Tomorrow, as we celebrate India’s Independence Day, it is worth remembering the history of our Indian flag 🇮🇳 , and those who once opposed it.
On August 14, 1947, the RSS mouthpiece Organiser published a scathing editorial declaring that Indian flag will "never be respected and owned by the Hindus. The word three is in itself an evil, and a flag having three colours will certainly produce a very bad psychological effect and is injurious to a country."
For over 50 years following independence, the RSS refused to hoist or salute the Indian flag at their headquarters in Nagpur, instead giving prominence to its own Bhagwa Dhwaj.
Dr. Babasaheb Ambedkar played an instrumental role in shaping modern India's constitutional and national identity, including the adoption of the Ashoka Chakra on the Indian flag and Ashoka’s Lion Capital as the National Emblem.
Babasaheb later explained the significance of these symbols.
“Even though Buddhism is almost extinct in India, yet it has given birth to a culture, which is far better and richer than the Brahminic culture. When the question of the national flag and the national emblem was being considered by the Constituent Assembly we could not find any suitable symbol from the Brahminic culture. Ultimately, the Buddhist culture came to our rescue and we accepted the Wheel of Law (Dhamma-Chakra) as the national symbol.”
So, as we celebrate Independence Day, let us remember history honestly. The Indian flag that we proudly salute today was rejected by the RSS, and the symbols of Ashoka and Dhamma that define our modern identity were championed by Babasaheb.
Jai Bhim. Jai Bharat.
जरा विचार करा...
आज विज्ञान इतकं प्रगत झालंय की कोविड सारखा वायरस ज्याला शंभर पट बारीक करून ही आपण पाहू शकतोय तर.. पृथ्वीवरून थेट मंगळावर असलेलं यान आपण इथे बसून ऑपरेट करू शकत आहोत. अब्जावधी वर्षांपूर्वी घडलेल्या ताऱ्यांच्या स्फोटांना टिपणाऱ्या महाकाय दूर्बीणी आपण तयार केल्या आहेत. सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे आणि बाकीचे ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत हे जे काही गृहीतक आपण शाळेत शिकलो ते गृहितकही अर्धवट असल्याचं सिद्ध झालंय. सूर्य सुद्धा स्वतःभोवती फिरताना त्याची कक्षा पूर्ण करत अतिशय वेगाने फिरतोय. जपान मध्ये कँसरची वॅक्सिन सुद्धा आलीये. त्याची चाचणी जवळपास यशस्वी ठरलीये. अगदी भारतातही यशस्वी झालीये. येत्या काही वर्षांत कर्करोगासारखा असाध्य आजारही वॅक्सीनच्या बळावर पूर्णतः बरा होऊ शकतो. अफाट पसरलेल्या विश्वाचा पसारा आपण प्रकाशवर्षांनी मोजू लागलो आहोत. तर्क, विज्ञान सारं काही रोज डेवलप करतो आहोत. मोबाईल क्रांती, एआय क्रांती किती भन्नाट आहे हे आपण पाहतोय. भूतं, आत्मा, पॅरानॉर्मल वगैरे सगळं थोतांड आहे. देव वगैरे सगळ्या भ्रामक कल्पना आहेत हे विज्ञानाने सिद्ध केलंय. कारण जर देव असता तर मग डायनॉसोर प्राण्याचा देव कोणता हा प्रश्न देखील विचारायला शिकलोय.
तरी देखील... आजच्या काळात आपल्या डोक्यावरचं बुवा, बाबा, अम्मा टम्माचं भूत काही केल्या उतरायला तयार नाही. नरबळीने आपल्याकडे संपत्ती येईल या अंधश्रद्धेत जगणारे कमी नाहीत. बाळंतपणात बाई मेली की तीचं विद्रूपीकरण करून तीला पुरण्याची अघोरी प्रथाही बंद झालेली नाही.. एक बोलायला गेलं तर हजार गोष्टी निघतील. आणि हे कधी घडतंय तर आजच्या विज्ञानयुगात...
मग विचार करा.. जेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं. विजा चमकणं, पाऊस पडणं, चंद्राची कला बदलणं जेव्हा चमत्कार मानलं जात होतं तेव्हा या धर्माच्या पंड्यांनी किती वेड्यात काढलं असेल बरं लोकांना.. किती शोषण केलं असेल आणि त्यांचे काय काय हाल केले असतील..
नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो भीतीनं...
जरा विचार तर करून पहा.
माणूस जगतो का? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो.
कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मरण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे.
- लोकशाहीर - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
( दलित साहित्य संमेलन प्रथम - २ मार्च १९५८ )
#मराठी #साहित्य #संस्कृती #समाज #भारत #महाराष्ट्र #अण्णाभाऊ_साठे #लोकशाहीर
जोवर लोकांना गाड्या, घोडे, मोठमोठाली घरे, महागडे Home Interior, लवाजमा (श्रीमंतीचे प्रदर्शन) करण्याचा सोस राहिल, तोवर माणसे कायम अतृप्त राहतील. जे हा लवाजमा बाळगून आहेत तेसुद्धा (कारण यांना आता जे आहे त्याच्या आणखी पुढे जायचे आहे) आणि ज्यांना उभ्या जन्मात हा लवाजमा मिळवता येणार नाही तेसुद्धा.
