We Learn English : माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ !
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात जागतिक स्तराचे शिक्षण मिळावे यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत प्रसार भारतीच्या (Radio) माध्यमातून "आम्ही इंग्रजी शिकतो We Learn English" हा कार्यक्रम दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी १२ ते १२.१५ या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. आज, दिनांक २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी सोप्या, आनंददायी पद्धतीने इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
वारीच्या परंपरेतून संतांनी भक्तीसोबतच समतेचा संदेश दिला... संतांचा हा संदेश पाळत, विठू नामाचा अखंड गजर करत ही परंपरा अनंतकाळ सुरू राहावी हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.
समस्त वारकरी बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा !
पुणे जिल्हा परिषद व प्रसार भारतीच्या (Radio) माध्यमातून "आम्ही इंग्रजी शिकतो We Learn English" हा कार्यक्रम दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी १२ ते १२.१५ या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी सोप्या इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
वारी पंढरीची, वारी भक्तीची !
आषाढी वारी म्हणजे भक्तीचा, चैतन्याचा आणि सहकार्याचा अनोखा सोहळा..
हा सोहळा सर्व वारकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने चैतन्यमय व आनंददायी ठरावा यासाठी महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करून हा सोहळा सर्वांसाठीच सुखकर करणाऱ्या वारकरी माऊलींचे पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आभार.
महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगाव असलेल्या खानवडी येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. याबाबत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी खानवडी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता श्री. अमरजित रामसे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध कॉर्पोरेट संस्थांच्या CSR प्रमुखांसोबत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी आज राऊंड टेबल बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सहकार्य अधिक भक्कम करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
CSR भागीदारांच्या सहकार्याने मॉडेल स्कूल उपक्रमाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय वाढविण्यावर भर देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. शैक्षणिक विकासासाठी गुंतवणूक आणि सहकार्य करण्याबाबत कॉर्पोरेट क्षेत्राकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्हा परिषदेच्या सक्रिय, नाविन्यपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाचे CSR भागीदारांकडून कौतुक करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व CSR प्रमुखांचे आभार व्यक्त केले.
कॉफी विथ कमिशनर अँड सीईओ!
पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आयोजित 'कॉफी विथ CEO' या विशेष उपक्रमात SQUAAF अंतर्गत A+ श्रेणी प्राप्त करणाऱ्या 28 जिल्हा परिषद शाळांचा तसेच राज्यस्तरीय स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त सौ. शीतल तेली-उगले, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, शिक्षण अधिकारी श्रीम. ललिता दहितुले व शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी SQUAAF मूल्यांकनामध्ये राज्यात सर्वाधिक 28 शाळांनी A+ श्रेणी प्राप्त करून पुणे जिल्हा परिषदेला मानाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तसेच, इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत 29 विद्यार्थी आणि इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत 22 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून पुणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात अव्वल स्थान कायम राखले. या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थिनी कु. श्रावणी कुदळे हिचा NEET परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 5 वा क्रमांक (AIR-5), मुलींमध्ये देशात प्रथम आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील म्हणाले, "'कॉफी विथ CEO' हा विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. SQUAAF मधील यश आणि विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी ही शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते."
पुणे विभागीय आयुक्त सौ. शीतल तेली-उगले म्हणाल्या, "प्रत्येक विद्यार्थ्याने इतरांचा मार्ग अनुसरण्यापेक्षा स्वतःची स्वप्ने ओळखून ती पूर्ण करण्यासाठी तयारी केली पाहिजे. यशासाठी कोणताही ठराविक साचा नसतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आणि क्षमता असतात. आपल्या सामर्थ्यांची ओळख करून त्यांचा विकास करत सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. पुणे जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता आहे. सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुणे जिल्हा परिषदमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केलं. "
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे मुळ गाव असलेल्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ज्योती सावित्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी वसतिगृहाचे कामही प्रगतीपथावर आहे.
आज पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी या शाळेत भेट देऊन शैक्षणिक दर्जाची पाहणी केली. तसेच, वसतिगृहाच्या बांधकामाचीही पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२५-२६
पुणे जिल्हा परिषदेचे दुहेरी यश !
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२५-२६ मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील काळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीने पुणे विभागात १२ लाख रुपयांच्या पारितोषिकासह प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कडाचीवाडी (ता.खेड) ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणीपुरवठा व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार पटकावून ७५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल काळवाडी व कडाचीवाडी ग्रामपंचायत प्रशासनाचे, नागरिकांचे हार्दिक अभिनंदन !
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती अंकिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत खरात व श्री. भूषण जोशी यांच्यासह इतर खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
वारी सेवेत प्रशासन सदैव तत्पर!
