A fan of star footballer Lionel Messi slams TMC Ministers-
"We are very disappointed.
My child was very excited to see Messi.
I think it's a scam for the people.
When Messi arrived, everyone surrounded him."
Kolkata, West Bengal: A fan says, “This was a complete fraud. Messi was not shown at all. Only reporters, police, and TMC leaders got to see him. We paid ₹5,000 for tickets, while those who came for free were able to see Messi and leave.”
#WATCH | Kolkata: A fan of star footballer Lionel Messi says, "Only leaders and actors were surrounding Messi...Why did they call us then... We have got a ticket for 12 thousand, but we were not even able to see his face..."
Ranjit Bajaj exposes the hypocrisy of Indian Government and Indian Football Federation over Lionel Messi arrival in India.
They have money to spend crores of rupees to spend over a star Footballer but don't have money build root level infrastructure in Indian Sports and especially Football.
#LionelMessi
- The Indian government spent more than 150 crore for Lionel Messi.
- Fans went mad to see him.
- People are buying 10 lakh Rs tickets just for 1 photo with him.
- Indian politicians are hanging around with him.
But on the other side, Indian legend Sunil Chhetri was literally begging fans and the government to support the Indian football team over the years.
The hard truth is that Indians only worship foreigners but never support Indian players 💔
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue
“रोज किती सूर्यनमस्कार करावे?”
कोणी म्हणतं 12, कोणी म्हणतं 108… पण वैद्यकीय दृष्टिकोनातून यामागचं गणित काय?
1. सुरुवात ही “फॉर्म” आणि “श्वसनतंत्र” समजून घेऊनच करा
रोज फक्त 3-5 सूर्यनमस्कारही पुरेसे असतात. जर तुम्ही योग्य पद्धतीने, श्वसन समन्वय (Breath Coordination) ठेवून केले, तर.
“गतीपेक्षा स्थिरता आणि शुद्धता जास्त परिणामकारक ठरते.”
2. श्वास समन्वय म्हणजे काय?
प्रत्येक आसनामध्ये श्वास घेणे वा सोडणे एक विशिष्ट लयीत , उदा. ‘भुजंगासन’ करताना श्वास आत, ‘पश्चिमोत्तानासन’ करताना श्वास बाहेर. यामुळे parasympathetic nervous system सक्रीय होतं → मानसिक शांती, BP नियंत्रण, आणि Insulin Sensitivity सुधारते.
(Ref: J Yoga Phys Ther, 2022)
3. दररोज १२ सूर्यनमस्कार हे एक ‘वैद्यकीयदृष्ट्या पुरेसं’ प्रमाण मानलं जातं
12 सूर्यनमस्कार = 288 हालचाली → यामुळे metabolism तेज होतो, fat oxidation वाढते, आणि साखर नियंत्रणास मदत होते.
4. व्यायामाच्या स्वरूपात हे “Low-Impact Dynamic Meditation” आहे
हृदयासाठी अत्यंत सुरक्षित, स्नायू-हाडं मजबूत करणारा आणि stress hormones कमी करणारा व्यायाम.
(Ref: IJMR, 2020 : Yoga vs Aerobic comparison)
5. शरीरासोबत संवाद साधा , दम लागतोय? गुडघे दुखतात? कमी करा, थांबा, पर्याय निवडा. व्यायाम म्हणजे शिक्षा नाही , समजूतदार संवाद आहे.
6. सूर्यनमस्कार शक्य नसेल तर नियमित चालणं, प्राणायाम, योगासनं हेही उत्तम पर्याय ठरतात.
7. उपवासाच्या दिवशी सूर्यनमस्कार करताना विशेष खबरदारी ठेवा. ऊर्जा कमी असते, त्यामुळे फार exertion टाळा. प्राणायाम, स्ट्रेचिंग वा सौम्य हालचाल निवडा.
8. हृदयविकार, उच्च रक्तदाब, ऑर्थरायटीस यांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन आवश्यक. सकाळी उपाशीपोटी / भिजलेल्या चटईवर / गरम हवामानात सराव करताना सावधगिरी बाळगा.