काही लोक जे हे घेऊ शकतात, मिळवू शकतात त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या समृद्ध बाबींत समाधान मिळणार नाही, जे मिळवू शकत नाहीत, ते त्यांच्याकडे हे कधीच येऊ शकणार नाही, याने कायम खजील असतील.
मार्केटने सारा अतृप्त लोकांचा कल्लोळ उभा केला आहे. यांना समाधान म्हणून नाही. त्यामुळे माणसे तिशी पस्तीशीतच मानसिक आजारांनी ग्रस्त झाले आहेत, आलेल्या ह्या मानसिक आजारांमुळे शारीरिक आजारांचे प्रमाण वाढले आहे.
आपल्या जीवनातील ऐंशी टक्के आर्थिक निर्णय हे आपल्यामध्ये मार्केटने निर्माण केलेल्या अपूर्णतेने प्रभावित झालेले आहेत, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, तेव्हा आपल्याला जीवनात सजग निर्णय घेण्याची बुद्धी येईल.
#randomthoughts
जय भीम,
भारत देशातील शोषणाविरोधातील लढ्याचा आवाज म्हणून जर कोणाकडे पाहिले जात असेल तर ते फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच !
जेव्हा एका ठराविक समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते... जेव्हा शूद्रांना पाण्याजवळही जाऊ दिले जात नव्हते. तेव्हा त्यांनी अख्खा तलावच संघर्ष करून उघडा करून दिला. ज्या मनुस्मृतीचा पगडा अनेक शतके या देशाच्या मानगुटीवर होता.ती मनुस्मृतीच त्यांनी जाळून टाकली.
रूपयाचे महत्व काय आणि त्यासमोरील समस्या काय, हे त्यांनी पुस्तकात वर्णन करून इथल्या रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी शिक्षणातील जेवढ्या पदव्या घेतल्या; तेवढ्या पदव्या या देशात आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेले नाही. त्याही साध्यासुध्या विद्यापीठातील नाही तर कोलंबिया, हार्वर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातील नंबर एकवर असलेल्या विद्यापीठातून घेतल्या.
हे यासाठी महत्वाचे आहे की आहे की, जेव्हा ते व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोक्यात होते की, "मला स्वतःला वर्गात न बसताच शिक्षण घ्यावे लागले." कदाचित अनेकांना हे माहित नसेल की त्याकाळातील जातीव्यवस्थेमुळे त्यांना वर्गातही बसू दिले नव्हते. वर्गाबाहेर बसून त्यांना अभ्यास करावा लागला होता.
स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले. ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले अन् भारताचे संपूर्ण संविधान त्यांनी हाताने लिहिले; ते लिहित असताना त्यांनी जगातील सर्व देशांची संविधाने अभ्यासली, जगातील सर्व धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि भारताला अनेक युगे कामाला येईल, भारताला एकसंघ ठेवेल, असे संविधान त्यांनी तयार केले. पण, हे लिहिताना त्यांनी सर्वांना सांगितले की, "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा !"
आधी शिका... शिक्षणाला अभूतपूर्व महत्व आहे, हे त्यांनी आधीच ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या ताकदीवर पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सिद्धार्थ महाविद्यालय आणि छत्रपती संभाजी नगरचे मिलींद काॅलेज ही त्यांचीच अपत्ये ! म्हणून जेव्हा कुठल्याही व्यवस्थेविरुद्ध, कुठल्याही अन्याय - अत्याचाराविरूद्ध घोषणा द्यायची असते तेव्हा मनातूनच एक घोषणा येते, ती असते ... जय भीम !!
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी, संत जनाबाई, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार, संत चोखोबा, संत दामाजीपंत, संत दासोपंत, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज….
आयुष्य समृद्ध करणारी एवढी मोठी संतपरंपरा व मनुष्य धर्माचे सार समजून सांगणारे संत साहीत्य महाराष्ट्रात अस्तित्वात असताना आज आपल्याला माणसामाणसात भेद निर्माण करणार्या उत्तरेतील बागेश्वर बाबा सारख्या भोंदूबाबाच्या प्रवचनाची गरज पडत असेल तर हे महाराष्ट्रधर्माच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणे आहे.
- अजय जाधवराव
दरवर्षी बौद्ध मोठ्या उत्साहात म.फुले जयंती साजरी करतात.म.फूलेंचे 95% पूतळे बौद्ध वस्तीतच आहेत.
गेल्या 1-2 वर्षापासून माळी समाजाने म.फुले जयंती साजरी करायला सुरुवात केली.
