठकीला गेलो. सगळ्यांनी ठरवलं होतं, मी काय बोलायचं ? दुसरं कुणी काय बोलायचं? आणि त्याप्रमाणे आम्ही तयारीने गेलो. पंडितजी आले आणि आम्ही काय बोलायचो हेच विसरून गेलो. कारण त्यांची पर्सनॅलिटी एवढी मोठी होती की, आम्हाला बाकी काही सुचलंचं नाही. अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.
आनंदाची गोष्ट अशी की, त्या काळात इंदिरा गांधी ह्या युवक संघटनेच्या प्रमुख होत्या. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. इंदिराजी या देशाचं नेतृत्व करत होत्या तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला ऐकायला मिळाली. इंदिरा गांधी Prime Minister होत्या. आणि त्यांची एक Visit रशियाला होती. रशियाला इंदर कुमार गुजराल हे राजदूत होते. साधारणतः एखाद्या देशाचा प्रधानमंत्री तुमच्याकडे आल्यानंतर त्या लेव्हलच्या पदाधिकाऱ्याने त्यांचं स्वागत करायचं असतं. इंदिरा गांधी मॉस्कोला उतरल्या. त्यांचं स्वागत करायला रशियाचा वरिष्ठ नेता आला नव्हता, काही अधिकारी आले होते. खुद्द गुजराल ह्यांच्याकडून ही गोष्ट मी ऐकलेली आहे. गुजरात राजदूत होते, त्यांनी इंदिरा गांधींचं स्वागत केलं. इंदिरा अस्वस्थ दिसल्या. कारण त्यांचं स्वागत त्यांच्या levelच्या पदाधिकाऱ्याने केलं नव्हतं. त्यांनी गुजरालना सांगितलं की, जिथे इंडियन एम्बसी (भारतीय दूतावास) आहे तिथं मला जायचंय. रशियातील इंडियन एम्बसी मोठी आहे. तिथं भारतीय अधिकारी राहतात. इंदिरा तिथं गेल्या, तयार झाल्या आणि त्यानंतर गुजरालना सांगितलं इथं जी कुटुंबं राहतात त्यांच्यात जी लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना बोलवा. ९-१० मुलं होती, आणि इंदिरा गांधी तिथं त्या मुलांबरोबर खेळायला लागल्या. रशियाचे राष्ट्रप्रमुख हे स्वागतासाठी एका ठिकाणी उभे होते. त्यांनी इंदिरा गांधींना रिसिव्ह केलं नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, इंदिरा गांधी राष्ट्र प्रमुखांच्या घरी येण्याऐवजी एम्बसीला गेल्या आहेत. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं देशाच्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधींचा आपण सन्मान केला नाही. त्यांना आपण यथोचित पद्धतीनं रिसिव्ह केलं नाही. मग ते स्वतः आणि इंडियन एम्बसीत गेले, आणि इंदिरा गांधींची माफी त्यांनी मागितली. इंदिरा गांधींनी सांगितलं. हा आपल्या माफीचा प्रश्न नाही. ४० कोटी लोकांचं प्रतिनिधित्व मी करते आणि त्या ४० कोटी लोकांची प्रतिष्ठा जर राखली जात नसेल तर हे मी कधीही मान्य करणार नाही.
आज जागतिक वसुंधरा दिन.
निसर्गाची संपत्ती आणि पृथ्वीची समृद्धी जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून भावी पिढ्यांसाठी हरित भवितव्य घडवूया.
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी.
बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.
धन्यवाद !
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नव्या आशा, समृद्धी आणि मंगलमयतेची सुरुवात घडवणारा हा पवित्र दिवस सर्वांच्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येवो हीच सदिच्छा.
आज जागतिक वारसा दिन. इतिहासाचा सन्मान आणि संस्कृतीचा अभिमान जपत आपला वारसा जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्या परंपरेचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया.
महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य अर्पण करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समाजपरिवर्तनाची नवी दिशा दिली. स्त्री सन्मान आणि समानतेचा विचार रुजवण्यासाठी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरते. महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देत आधुनिक भारताच्या घडणीत मोलाचे योगदान देणारे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टी, विद्वत्ता आणि संघर्षाच्या बळावर वंचित घटकांना नवी दिशा दिली. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी लोकशाही, अधिकार आणि समानतेची भक्कम पायाभरणी केली. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' च्या विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. मराठी रंगभूमीचे जतन, संवर्धन आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्वपूर्ण विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
दिल्ली येथे ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं ‘मराठी साहित्य संमेलन’ पार पडणार आहे. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने आयोजित हे अभिनव साहित्य संमेलन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर उत्कृष्ट महिला प्रशासक म्हणून ओळख असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या नावाने होत असलेल्या या संमेलनात त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचं आणि प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार यशस्वीपणे सांभाळण्याच्या त्यांच्या हातोटीचं स्मरण केलं जाणार आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
महिलांना संसदेत ५०% आरक्षण देणारं विधेयक लवकरच येणार आहे. या संधीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून केली. महिलांना संपत्तीत मिळणारा हक्क असो किंवा प्रशासकीय व राजकीय नेतृत्व; महिला कुठेही मागे नाहीत, हे आज सिद्ध झालं आहे. हे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचा मला अभिमान आहे. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसत आहेत.
म्हणूनच या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातून होणारं विचारमंथन समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या संमेलनासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचं https://t.co/ZAWFEjVEfI माझ्या हस्ते अनावरण करण्यात आलं असून, ते साहित्य रसिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
या प्रसंगी संयोजन समितीतील डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, कविता वानखेडे, निर्मला नलावडे, डॉ. संगीता शिंदे, मनीषा वाडेकर, सुजाता गोळे, गीता खोत, पल्लवी पासलकर, सोनाली निवंगुणे, निलेश भिंगारे, हर्षवर्धन पासलकर, प्रीतम पानसरे, अवेस शेख तसेच सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते.
पुणे येथील निसर्ग कार्यालयात पार पडलेल्या 'रयत शिक्षण संस्थे'च्या आढावा बैठकीत उपस्थित राहिलो; संस्थेच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. शिक्षणाची गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि एकंदरीत संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात विस्तृत चर्चा झाली.
मानवी जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल, तर उत्तम आरोग्य लाभणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आरोग्य ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संतुलित आहार, नियमित व्यायाम तसेच आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती यांचा समतोल साधत आपले आरोग्य जपण्याचा संकल्प करूया.
३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांच्या रूपाने हजारो वर्षांच्या गुलामीचा अंधकार नष्ट करणारा स्वराज्याचा स्वाभिमानी सूर्य अस्ताला गेला. परंतु त्यांचा तेजस्वी विचार, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अतुलनीय कर्तृत्व आजही या मातीच्या कणाकणात जिवंत आहे. आजही जेव्हा अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे सुलतानी संकट उभे ठाकते, तेव्हा 'शिवविचार' प्रत्येकाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा देतो.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्योतिबा फुले हे परिवर्तनाच्या चळवळीचे अध्वर्यू होते. वंचित घटकांना सन्मानाने उभं राहण्यासाठी त्यांनी दिलेला मार्ग आजही समाजाला दिशा देणारा आहे. समता व सत्याचा आग्रही महामेरू महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.