कुठलं नवीन पुस्तक वाचताय, #पुस्तकप्रेमी आहात.
मग वाचलेल्या साहित्याबद्दल मेसेज करून आम्हाला कळवा.आम्ही ती माहिती इतर वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू.
✍ पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशन, किंमत, पृष्ठ संख्या, बांधणी, पुस्तक फोटो तुम्ही लिहलेल्या पुस्तक परिक्षणासहीत पाठवा.
बोचरी थंड हवा, दूरवरून कुत्र्यांच्या रडण्याचा येणारा आवाज, रातकिड्यांचा गोंगाट, काळ्याकुट्ट ढगांची झालेली गर्दी, त्यातच अचानक चमकणारी वीज, झाडाच्या पानांची होणारी सळसळ
ह्या सर्व गोष्टी "नारायण धारप" यांचे पुस्तक वाचनासाठी पोषक वातावरण
तुम्हाला कुठले भयरसाचे पुस्तक वाचायला आवडेल?
भारताचा भव्यदिव्य असा इतिहास प्रत्येक पानावर इथं भेटतो. कादंबरीतील प्रत्येक पात्र त्याची स्वतःची अशी छाप मनावर सोडून जात. एकूण अप्रतिम आणि उत्कृष्ट दर्जाची रहस्य कादंबरी आपल्याला वाचायला आणि अनुभवायला मिळेल.
पुस्तक समीक्षण - #मार्मिक#पुस्तकप्रेमी
#PP43
पुस्तक परिचय:
पुस्तक - प्रतिपश्चंद्र
लेखक - डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 440
किंमत रुपये - 390₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा - उत्तम
पुढे महाराज खजिन्याचे रक्षण करण्यासाठी शिलेदार नेमतात व खजिन्याच्या रक्षणाची योजना आखतात. प्रतिपश्चंद्र ही कादंबरी याच खजिन्याच्या शोधाची आजच्या काळातील कथा ह्या कादंबरीत आहे.
खूप छान पुस्तक आहे सर,वरदाची शेवटी झालेली अवस्था बघून आयुष्यात माणसाला सगळं सुख मिळून सुद्धा खरं प्रेम करणारा एक परफेक्ट जोडीदार किती महत्वाचा असतो ते यातून बघायला मिळते.
इतकी मोठी कथा असतानाही सर्व घटनांमागील तर्क व साखळी कुठेही सैल पडत नाही हे महत्वाचे. कथेच नाव जरी चेटकीण असल तरी कथा ही चेटूक या गोष्टीपुरती मर्यादीत आहे. भयाचा अपव्यय झालेला नाही.
पुस्तक वाचनीय आहे.
पुस्तक समीक्षण: @Rokhthok_Onkar#पुस्तकप्रेमी
व आज्जीने सोनालीला वाडीवर आणण्याचा हट्ट का धरला या सर्व गोष्टी उलगडत जातात.
कोकणातील निसर्गसौदर्य, नातसबंध,पडक्या वाड्यामुळे कुटुंबीयांची होणारी घालमेल या सर्व गोष्टी सुरेखरित्या मांडल्या आहेत.
आज्जीची नात सोनाली ही अमेरिकेवरुन पुण्यास आलेली असते व सहकुटुंब ते वाडीला भेट देतात. मग ती वाडी,तिथला एक पडका बंगला, दांडेकरांमधील प्रापंचिक कलह व त्याच रागात सोनालीच्या चुलत आजोबांनी सोनालीच्या आजोबा व वडीलमंडळी यांच्या वर केलेला जादूटोणा या सर्व गोष्टी तिला कशा समजतात
जिथे सध्या फक्त एक थोरली आज्जी व तिची नोकर रखमा राहत असते. वृद्धापकाळाने आज्जी मरण पावतात व अखेरची इच्छा म्हणुन त्या तिच्या नातीस काही दिवस वाडीवर वास्तव्यास येण्याची गळ घालतात.
आपण जरी दूर झालो तरी आपले त्या घटनासंबंधित विचारचक्र सुरु राहते व ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.
कथा ही दांडेकर नावाच्या पुण्यनगरीत स्थित कुटुंबाभोवती फिरते. दांडेकराची अलिबागपासुन काहीश्या अंतरावर एक ओसाड वाडी व २ बंगले असतात.
मुळात त्या पुस्तकाने मला त्याच्यापासून दुर जाऊच दिले नाही. फार कमी लेखनात अशी खिळवुन ठेवण्याची शक्ती असते.
ही एक भयकथा किंवा भूतकथा आहे. ही कथा वाचायला तुम्ही सुरवात केलीत की ती तुम्हाला खिळवुन ठेवते,
पुस्तक समीक्षण:
नारायण धारप हे नाव आपल्यातले बरेच जण ओळखुन आहेत. मराठीतील थरारकथा,रहस्यकथा,भयकता व भूतकथा लिहिण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
चेटकिण पुस्तक मला अॅमेझाॅन ईबुक विक्रीत सवलतीत मिळाले व मी ते विकत घेऊन झपाटल्यासारखे वाचून काढले.
#PP36
पुस्तक परिचय:
पुस्तक: चेटकीण
लेखक: नारायण धारप
प्रकाशन: साकेत प्रकाशन
पृष्ठसंख्या: 210
किंमत पेपरबॅक: 200 ते 222 (सवलतीनुसार),
किंडल ईबुक 40 ₹
पुस्तक बांधणी पृष्ठ दर्जा: ठीक
#पुस्तकप्रेमी
छायाचित्र साभार: आंतरजाल
जेष्ठ साहित्यिक, नाटककार श्री. रत्नाकर मतकरी यांचे कोरोनाच्या संसर्गाने आज निधन झाले.
त्यांनी मोठ्यांसाठी सत्तर, तर मुलांसाठी बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह असे साहित्यात योगदान दिले होते.
मतकरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली😢💐
#PP35
पुस्तक परिचय:
पुस्तक - अॅडम
लेखक - रत्नाकर मतकरी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 316
किंमत पेपरबॅक- 280₹, किंडल- 103₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा- उत्तम
#पुस्तकप्रेमी
छायाचित्र साभार- आंतरजाल