जयंतीमध्ये कहर म्हणजे जय श्री राम लिहिलेले झेंडे, सावता माळी चे पोस्टर, हिंदुत्व विचारधारेचे गाने वाजवतात.
सगळ्यांना चवदार तळे सत्याग्रह माहिती आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का 👇
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील जल (water) व्यवस्थापनाचे आद्य प्रवर्तक आणि आधुनिक भारतीय जलनीतीचे जनक मानले जातात. संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच, त्यांनी देशातील जलसंपत्तीचे( फक्त दलितांसाठी नाही बरका) नियोजन, सामाजिक न्याय आणि तांत्रिक प्रगती यांचा मेळ घालणारी दृष्टी दिली.
१. संस्थात्मक पायाभरणी
व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत (१९४२-४६) कामगार मंत्री असताना त्यांनी आजच्या जल व्यवस्थापनाचा पाया रचला:
* केंद्रीय जल आयोग (CWC): त्यांच्याच सल्ल्यानुसार १९४५ मध्ये 'सेंट्रल वॉटरवेज, इरिगेशन अँड नॅव्हिगेशन कमिशन' (CWINC) ची स्थापना झाली.
* सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड: जल व्यवस्थापन आणि वीज निर्मितीचे एकत्रीकरण करण्यासाठी त्यांनी या बोर्डाची निर्मिती केली.
२. बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प
एकाच प्रकल्पातून सिंचन, पूर नियंत्रण, जलवाहतूक आणि जलविद्युत निर्मिती व्हावी, या 'बहुउद्देशीय' संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला:
* दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC): अमेरिकेच्या 'टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी'च्या धर्तीवर साकारलेला हा भारताचा पहिला बहुउद्देशीय प्रकल्प होता.
* हिराकूड धरण: ओडिशामधील महानदीच्या पुरावर नियंत्रण मिळवून तिथल्या शेतीचा कायापालट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
* भाक्रा-नांगल आणि सोन्या नदी प्रकल्प: या विशाल प्रकल्पांचे धोरणात्मक आराखडे त्यांच्याच कार्यकाळात तयार झाले.
३. कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा
पाणी हे सार्वजनिक संसाधन असून त्यावर राज्याचे नियंत्रण असावे, अशी त्यांची भूमिका होती:
* घटनात्मक तरतुदी: त्यांनी संविधानात कलम २६२ समाविष्ट केले, जे संसदेला आंतरराज्यीय नदी पाणी तंटे सोडवण्याचा अधिकार देते.
* नदी जोड प्रकल्प: दुष्काळी भागांना पाणी पोहोचवण्यासाठी नद्या जोडण्याच्या कल्पनेचे ते सुरुवातीचे समर्थक होते.
* रिव्हर बोर्ड ॲक्ट (१९५६): आंतरराज्यीय नद्यांच्या विकासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा तयार करण्यात आला.
४. पाण्याचे सामाजिक महत्त्व
डॉ. आंबेडकरांसाठी पाणी केवळ संसाधन नसून तो सामाजिक मुक्तीचा मार्ग होता:
* चवदार तळे सत्याग्रह (१९२७): महाडमध्ये सार्वजनिक तळ्याचे पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला. पाणी मिळवणे हा मूलभूत मानवी हक्क असल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले.
* समानता: वंचित घटक आणि दलितांना पाण्याचे न्याय्य वाटप व्हावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला.
त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच भारत सरकार त्यांच्या जन्मदिनी, म्हणजेच १४ एप्रिल रोजी 'राष्ट्रीय जल दिन' साजरा करते.
#जयंती #भीमजयंती #ambedkarjayanti #14एप्रिल
कुठल्याही मनुष्यामध्ये कुठलीही दैवी किंवा अलौकिक शक्ती नसते.
कुणाचीही भक्ती करू नका, सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत. कुणालाही भविष्याचा वेध घेता येत नाही. सर्व प्राणी मर्त्य आहेत. त्यांना सर्व वासना आहेत.
आई-वडिलांशिवाय कुणाचेही पाय धरू नका. कुणालाही डोक्यावर हात ठेवू देऊ नका. कुणाचे शिष्य बनू नका, कुणाचे गुरू बनू नका. मनःशांती साठी अनेक वैज्ञानिक मार्ग उपलब्ध आहेत.
संत गाडगे महाराजांची जयंती..