9. डाएटिंगपेक्षा मी उपवास व सूर्यनमस्कार याला जास्त प्रभावी मानतो , क्लिनिकमध्येही याचा अनुभव घेतलाय. हा शरीर-मन संवादाचा सुलभ मार्ग आहे.
10. “संपूर्ण नाही जमलं तरी सुरूवात ही आरोग्याकडे एक पाऊल असतं.” ❤️
“सूर्यनमस्कार हा अध्यात्म, व्यायाम आणि वैज्ञानिक शिस्त यांचा संगम आहे , ती भावना समजून घेऊनच करावा.”
Follow करा, सुरुवात करा, आणि तुमचा अनुभव शेअर करा!
Dr. Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Appointment: 94229 91576
Follow 👉 @KulkarniRL
( WhatsApp message only )
#SuryaNamaskar #HeartHealth #MarathiHealth #JustForHearts #YogaTips #FitnessOver40 #CardioYoga #सकाळसूर्यनमस्कार #आरोग्यसंवाद
“सर, जाऊ नका…” गावकऱ्यांचं प्रेम, पण सिस्टिमनं डावललेला डॉक्टर!
प्रामाणिकतेला मान न देणाऱ्या व्यवस्थेचा कटू अनुभव… एका PHC डॉक्टरचं वास्तव.
🏥 पोस्टिंग: PHC मोरोची, सोलापूर जिल्हा
MBBS नुकतंच झालं होतं. सरकारची Rural Bond सेवा सुरू झाली. Class 2 Gazetted Medical Officer म्हणून नियुक्ती , नाव ‘गॅझेटेड’, पण अनुभव? पूर्णपणे अदृश्य.
✨ एकीकडे: सेवा, समाधान, आपुलकी
गावातच राहणं, शाळांमध्ये तपासण्या, महिलांचं आरोग्य, आणि सर्वात खासम्हणजे संत ज्ञानेश्वर पालखीच्या मार्गावर सोलापूर जिल्हा प्रवेश वेळी PHC म्हणून विशेष जबाबदारी.
वारकऱ्यांशी संवाद, आणि गावाचा ‘आपला डॉक्टर’ म्हणून आत्मीय स्वीकार. Job Satisfaction: 💯
⚠️ दुसरीकडे:
अपमान, हस्तक्षेप, दुःख
ब्लॉक-डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक.
लोकप्रतिनिधींचं उद्धट बोलणं , “कळत नाही तुम्हाला, आमचंच ऐका.”
न लिहिता-वाचता येणाऱ्यांकडून चौकात अपमान. PHC मध्ये 24 तास सेवा देऊनही , डॉक्टर असणं गुन्ह्यासारखं वाटायला लागलं.
🤝 गावकऱ्यांचं प्रेम हेच खरं वैभव
पोस्टिंग संपत आली. ससून ला ट्रान्सफर होणार हे कळल्यावर स्थानिक नेते स्वतः भेटायला आले.
“सर, जाऊ नका… आम्ही तुमचं ट्रान्सफर रद्द करून टाकतो!”
ते प्रेम, आदर, आणि निरागस भावनेनं भरलेलं होतं , राजकीय नव्हते.
‘लोकप्रतिनिधी’ सन्माननीय असतात… पण ‘लोकसेवक’ही कमी नाही
मी एकटाच नव्हतो , कृषी अधिकारी, शिक्षक, विस्तार अधिकारी सगळेच असंच अनुभवत होते.
तेव्हा वाटायचं IAS/IPS असाल तरच सन्मान, MBBS म्हणजे छोटं पद.
असं वाटायचं की सन्मान फक्त मोठ्या खुर्च्यांनाच मिळतो, उरलेले फक्त काम करणारे असतात. आता वाटते की तेव्हा मी फारचं निरागस व भोळा होतो.
आज दोन दशकांनंतरही शिक्षण, प्रामाणिकपणा, मेहनतीला व्यवस्थेत सन्मान नाही. आणि त्यावर निर्लज्जतेचा कळस म्हणजे काही अति-उत्साही कार्यकर्ते मेहनती अधिकाऱ्यांचं शिक्षण, परीक्षा, जात प्रमाणपत्र तपासण्याची मागणी करत आहेत.
MD झाल्यावर परत सरकारी सेवेत यावं असं मनापासून वाटलं होते. पण त्या अनुभवांनी ती इच्छा खुंटली.
