प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला आणि समाजकारणाला अग्रक्रम देणाऱ्या राजकारणाची सिद्धता केली. अमोघ वक्तृत्व आणि मुद्द्याला थेट भिडणारा रोखठोक स्वभाव यामुळेच बाळासाहेबांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं.
देशाच्या अखंडता व एकात्मतेसाठी सातत्याने कार्य करणारे, देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कृतीशील वैचारिक आणि शैक्षणिक वारशाला अभिवादन!!
#MaulanaAbulKalamAzad
प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करून देणारा ईद-ए-मिलादचा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. सर्वांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा !
#EidMubarak