काय बोलावं त्यांच्याबद्दल??आज एवढे शिकलेले लोक कुठलाही तर्क न लावता..सरळ दगडासमोर डोकं टेकतात..लाखो रुपयांच्या पूजाअर्चा करतात..भक्तीत पागल होतात..त्यावेळी आश्चर्य वाटतं..की या पुरोगामी महाराष्ट्रात एक असा संत होऊन गेला..जो अशिक्षित असूनही त्याला इतरांपेक्षा जास्त ज्ञान होतं..जो देवाच्या कल्पनेला घाबरत नव्हता..एवढंच नाही तर त्याने देवाच्या भक्तीत पागल झालेल्या लोकांना किर्तनातून देवाविषयीची संकल्पना बदलण्याचा प्रयत्न केला..कर्मकांड,अंधश्रद्धा अज्ञान,अनिष्ठ रुढी परंपरा यांना प्रबोधनाच्या झाडूने झाडून टाकलं..आणि लोकांना विवेकवादाकडे वळण्यासाठी प्रवृत्त केलं..या महाराष्ट्रातली ही विवेकवादी तार्किक दृष्टिकोन बाळगणारी संतपरंपरा कुठे गायब झाली हा नेहमी प्रश्न पडतो..नागड्या उघड्या बाबांच्या चमत्कारांवर आजकाल मालिका निघतात..ज्यातून चमत्कार आणि देवाची भीती लोकांच्या मनात खोलवर रुजवली जाते..आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने जागृती आणणार्या दाभोळकर,पानसरे यांसारख्या माणसांचा खून केला जातो..हे कुठेतरी बदलायला हवं..डोकी गहाण ठेवून कुठल्याही गोष्टीला प्रश्न न विचारता फक्त वर्षानुवर्ष चालत आलं म्हणून चालू ठेवणं..हे घातक आहे..महाराष्ट्रातल्या अशा संतांची ओळख लहानपणापासून मुलांमध्ये रुजवायला हवी..
विनम्र अभिवादन गाडगेबाबा..🙏
#gadgebaba #gauravsarjerao #illustration #rational #maharashtra
महाशिवरात्री बाबत माझ्या कालच्या विचारावर
एका अंधभक्ताने कॉमेंट करून ठणकावून सांगितले.
“पुरोगामीत्व सुद्धा अंधश्रद्धा आहे,”
वाक्य लहान. अज्ञान प्रकांड!!
हा माणूस साक्षर आहे म्हणे.
पदवीधर असावा.
पुस्तके वाचली असतील.
पण विचार? बंद कोठडी!
कारण शिक्षण आणि प्रबोधन यात फरक असतो.
पदवी आणि विवेक यात अंतर असते.
अक्षर ओळखणे सोपे.
अर्थ ओळखणे कठीण.
“अज्ञानाची हजारो वर्षांची मक्तेदारी” जपणाऱ्या कंपूचा हा वारसदार.
त्या परंपरेचा ठाम भक्त.
जिथे प्रश्न विचारणे पाप.
संशय बंड.
विज्ञान त्यांना पापासमान.
पुरोगामीत्व म्हणजे काय?
तर्क.
चिकित्सा.
मानवकेंद्री मूल्ये.
समता.
स्वातंत्र्य.
बंधुता.
मग, पुरोगामीत्व हे अंधश्रद्धा कसे?
नाही,
ते तर अंध:श्रद्धेला प्रश्न विचारते.
कारण ते परंपरेला कसोटी लावते.
कारण ते सत्तेला आरसा दाखवते.
ज्यांची सत्ता अज्ञानावर उभी आहे,
त्यांना प्रकाश शत्रू वाटतो.
ज्यांची प्रतिष्ठा मिथ्यावर उभी आहे,
त्यांना सत्य विघातक वाटते.
अंधश्रद्धा म्हणजे प्रश्न न विचारणे.
पुरोगामीत्व म्हणजे प्रश्न विचारणे.
दोन्ही समान म्हणणे म्हणजे
अंधार आणि प्रकाश एकच म्हणणे.
ही बुद्धी क्षीणतेची शोकांतिका आहे.
की विनोद?
कळत नाही.
पण एवढे निश्चित —
पुरोगामीत्व अंधश्रद्धा नाही.
ते अंधश्रद्धेचे प्रतिपक्ष आहे.
अज्ञानाच्या मक्तेदारीवर चाललेला खटला आहे.
आणि म्हणूनच त्याला बदनाम करण्याची धडपड आहे.
इतिहास साक्षी आहे.
प्रश्न विचारणाऱ्यांची नेहमीच हेटाळणी होते!
नंतर त्यांनाच दूरदर्शी म्हटले गेले.
अंधभक्ताची कीव करावी?
कदाचित.
हसावे?
कदाचित.
पण सर्वात आधी —
त्याला आरसा द्यावा.
कारण त्याला भीती पुरोगामीत्वाची नाही.
त्याला भीती आहे विचारांची.
-महेश झगडे
सूर्याला काहीही फरक पडत नाही: ‘मकरसंक्रांती’ नावाची मानवी गोष्ट
सर्वप्रथम एक कटू सत्य मान्य करूया—सूर्याला मकरसंक्रांती माहित नाही. त्याला उत्तरायण, दक्षिणायन, पुण्यकाल, महापुण्यकाल, दान, उपवास, कीर्तन, भाषण—कशाचाच काहीही फरक पडत नाही.
तो फक्त हायड्रोजन जाळतो. तेही अब्जावधी वर्षांपासून. मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून.