चांगल्या डॉक्टरांची गरज आजही आहे, पण काम करू देणारी सिस्टिम नाही.
आजही त्या गावाशी नातं तसंच आहे. अलीकडे एका सहकाऱ्याच्या कन्येच्या लग्नासाठी PHC ला गेलो… आठवणी जाग्या झाल्या.
#PHC #RuralPosting #Solapur #Memories #JustForHearts
Imposter Syndrome :
एखादी अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे का की जी बऱ्यापैकी यशस्वी आहे, कर्तृत्ववान आहे पण तरीही समाधानी नाही, स्वतःवर विश्वास नाही, आत्मविश्वास गमावल्यासारखी वागते ? कधी कधी आपण सुद्धा असेच वागतो का ? खालील प्रमाणेच विचार आपल्यासुद्धा मनात येतात? तर मग ही पोस्ट नक्की वाचा.
इम्पोस्टर सिंड्रोम (Imposter Syndrome) म्हणजे असा मानसिक आभास ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या यश, कौशल्ये किंवा कर्तृत्व असूनही आतून आपली पात्रता नाही, आपण खोट्या पद्धतीने इतरांना फसवत आहोत,इतरांच्या आपल्या पात्रतेबाबतच्या संकल्पना चुकीच्या व अवास्तव आहेत अशी भावना असते.
1. वैशिष्ट्ये
•स्वतःबद्दल शंका – “मी याच्या खरंच लायक आहे का?” असा सतत प्रश्न पडतो.
•यशाचे श्रेय बाह्य घटकांना देणे – माझी काही पात्रता क्षमता नाही पण “माझं नशिब चांगलं होतं”, “इतरांनी मदत केली म्हणून झालं”, असं वाटणं.
•उघडे पडण्याची अनाठायी भीती – कधीतरी लोकांना कळेल की मी खराखुरा सक्षम नाही अशी भीती वाटत राहते.
•परिपूर्णतावाद (Perfectionism) – अगदी किरकोळ चुका जरी झाल्या तरी स्वतःला अपात्र, अक्षम समजणे.
2. कोणाला जास्त अनुभव येतो?
•विद्यार्थी
• नोकरीत नवीन असलेले लोक.
• खेळाडू
•उच्च यश मिळवलेले व्यावसायिक (डॉक्टर, प्राध्यापक, नेते, कलाकार).
•स्त्रियांमध्ये व अल्पसंख्याक समुदायांमध्ये ( धार्मिक नव्हे ) तुलनेने जास्त आढळतो.
3. कारणे
•बालपणातील तुलनात्मक वातावरण, हीन पणाची वागणुक मिळालेली असणे. (भाऊ/बहिणींपेक्षा मी कमी आहे असं वाटणं).
•अवास्तव परिपूर्णतेकडे ओढ.
•समाजाच्या अपेक्षा व दडपण.
•नवीन संधी किंवा मोठं यश मिळाल्यावर अंतर्गत असुरक्षितता.
4. परिणाम
•ताण व चिंता वाढते.
•आत्मविश्वास कमी होतो.
•नवीन संधी टाळण्याची प्रवृत्ती.
•मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम.
5. उपाय
•स्वतःच्या बळावर यश मिळाल्याचे स्वतःशी कबुल करा – मेहनत केली होती, क्षमता होती म्हणुन यश मिळाले या वस्तुस्थितीचा स्वीकार करा.
•जर्नल लिहा – आपल्या कामगिरी व प्रगतीची नोंद ठेवा.
• मेडिटिशन, माईंड फुलनेस
•सकारात्मक अभिप्राय स्वीकारा – इतरांचे कौतुक दुर्लक्षित न करता आत्मसात करा.
•मेंटरशी बोला – अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या.
•थेरपी/कौन्सेलिंग – सततची समस्या असल्यास व्यावसायिक मदत घ्या.
थोडक्यात
👉 इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे स्वतःच्या यशावर विश्वास न ठेवणे व आपली पात्रता नाही अशी खोटी भावना.
👉 तोडगा म्हणजे स्वतःला स्वीकारणे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, त्यासाठी सकारात्मक वाक्यांची सातत्याने उजळणी करणे, यशाची नोंद ठेवणे, व गरज असल्यास व्यावसायिक मदत घेणे.
