निधीची फक्त कारणं….पण मिळणारा निधी तरी फुटीर गटातल्या खासदारांनी किती वापरला ह्याची पोलखोल मुंबई Tak ने केली.
तोच डेटा महाराष्ट्रातल्या संपूर्ण ४८ खासदारांचा तपासल्यावर दिसलं की सत्ताधाऱ्यांपेक्षाही विरोधी पक्षातल्या कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी निधी सर्वाधिक खर्च केला आहे
त्यामुळे इच्छा असेल तर मिळणाऱ्या निधीतही कामं करता येतात आणि विरोधी पक्षाचं राजकारणही करता येतं, हे पुन्हा अधोरेखित होतं
VIDEO - https://t.co/hG9TL7q47G
#ShivSenaUBT #OmrajeNimbalkar #NageshAshtikar #Congress #MaharashtraCongress #VarshaGaikwad @VarshaEGaikwad
अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CBI कडं देण्याबाबतचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री आणि अजितदादांचे ‘मित्र’ फडणवीस साहेबांना दिलं होतं. नंतर अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तरही दिलं. पण अजितदादांना जाऊन येत्या २८ तारखेला ४ महिने होतायत, तरी अद्यापही हा तपास CBI कडं दिलेला नाही. त्यामुळं माझं सुनेत्राकाकींना आवाहन आहे म्हणा, आव्हान (Challenge) आहे म्हणा किंवा विनंती आहे म्हणा… की त्यांनी येत्या २८ तारखेपर्यंत हा तपास CBI कडं देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं. यानिमित्ताने त्यांचा मित्रपक्ष हा खरंच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारा अजगरी वृत्तीचा आणखी कुणी आहे, हे स्पष्ट होईल.
अजितदादा हे चार-दोन महिन्यात लोकं विसरुन जातील, असे नेते नक्कीच नव्हते… सर्वांना न्याय देणारा हा ‘कामाचा माणूस’ होता आणि त्यांना न्याय कधी मिळणार, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. यासाठी अजितदादांनी निवडून आणलेल्या पण आज ‘विकास’ निधी मिळवण्यासाठी व्यस्त असलेल्या त्यांच्या पक्षाच्या १०० टक्के आमदारांनी वेळात वेळ काढून याबाबत पाठपुरावा करायलाही हरकत नाही. शिवाय आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण सगळ्या यंत्रणा हाती असलेल्या सरकारचीही काही जबाबदारी आहे की नाही? हे सरकार अजून किती दिवस लोकांना वेड्यात काढणार? एक दिवस उत्तर द्यावंच लागेल अन्यथा लोकंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.
@SunetraA_Pawar
#JusticeforAjitdada
#AjitdadaPawar
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
टोपीबाज कुंभकर्ण किसन आण्णाला निरोप सांगा मिटलंय सगळं नायतर उद्या पुण्याची गाडी पकडायचा…!
भामटा बारा वर्ष झाले जसे भाजपाचे सरकार आलंय तसा धोतराला गाठ बांधून पसरला होता …!
काल नुसतं कळालं पवारांचा एक गडी अडकतोय ताडकान जागा झाला जणू सुनामी आलीय…!
आण्णाला एक मिसळ दोन पाव जोडी लावा रे म्हणजे खावून परत कुंभकर्णासारखा झोपायला मोकळा😬🤬
#अजिद_दादा #पार्थ_पवार #IsupportParthPawar
गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या जमीन व्यवहाराबाबत मी सविस्तर माहिती घेतली आहे. या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीनं सहभाग नाही. यासंदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाही.
हा फक्त प्राथमिक करार असून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल. कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
मी आजवर सदैव कायदा, नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीत राहून काम करत आलो आहे आणि पुढेही हीच मूल्ये जपत काम करत राहीन, असा विश्वास मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो.
गोरगरीब कष्टकरी शेतकरी मराठ्यांना देवाच्या दारातून हाकलून दिले म्हणुन विसर्जनाला विघ्न येत आहे. ट्रस्टच्या लोकांनी केलेलं दुष्कर्म गणपती बाप्पा विसरला नाही..
"काहीं चुकलं असेल तर माफ कर" अशा विनवण्या सुरु आहेत, 3 तासांपासून ट्रस्टच्या लोकांच्या नाकीनऊ आले विसर्जन करता करता. बाप्पाच्या माफीसोबत मराठ्यांची पण माफी मागा.
बाप्पा तुझा न्यायच निराळा आहे रे. शतशः नमन बाप्पा तुला..🙏🏻
#गणपतीबाप्पामोरया
#लालबागचाराजा
@LalbaugchaRaja
भक्तांनो नीट पहा व लक्षात ठेवा लालबाग राजाचा एक पाय VIP लोकांसाठी व दुसरा पाय तुमच्या सारख्या किड्यामुंग्या सारखे चुत्या भक्तांसाठी जे आठ दहा तास लाईनमध्ये थांबून दर्शनाला जातात व एक सेकंदात तुमच्या टांगीवर लाथ घालून हाकलून देतात त्यांच्यासाठी आहे…! 🤣🤣
देवावर श्रद्धा असावी पन अशी अंधश्रद्धा नसावी घरात पन गणपती बसवता ना मंग येथे कशाला झक मारत पार्श्वभाग सुजवायला येता दरवर्षी कायणू 🤷♂️🤷♂️
#गणेशोत्सव #लालबागचा_राजा
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
राज ठाकरे ।