एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत.
दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं.
आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे.
अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली.
निवडणुका फक्त पैश्याने निवडून येतात असं काहीच नाही.
ह्याच उत्तम उदाहरण आहे शिवसेनेच्या निवडून आलेल्या
“स्नेहल शिवकर”
स्नेहल शिवकर (Snehal Shivkar) म्हणजे मुंबईतील बीएमसी (Brihanmumbai Municipal Corporation) च्या वॉर्ड क्रमांक १५५ (चेंबूर - सुमननगर परिसर) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत.
### मुख्य माहिती:
- निवडणूक: २०२६ च्या बीएमसी निवडणुकीत (ज्या नुकत्याच पार पडल्या) त्यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला.
- पार्श्वभूमी: त्या एक साध्या गृहिणी आहेत. त्यांचे पती विष्णू शिवकर हे रिक्षाचालक आहेत आणि समाजसेवेचे काम करतात (शिवसेना शाखेत उपशाखाप्रमुख). मंडप डेकोरेशनचे कामही करतात. पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे आणि स्थानिक लोकांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.
- विशेष वैशिष्ट्य: चाळीत राहणाऱ्या, साध्या कुटुंबातील असूनही त्यांनी निवडणूक जिंकली. अनेक माध्यमांनी त्यांच्या यशाची चर्चा केली की "फक्त पैशाने निवडणूक जिंकता येत नाही" – लोकांचा पाठिंबा आणि मेहनत महत्त्वाची आहे.
- प्रचार: निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कार्यालयाला भेटी दिल्या होत्या.
### काही उल्लेखनीय बातम्या/प्रतिक्रिया:
- Loksatta: "चाळीतलं घर, साधी माणसं अन् लाखमोलाचा पाठिंबा, मुंबईत गृहिणीचा मोठा विजय"
- ABP Majha/Instagram: "रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका"
- Saamana आणि इतर माध्यमांमध्ये त्यांच्या विजयाची बातमी मोठ्या प्रमाणात आली.
फरक स्पष्ट आहे!
शहराध्यक्ष - संदिप देशपांडे
युवासेना प्रमुख - आदित्य ठाकरे
कर्ताधर्ता - अनिल परब
मुंबई अध्यक्ष - अमित साटम
उबाठा, मनसेचे मुख्य नेते कॅमेऱ्यासमोर
"मराठी माणसाने मतदान करावे"
"शाई पुसल्या चालली"
असे बोलून घरी जाऊन झोपले
दुसरीकडे अमित साटम मुंबईभर बुथ फिरले, तिथल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अजुन दिवसभर फोनवर असतील, मतदान बाहेर काढतील.
अमित साटम आमदार आहेत, आदु, अम्या, संदिपभाऊ पेक्षा युवा, तरुण, तडफदार नाही तरीही एवढी मेहनत घेतात.
असं बाळराजे, घराण्याच्या गुलामांना जमत नाही म्हणून हे लोकं तोंडावर आपटतात.
#VoteForBJPMahayuti