वारकऱ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र कटिबद्ध असलेल्या पुणे जिल्हा परिषद प्रशासनाबद्दल पालखीप्रमुखांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. वारकऱ्यांना पुरवण्यात आलेल्या दर्जेदार आणि उत्तम सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत, पालखीप्रमुखांनी ग्रामविकास विभाग आणि पुणे जिल्हा परिषदेचे विशेष आभार मानले आहेत. वारकऱ्यांचे समाधान हाच आमचा खरा हेतू आणि प्रेरणा आहे!
#Wari2026 #PuneZP #Gramvikas #WariSeva #MaharashtraUpdates #PandharpurWari
राम कृष्ण हरी!
तुकोबांच्या अभंगातील "आनंदी रहा, हसत रहा" हा जीवनमंत्र मनात साठवत अभिनेते भाऊ कदम यांनी संत तुकाराम महाराजांच्या पावन पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
भक्ती, आनंद आणि समतेचा संदेश देणाऱ्या या वारीत सहभागी होत त्यांनी विठ्ठल चरणी कृतज्ञ भावाने नतमस्तक होत सर्व वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
#आषाढीवारी #संततुकाराममहाराज #पालखीसोहळा #भाऊकदम #निर्मलसमृद्धवारी2026 #रामकृष्णहरी
वारी सेवेत प्रशासन सदैव तत्पर!
वारकऱ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! वारकऱ्यांना मिळालेल्या उत्तम सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. वारकऱ्यांचे समाधान हाच आमचा खरा हेतू!
#Wari2026 #PuneZP #Gramvikas #WariSeva #MaharashtraUpdates #SantDnyaneshwarMaharaj #PandharpurWari
ज्ञानोबा-तुकोबा!
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण होऊन पालखी आता सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली आहे.
या निमित्ताने पुणे जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि भक्तिमय व्हावा, यासाठी दोन्ही जिल्हा प्रशासनांचा समन्वय आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.
#SantTukaramMaharaj #PalakhiSohala #Wari2026 #Solapur #PuneZP #ज्ञानोबा_तुकोबा #वारी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा: पुणे जिल्ह्याचा टप्पा पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यात दिमाखात मार्गस्थ!
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ झाले. पालखीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सरटी येथून करत पालखीचा पुढचा सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. या ऐतिहासिक प्रवासात प्रशासकीय समन्वयाचा आणि लोकसेवेचा एक अत्यंत देखणा पायंडा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
नियोजित टप्प्यांवर पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखी सोहळ्याची आरोग्यविषयक, सुरक्षा आणि व्यवस्थापकीय जबाबदारी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे अत्यंत उत्साहात आणि अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आली.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारीदरम्यान राबवण्यात आलेल्या आरोग्यदायी नियोजनाची, निर्मल समृद्ध वारीची आणि सेवाभावाची परंपरा आता सोलापूर जिल्हा प्रशासन तितक्याच सक्षमपणे आणि उत्तमरीत्या पुढे चालवेल, यात शंका नाही. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लाखो वारकरी बांधवांची पुढील वारी अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न होईल, असा दृढ विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील हा प्रशासकीय समन्वय आणि जबाबदारीचे हस्तांतरण वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे!
इंदापूरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुसरे गोल रिंगण भक्तीमय वातावरणात संपन्न!
"ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अश्वांच्या टापांनी उधळलेल्या पवित्र धुळीत इंदापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
राम कृष्ण हरी
#वारी2026 #संततुकाराममहाराज #गोलरिंगण #इंदापूर #विठ्ठलनाम #रामकृष्णहरी #ज्ञानोबातुकाराम
आषाढी वारी नियोजन: ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांनी केली पालखी तळाची पाहणी.
आषाढी वारी सुरळीत आणि नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्याचेग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांनी आज इंदापूर येथील संत तुकाराम पालखी तळाला प्रत्यक्ष भेट दिली.
वारीच्या नियोजनाच्या दृष्टीने मंत्री महोदयांनी पालखी मार्गावरील सोयीसुविधांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या गरजा आणि सोयीसुविधांची आस्थेने विचारपूस करत सोहळा अत्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकांच्या सोयीचा व्हावा, यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत. संपूर्ण वारी सोहळा यशस्वीरित्या संपन्न व्हावा, यासाठी मा मंत्री महोदय वारीच्या काळात सर्व पालखी मार्गावर पूर्णवेळ सक्रिय आहेत.
@Jaykumar_Gore
जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थिनी तथा पुणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. कृष्णा कुदळे व शिक्षिका सौ. जयश्री कुदळे यांची सुकन्या कु. श्रावणी कुदळे हिने NEET - UG परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवून देशात पाचवा, तर मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला.
तिच्या या उज्वल यशाचा जिल्हा परिषद प्रशासनास सार्थ अभिमान आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल कु. श्रावणी कुदळे व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन.
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात जागतिक स्तराचे शिक्षण मिळावे यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत प्रसार भारतीच्या (Radio) माध्यमातून "आम्ही इंग्रजी शिकतो We Learn English" हा कार्यक्रम दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी १२ ते १२.१५ या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी सोप्या, आनंददायी पद्धतीने इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.