उरलेले सर्व अर्थ—आपण घडवलेले आहेत.
उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही?
जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास ‘शुभ’ असेल, तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास ‘अशुभ’ असलाच पाहिजे.
पण तसे कुठे घडते?
दक्षिणायनात:
* पीक येते
* मूल जन्माला येते
* लग्नं होतात
* उद्योग चालतात
* संस्कृती नष्ट होत नाहीत
मग काय बिघडते?
काहीच नाही.
मग प्रश्न असा आहे की शुभ-अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचे लेबल?
रात्र वाईट नाही. हिवाळा शाप नाही. अंधार म्हणजे अधःपतन नाही.
हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत.
दिशा निसर्गाला कळत नाहीत
उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम—या दिशा माणसाने शोधलेल्या नाहीत, माणसाने ठरवल्या आहेत. निसर्गाला दिशा नसतात. त्याला फक्त बलं (forces) कळतात.
सूर्य “मकर राशीत प्रवेश करतो” ही भाषा वैज्ञानिक नाही; ती सांस्कृतिक आहे. आकाशात कुठेही मकर राशीची पाटी लावलेली नाही. सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही.
मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिकटवले.
सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हते—का?
हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे, म्हणून तो विचारला जात नाही.
सिंधू संस्कृती—इतकी प्रगत, इतकी नियोजित, इतकी शिस्तबद्ध— पण तिथे:
* उत्तरायण नाही
* दक्षिणायन नाही
* सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही
का?
कारण त्या लोकांना निसर्गाशी जगायचं होतं, त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता. त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती, पोएटिक नव्हती.
म्हणजेच— सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ देणे हे अपरिहार्य नाही; ते सांस्कृतिक आयात आहे.
युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली अध्यात्मिक गोष्ट
मग हे उत्तरायणाचं ‘शुभत्व’ कुठून आलं?
त्याचं उत्तर वेदात नाही, तर भूगोलात आहे.
स्टेपी प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे. हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन, रशिया, मध्य आशिया. तिथे हिवाळा म्हणजे:
* मृत्यू
* हालचाल थांबलेली
* अन्नटंचाई
* जीवनाचा प्रश्न
तिथे सूर्य उत्तर दिशेने येणं म्हणजे जगण्याची परवानगी.
म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरं करत. ते धर्म नव्हतं—ते सुटकेचं समाधान होतं.
जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक ३९०० वर्षापूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले, तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला.
भारताला त्याची गरज नव्हती. पण कथा टिकून राहिली.
भूगोल जेव्हा देव बनतो
भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललं असतं. पण एकदा एखादी गोष्ट ‘पवित्र’ ठरली की, ती प्रश्न विचारायला बंदी घालते.
आणि इथेच समस्या सुरू होते.
आपण भूगोलाला देव बनवतो, हवामानाला तत्त्वज्ञान बनवतो, आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो.
शेतीला देव लागत नाही
शेतीला पाऊस लागतो. माती लागते. कष्ट लागतात.
देव, पुण्यकाल, संक्रांती—हे सर्व नंतर जोडलेलं आहे.
प्रथम गरज होती. मग निरीक्षण. मग सवय. मग विधी. मग धर्म.
हा क्रम उलटा सांगितला जातो—हीच फसवणूक आहे.
सूर्याला आपण महत्त्वाचे नाही
हे स्वीकारणं अवघड आहे, पण आवश्यक आहे:
* सूर्य आपल्यासाठी उगवत नाही
* ऋतू आपल्यासाठी बदलत नाहीत
* विश्व आपल्याला अर्थ देत नाही
अर्थ आपणच तयार करतो.
आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो.
निष्कर्ष: मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं
मकरसंक्रांती साजरी करू नये असं नाही. पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये.
ती एक सांस्कृतिक आठवण आहे—युक्रेनच्या थंडीची, मानवी भीतीची, आणि सुटकेच्या आनंदाची.
सूर्य काही देत नाही. तो फक्त असतो.
अर्थ हवा असेल, तर तो आपण निर्माण करूया—खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय.
कारण शेवटी एकच सत्य उरतं:
विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही.पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो.
आणि तोच खरा ‘उत्तरायण’ आहे.