डॉ प्रशांत भामरे.
“तिचं रक्त कोणालाही जुळलं नाही… कारण तिचा रक्तगट जगात कधीच पाहिलेला नव्हता!”
एका भारतीय महिलेने असा इतिहास घडवला, जो आजवर कधीच नोंदवला गेला नव्हता.
वाचा थरारक थ्रेड 👇
गड-किल्ले – शरीरासाठी व्यायामशाळा, मनासाठी प्रेरणा!
आज अनेक जण नियमित गड-किल्ले चढतात…पण काही अजूनही विचारात – “आपण करू शकतो का?”
👉 हो, नक्की करू शकता. आणि करायला सुरुवात आजच करा!
1️⃣ सिंहगड, पन्हाळा, राजगड , रायगड , लोहगड इ – हे सगळे गड-किल्ले म्हणजे नैसर्गिक Gym!
Climbing = Strength + Cardio + Endurance
2️⃣ हातात काठी, पाठीवर पाण्याची बॅग आणि डोक्यात छत्रपती शिवराय – याहून Powerful work out कोणते?
3️⃣ व्यायाम न करणाऱ्यांसाठीही perfect start – No machines, no excuses!
4️⃣ सतत चढ-उतारामुळे पायातली ताकद, फुफ्फुसांची capacity , VO2 Max वाढते.
5️⃣ स्नायूंना प्रत्यक्ष कामाची सवय लागते – इथे gym सारखा cheat day नाही! आणि हो… खाल्लेलं व्यवस्थित पचते – guilt-free Sunday!
6️⃣ सूर्यप्रकाश, थंड हवा, हिरवळ – perfect natural mood booster + Vitamin D.
7️⃣ एकदा consistency आली की fit राहणं हे trend नाही, “नविन नॉर्मल” बनतं.
7️⃣ Regular गेलं, की वजन कमी होणं, ऊर्जा वाढणं – हे side effects होतात!
8️⃣ गड-किल्ले हे इतिहासाचे साक्षीदार आणि तुमचे मजबूत फिटनेस कोच आहेत.
🔟 छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे गड-किल्ले फक्त लढायांचे स्मारक नाहीत,
तर आजच्या पिढीसाठी प्रेरणा, आरोग्य आणि जबाबदारीचं प्रतीक आहेत.
🌍 नुकतेच १२ गड किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले. त्यांना स्वच्छ, शांत आणि सन्मानपूर्वक जपणं आपलं कर्तव्य आहे.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
#गडचढाई #FortFitness #HeritageAndHealth #WorldHeritageForts #NoPlasticOnForts #FitnessWithPride #JustForHearts
"'एकाकीपणा' ही एक किंमत आहे, माणूस जेव्हा त्याचं आयुष्य सुधारू लागतो, तेव्हा त्याला ही किंमत द्यावी लागते."
तुम्हालाही कधी जाणवलंय का? ती थंड शांतता?
पुरुष बनण्याची हीच तर किंमत आहे...
जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मूर्खपणाला कंटाळता, तेव्हा पार्ट्या कमी होतात. मित्र मैत्रणींचे-नातेवाईकांचे
फोन तुम्हाला येणं बंद होतात. लोकं तुम्हाला विचारायची बंद होतात.
ते तुमचा द्वेष करतात, म्हणून नाही, तर तुम्ही जो माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहात, त्याला ते हाताळू शकत नाहीत म्हणून...
तुम्ही लवकर उठता, एकटेच. उशीरापर्यंत काम करता, एकटेच. शारीरिक-मानसिक थकव्यांनी तुटता, एकटेच.
तुमच्या प्रयत्नांसाठी कोणीही टाळ्या वाजवत नाहीत.
कारण खरं परिवर्तन तर अंधारातच होतं, रक्तस्त्राव झालेल्या बोटांनी आणि छिन्न विछिन्न हृदयानं...
तुम्ही लोकांना गमावता. ते बदलले म्हणून नाही- पण तुम्ही बदललात म्हणून. आणि तुमची वाढ त्यांना घाबरवते, ज्यांना फक्त तुमची कमकुवत आवृत्ती माहित होती.