-महेश झगडे
शिक्षण घेऊन पुरेसे वेतन देणारी नोकरी मिळत नाहीये , स्वयंरोजगारीतून पुरेसे मासिक उत्पन्न मिळत नाहीये ,
वय वाढलेली तरुण मुले घरात / अड्यावर स्मार्टफोन मध्ये दिवसभर डोके घालून आहेत , रात्री अपरात्री घरातून जातात / आणि कधी येतात कळत नाहीये
लग्न करावेसे वाटणारे तरुण / तरुणी आपल्या संसार थाटायची / मुले जन्माला घालायच्या स्वप्नांचे स्वतःहून मनातल्या मनात गर्भपात करत आहेत
शेतीत घातलेले पैसे देखील आलेल्या पिकातून परत मिळत नाहीयेत , बुडालेल्या पिकाची पुरेशी नुकसानभरपाई विमा कंपन्या देत नाहीयेत ,
कुटुंबातील पाचवीला पुजलेले आजारपणाचे खर्च उरावर येत चाललेत; आरोग्याच्या गंभीर ट्रीटमेंट वर न परवडणारा खर्च झाल्यामुळे कर्जबाजारीपणा आलेला आहे
वाढत्या पर्यावरणीय अरिष्टांमुळे घर , शेती, धंदा व्यवसाय , आजुबाजुंच्या विदीर्ण झालेल्या पायाभूत सुविधा मुळे आयुष्य मेटाकुटीला आले आहे
दर आठवड्याला / महिन्याला भरायचा ईएमआय नीट झोप लागू देत नाहीये
असे असंख्य असह्य झालेले आक्रोश पुन्हा पुन्हा वरकरणी स्थिर वाटणाऱ्या जमिनीला तडे देऊ पाहतात. ठीकठाक वाटणारी घडी बिघडवू पाहतात
_____________________
पण तसे होत मात्र नाही
कारण अनेक मार्गानी एकामागून एक येणाऱ्या महाकाय डम्पर मधून डेब्रिजचे ढिगावर ढीग रिते केले जातात. जमिनीतून बाहेर येऊ पाहणाऱ्या त्या अक्रोशांना ढिगाऱ्याखाली गाडू पाहतात
एका डम्पर मधून जीडीपीचे आकडे , जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था , सेन्सेक्स, विविध परकीय संस्थांची सर्टिफिकेट ओतली जातात
दुसऱ्या डंपरमधून किसान सम्मान , लाडकी बहीण, लखपती दीदी, आणि अनेक योजना ओतल्या जातात
तिसऱ्या डंपरमधून धार्मिक / जातीय अस्मिता आणि इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या कथांच्या , नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांच्या लेक्चरच्या, बाबा , बुवांच्या कथांच्या , नटनट्यांच्या, क्रिकेटपटूंच्या व्यक्तिगत आयुष्यातील मसालेदार गॉसिप्सच्या बातम्या ओतल्या जातात
____________________
ज्या ज्या ठिकाणी जमिनीखालील आक्रोश जमिनीला तडे देईल असे वाटेल त्या त्या ठिकाणी आवश्यक ते आणि आवश्यक तेवढे आणि आवश्यक तितका काळ डेब्रिज पुरवणारे डम्पर कंत्राटदार तयार झाले आहेत
डम्पर डेब्रिज ओतत असतांना काही गडबड झालीच तर त्याच्या पलीकडे , कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली दांडुके, बंदुका घेतलेली दंडसत्ता उभी आहे
संजीव चांदोरकर (१९ डिसेम्बर २०२५)
मी स्वतः जन्माने ब्राह्मण. उच्च नाही पण निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. सोशल कॅपिटल मुळे सहजपणे मिळालेले उच्च शिक्षण वगैरे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख झाली कॉलेजच्या दिवसात डाव्या चळवळीशी संबंध आल्यानंतर. सामाजिक / राजकीय ऍक्टिव्हिज मधून ग्रामीण भाग, मुंबईतील झोडपडपट्या यातून फिरणे झाले. त्या टीनएज मध्ये अंतर्बाह्य हादरलो होतो.
वाचनातून , आकडेवारीतून , अभ्यासातून अधिक कळत गेले. देशातील ८० ते ९० टक्के स्त्री, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे अशीच जगत आहेत. त्यांना पिढ्यान्पिढया असेच ठेवण्यात आले आहे. त्यांचे दैव/ नशीब वगैरे नाही. हि सिस्टिमॅटिक घडवली गेलेली सिस्टीम आहे. म्हटले तर पुरातन.
अन्न / भौतिक सुविधांचा अभाव एक भाग झाला. पण नेहमी मनात यायचे यांना अशा वंचितवस्थेत जगण्याची, संघर्ष करण्याची, आत्मसम्मानाने जगण्याची, स्वप्ने पाहण्याची ऊर्जा कोठून येत असेल. त्या ऊर्जेचा स्रोत काय असेल ?
________________________
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन संघर्ष , विचार , त्यांची विद्वत्ता , त्यांचा महाकाय कॅनव्हास …. हिमालयासमोर उभे राह्यला नंतर जशी लीनता येते , तशी भावना डॉ बाबासाहेबांचा फोटो , पुतळा, प्रतिमा, नाव बघितल्यावर / मनात आल्यावर येत राहिली आहे. नेहमीच. अजूनही.