तुम्ही तुमच्या खोलीत बसून भिंतीकडे पाहत राहता. इच्छा, पश्चात्ताप, शंका, लाज यांच्याशी झुंजत राहता...
तुमच्या डोक्यातला एक आवाज घुमत असतो: "हार मान. जा परत."
तोच खरा शत्रू असतो. हीच तर तुमची खरी परीक्षा असते.
आणि बहुतेक पुरुष त्यात अपयशी ठरतात.
पण तुम्ही?
तुम्ही चालत राहता. अपराधातून. दुःखातून. भयानक नरकातून.
कारण, तुम्हाला माहिती आहे- जो आगीतून प्रवास करतो, तो वेगळ्या पद्धतीने चालतो.
तुम्ही तुमचे काही भाग गाडून टाकता.
एक चांगला माणूस,
लोकांना आनंद देणारा,
सगळ्यांना मदत करणारा,
हांजी हांजी करणारा...
तो येथे मरतो म्हणूनच तर क्रूर-निर्दयी उठू शकतो. एक नेता उदयास येऊ शकतो.
हे नैराश्य नाही. ती एक रचना आहे, एक बांधकाम आहे.
तुम्ही हरवलेले नाहीत. तुम्ही पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत आहात.
आणि हो, ते दुखतं. पण वेदनेनंतर काय जन्माला येते? असा माणूस, ज्याला कोणीही विसरू शकत नाही.
मी खूप वेळा अनुभवलं आहे. ज्या क्षणी माणूस दारू पिणं थांबवतो, लोक त्याला कंटाळवाणा म्हणतात. ज्या क्षणी तो अति बोलण्यास नकार देतो, तो अहंकारी असतो.
ज्या क्षणी तो लक्ष विचलित करण्यापेक्षा शिस्त निवडतो, त्याला दूर केलं जातं.
आणि हळूहळू... शांतता त्याचा एकमेव मित्र बनते.
तुमचं जीवन सुधारणं हे धुमधडाक्यात होत नाही. ते टाळ्या किंवा जयजयकारांनी वेढलेलं नाही.
ते शांत आहे. क्रूर. एकाकी.
तुम्ही एकटेच जेवता. एकटेच झोपता. अंधारात राहता. सावलीत स्वतःला भरडता.
ना कोणतीही ओळख, ना कोणाची मान्यता.
फक्त तुम्ही आणि तुमच्या डोक्यातलं युद्ध.
इतरांना समजत नाही की तुम्ही का उत्तर देत नाही आहात. तुम्ही पार्टी का करत नाही आहात. तुम्ही आता "मजेदार माणूस" का नाही आहात.
पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एका गुलामासारखे जगणं आता संपवलं आहे. तुम्हाला नष्ट करणाऱ्या सवयींना, तुम्हाला थकवणाऱ्या लोकांना, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूतकाळाला, तुम्ही मागे टाकलं आहे.
एक लक्षात घ्या, स्व-शिस्तीच्या मार्गावर जाणारा माणूस इतरांसाठी वाईट किंवा धोका असतो.
कारण आता, त्याला हाताळणे सोप्पं नाहीय. आता, त्याला मर्यादा आहेत. आता, त्याला श्वास घेण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही.
हो, हा एकटेपणा आहे. हो, तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल.
पण हा एकटेपणा... ही शांतता...
ही शिक्षा नाहीय. हे अश्या बनावटीचं बांधकाम आहे, जिथे खरे पुरुष घडवले जातात..
आणि जेव्हा तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर पडता, तेव्हा- तुम्हाला जगाचं लक्ष वेधून घेण्याची इच्छा होणार नाही. त्यांना तुम्हाला आदर 'द्यावा' लागेल....
सध्या तुम्ही अश्या प्रकारच्या टप्प्यात असाल तर- जिथे तुम्हाला असं वाटतंय की संपूर्ण जग तुमच्यासोबत शांत झाले आहे...
तिथेच राहा.
तिथेच काम करा.
तिथेच घाम गाळा.
सर्व काही सहन करा.
कारण,
तिथेच तुमच्यातील बालिश मुलगा मरून 'पुरुष' जन्माला येत आहे...!!!😊😊😊