मग कळत गेले कि त्या कोट्यवधी प्रौढ स्त्री पुरुष / तरुण तरुणींच्या ऊर्जेचा स्रोत डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना एका जातिसमूहाचे नेते म्हणून प्रोजेक्ट करत राहणे हि डॉ आंबेडकरांच्या मूल्यांचे, राजकीय विचारधारेच्या विरोधकांचे मोठा अजेंडा आहे. पण डॉ आंबेडकर १८० अंशाच्या कोनात त्यांच्यासमोर उभे आहेत. ठाम. अनेक दशके.
__________________________
खरेतर ते ऊर्जा स्रोत आहेत सर्वांचे. सर्व जात , पंथ , वंश, धर्म, भाषा, लिंगाच्या माणसांचे. सर्व मानवजातीचे. आहेत आणि पुढची अनेक शतके राहतील.
कारण त्यांच्या जीवनातून आणि विचारातून मिळणारा मेसेज मनुष्यकेंद्री, वैश्विक आणि सार्वकालिक आणि बराच काही आहे.
हे कळण्यासाठी अभ्यास कमी पडला तरी चालतंय. आपल्याच सारख्या हाडामांसाच्या, तशाच शारीरिक , भावनिक यातना होऊ शकणाऱ्या, आपल्याच सारखी मुले जन्माला घालणाऱ्या, तशीच स्वप्ने असणाऱ्या माणसांप्रती संवेदनशीलता लागते.
त्यासाठी प्रभुत्ववादी विचारासारणीतून येणारा मनातील तुच्छताभाव प्रथम थुंकून टाकावा लागतो.
हे यांना कोण सांगणार ? कुवतीचा प्रश्न आहेच. पण खरेतर त्यांचा यामागे काहीएक हिडन अजेंडा देखील आहे !
______________________________
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, मूल्ये, विचार, अभ्यासूवृत्ती, सातत्य …. तन, मन, धन एकाच ध्येय्यासाठी स्टेकला लावणे, आपल्या लाईफ मिशन साठी पॅशनेट असणे, आणि माणसांप्रती कंपॅशनेट असणे …
ब्राम्हण जातीत जन्मलेल्या माझे…१७ व्या वर्षांपासून आज वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत, इतर अनेक स्रोतांपैकी एक सर्वात मोठे प्रेरणा स्रोत आहेत ! मी मरेपर्यंत राहतील हे नक्की.
आणि हेच त्यांना खुपत आहे. विशिष्ट जातीच्या नव्हे तर विविध जाती, धर्म, पंथ, वंश, लिंगाच्या स्त्री पुरुषांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर वेगाने प्रेरणा स्रोत बनत आहेत. त्यांचे दुखणे हे आहे.
संजीव चांदोरकर (१९ डिसेम्बर २०२४)
आपल्याकडे हुशार विरुद्ध ढ यांच्या कल्पना मनाच्या हार्डडिस्कवर लहानपणापासून कोरल्या जातात
ब्राम्हण / वरिष्ठ जातीतला असेल तर तो जन्मतःच हुशार
पुरुष स्त्रियांपेक्षा हुशार
शहरातील माणसे ग्रामीण भागापेक्षा हुशार
सुटेड बुटेड , साधे कपडे घातलेल्यापेक्षा हुशार
फाडफाड इंग्रजी येणारा , मराठी किंवा प्रांतीय भाषा येणाऱ्यांपेक्षा हुशार
प्रमाण भाषा बोलणारा बोली भाषेत बोलणाऱ्यापेक्षा हुशार
सतत इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणारा ती गॅजेट गरजेपुरती वापरणाऱ्यापेक्षा हुशार
आणि वयाने मोठे असणारे आपसूक तरुणांपॆक्षा हुशार / शहाणे
सर्व काही काळ्या पांढऱ्यात
उजव्या बाजूच्या यादीतील लोकांनी मग डाव्या बाजूच्या यादीतील लोकांना भाव द्यावा , नतमस्तक व्हावे असे अलिखित सामाजिक नॉर्म
तरुण पिढी (आधी मनात काही काळ , नंतर तोंडासमोर) बरोबर म्हणते .... माय फूट ! ( म्हणून मला तरुण पिढी आवडते)
नुसते इतिहासात डोकावले तरी कळेल , प्रत्येक काळातील, प्रत्येक प्रदेशातील तरुण पिढीने सर्व प्रस्थापित नॉर्म झुगारले म्हणून मानवी समाजाची प्रगती झाली आहे. फक्त भौतिक अर्थाने नव्हे तर सर्व अर्थानी
हे आधीचे झुगारून देणे तरुणांच्या डीएनए मध्ये लिहिलेले असते. तरुणांनी आपला डीएनए ओळखला पाहिजे. खूप काही घडू शकते
संजीव चांदोरकर (८ ऑक्टोबर २०२५)
📍दादर,मुंबई | महापरिनिर्वाण दिन विशेष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे भीम अनुयायांची प्रचंड गर्दी होते. अकोल्यातील एका भीम अनुयायाने बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा वेगळा मार्ग अवलंबला. विचारपूजनाला प्राधान्य देत या अनुयायाने तब्बल ₹7000 किमतीची पुस्तके खरेदी केली.
बाबासाहेबांना वंदन करण्याचा हा मार्ग निवडण्यामागील भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी आम्हाला माणूस बनवले. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश फक्त घोषवाक्य नसून जीवनाचा मार्ग आहे. त्या शिकवणीचे पालन करत मी पुढच्या पिढीसाठी ही पुस्तके घेतली आहेत. विचार पुढे न्यायचा हेच खरे अभिवादन आहे.”
चैत्यभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी उपस्थित राहतात, परंतु वाचन आणि विचार खरेदीद्वारे बाबासाहेबांच्या मिशनशी निष्ठा व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
ज्ञान, विज्ञान आणि समतेच्या माध्यमातून समाजपरिवर्तन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास होता आणि पुस्तके खरेदी करत विचारपेरणीचे बीज रोवण्याचा घेतलेला हा संकल्प त्या ध्यासाला उचित सलाम ठरला.
#MahaparinirvanDiwas
#Chaityabhoomi
#DrBabasahebAmbedkar
#ReadToLead
#Ambedkarite
#BuyBooks
#DalitLiterature #AmbedkariteLiterature
#Mumbai
#Education
"आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते.
आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय.
आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा होय.
आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय.
आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय.
आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यां च्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय."~ आचार्य #प्रकेअत्रे
( दैनिक मराठा, दिनांक 7 डिसेंबर 1956. )
मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे
वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी
बायकोला म्हणालो–‘घे यातले थोडेसे वाटून’
तिने कानांवर हात ठेवले!
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर आर्षकाव्य तरी लिहिले.
आणि मी?
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले.
हे जगण्याच्या वास्तवा
आता तुच सांग मी काय लिहू?
#नामदेवढसाळ
आज हवे होते ज्योतिबा , आज हवे आहेत नवीन ज्योतिबा ; विशेषतः तरुण वर्गाला सांगायला
अभ्यासाचे महत्व सांगणारे , अभ्यासातून बुद्धी कमवण्याचे महत्व सांगणारे
इंग्रजी भाषा नक्की कशासाठी शिकायची ? आणि मराठी / प्रांतीय भाषा आणि इंग्रजी भाषा शिकणे कसे परस्परपूरक असू शकते ; त्यात बुद्धिभेद करून घेऊ नका हे समजावून सांगणारे
एकाच वेळी ललित साहित्य / नाटक / पोवाडा / आणि वैचारिक मांडणी केली पाहिजे ; ललित , वैचारिक हे साहित्याचे वर्गीकरण गरजेचे नाही ; साहित्यासाठी साहित्य नाही , तर समाजबदलासाठी साहित्य हवे हे सांगणारे
एकच एक क्षेत्र नाही , तर एकाच वेळी अनेक क्षेत्रात तुम्ही कार्य करू शकता ; एकच एक क्षेत्र निवडून आयुष्याचा लांबच लांब बोगदा करून घेऊ नका सांगणारे
“वित्ताचे” महत्व सांगणारे , पैसे मिळवण्याचे महत्व सांगणारे
पैसे मिळवलेत म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचे मिंधे व्हायलाच पाहिजे असे नाही ; पैसे मिळवून देखील तुम्ही त्या त्या काळातील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करू शकता ; पैसे मिळवणे आणि बंड करणे यात काही द्वंद्व नाही हे सांगणारे
इतक्या दशकानंतर देखील औद्योगिक / कॉर्पोरेट / वित्त भांडवलाने शेती , शेतकऱ्यांची आर्थिक निर्भत्सना सुरूच ठेवली आहे म्ह्णून आसूड उगारणारे,
हे सगळे करतांना , शारीरिक तंदुरीस्ती , शरीर सौष्ठव कडे दुर्लक्ष नाही करायचे हे सांगणारे
समाजासाठी काम करतांना देखीलटेचात राहणारे ; त्या त्या काळाला सुसंगत स्टाईल स्टेटमेंट देणारे
उत्पादक शेअर मार्केट आणि आजचे सट्टेबाज शेअर मार्केट यातील फरक समजावून सांगणारे
भ्रष्ट / अपारदर्शी बांधकाम व्यवसाय / रियल इस्टेट व्यवसाय देखील कसा सचोटीने / प्रोफेशनली करायचा हे सांगणारे
नवीन विचार मांडताना , कोणीही पाठीशी नसताना , एकटेपणाचा बाऊ न करता , सावित्रीला बरोबर घेऊन , नदीच्या प्रवाहाच्या विरोधी पोहणारे
आजच्या स्वतःला लिबरेटेड म्हणवणाऱ्या मुलींना / तरुणींना , शेकडो वर्षाचा स्त्री गुलामगिरीचा इतिहास सांगणारे ; स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय हे समजावून सांगणारे
संजीव चांदोरकर (२८ नोव्हेंबर २०२५) महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन