The government wants to make this documentary disappear from social media. You'll understand the reason for this once you watch the documentary. So, watch it before the government makes it disappear!
#Indian#modi#BJPGovernment#AmitShah
सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !
Dear @RajThackeray
कडक अंगावरचा झगा, पण मनात मायेचा पाझर आहे,
मराठी माणसाच्या हक्कासाठी, हाच एक खंभा आधार आहे.
व्यंगचित्राच्या रेषेतून ज्यांनी टिपली जनतेची वेदना,
त्यांच्या एका हाकेसरशी जागे होते मराठी चेतना!
तोफ धडाडते व्यासपीठावर, विरोधक सारे थरथरतात,
पण डोळ्यातले अश्रू त्यांचे, गरिबांच्या दुःखात विरघळतात.
सत्ता आणि खुर्चीसाठी ज्यांनी कधी केला नाही सौदा,
अशा वाघाच्या काळजाचा नेता, युगायुगात जन्मत नाही सदा!
स्वप्न त्यांचे एकच आहे, सुवर्ण महाराष्ट्र घडवायचे,
परक्यांच्या या गर्दीमध्ये, मराठी पाऊल पुढे पडायचे.
जगाला हेवा वाटेल असा, प्रगतीचा इतिहास लिहायचा,
छत्रपतींच्या विचारांचा, पुन्हा इथे गड जिंकायचा!
तडजोडीच्या बाजारात हा माणूस आजही ताठ उभा आहे,
म्हणूनच मनातल्या कोपऱ्यात, एका विजयाची मोठी सुभा आहे.
हा माणूस जिंकला पाहिजे, हाच आता ध्यास आहे,
राजसाहेब तुमच्या पाऊलांवर, या महाराष्ट्राचा विश्वास आहे!
#RajThackeray
#MNS #Maharashtra #MarathiAsmita #नवनिर्माण
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता कचरा झालाय !
एकेकाळी आम्ही इतर राज्यांतील (बिहार) गुन्हेगारीवर बोलायचो, हसायचो. आज महायुतीने छत्रपतींच्या पुरोगामी महाराष्ट्राची अवस्था बिहारपेक्षाही भयंकर करून दाखवली आहे! गुन्हेगारांचे राज्य आले आहे की काय अशी भीती वाटतेय.
राज्यात मुली आणि महिला अजिबात सुरक्षित नाहीत! NCRB च्या आकडेवारीनुसार बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आणि महिलांवरील गुन्ह्यांत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे !
दिवसाढवळ्या गोळीबार, कोयता गँगचा हैदोस आणि महिलांवर अत्याचार सुरू आहेत . कुठे गेलाय कायद्याचा धाक?
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि सुनेत्रा पवार मॅडम... जनतेचे रक्षण करण्यात तुमचे सरकार १००% अपयशी ठरले आहे! सत्ता आणि खुर्चीचे राजकारण सोडून राज्यातील माता-भगिनींना सुरक्षा द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा!
#MaharashtraPolitics #WomensSafety #LawAndOrderCollapse #CrimeInMaharashtra #Mahayuti #DevendraFadnavis #EknathShinde
आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक—मग तो विद्यार्थी असो, बेरोजगार तरुण असो, शेतकरी असो की सर्वसामान्य माणूस—स्वतःला हतबल आणि फसवलेलं अनुभवत आहे!
बेरोजगार तरुणांचा आक्रोश: वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांना पेपर फुटी आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे. तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं गेलंय.
हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही: हॉस्टेलची दुरवस्था, मूलभूत सुविधा आणि स्कॉलरशिपसाठी नाशिकहून शांततापूर्ण पदयात्रा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मध्यरात्री पोलिसांच्या बळाचा वापर करून ताब्यात घेतलं जातं आणि हुसकावून लावलं जातं.
सामाजिक अस्थिरता: आरक्षणाचा पेच (मराठा विरुद्ध ओबीसी) योग्य पद्धतीने न सोडवल्यामुळे समाजात आज कमालीचा तणाव निर्माण झाला आहे आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.
सर्वसामान्य जनता हैराण: एकीकडे पाण्याचे तीव्र संकट आणि प्रचंड पाणीकपात, तर दुसरीकडे कंबरडं मोडणारी महागाई!
जनतेचा आवाज ऐकण्याऐवजी तो पोलीस आणि प्रशासनाच्या जोरावर दडपून टाकण्याचा प्रयत्न व्हावा, अशी महाराष्ट्राची अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. सरकारने आपली राजकीय जोडतोड बाजूला ठेवून आधी जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे!
जय हिंद जय महाराष्ट्र
#MaharashtraPolitics #maharashtra
#india #farmers #Students #yuva
Suppressing the voice of the people behind prison bars is the definition of absolute authoritarianism!
Article 19 of the Indian Constitution guarantees every citizen the fundamental right to peaceful protest. Yet, today we witness a reality where Cockroach Janata Party (CJP) leaders Saurav Das, Ashutosh Ranka, and Ajinkya Shinde are sent to 5-day judicial custody like criminals, simply for raising the Tricolor and demanding electoral reforms at Jantar Mantar.
The Ministry of Home Affairs and Amit Shah must clearly understand that this country belongs to its people and is governed by Babasaheb’s Constitution, not by any individual's whim. Whenever governments resort to tyranny, the outrage of the youth and the public only grows stronger. You cannot halt this battle for rights through intimidation! 🇮🇳🔥
The Constitution of India
#StopTyranny #SaveDemocracy #VoiceOfYouth #india #righttoprotest #constitution
शेतकरी राजा आज उपाशी आहे आणि सरकार दीपावलीच्या आधी किमान ५००० हजाराची मदत करत आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आज दुष्काळच संकट आहे सरकारने मदतीस वाढ केली पाहिजे .
केंद्रामधुन मंत्री महाराष्ट्रा दौऱ्यावर येणार आहेत म्हणून १२.५ कोटी गाड्यांसाठी मंजूर करता तर शेतकऱ्यांना का नाही मंजूर करू शकत !
सरकारने शेतकरी राजा कडे दुर्लक्ष करू नये आज शेतकऱ्यांवर्ती संकट आहे म्हणून पैसे ने किंमत करू नये .
जय महाराष्ट्र 🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#Maharashtra #farmer #दुष्काळ #महाराष्ट्र #शेतकरी
नाशिककरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ! सुमारे २५,००० नागरिक कॅन्सरच्या धोक्यात!
नाशिकच्या अंबड, दत्त नगर परिसरातील बोअरवेलच्या पाण्यात कॅन्सर निर्माण करणारे 'हेक्साव्हॅलेंट क्रोमियम' हे विषारी रसायन मर्यादेपेक्षा तब्बल १००० पट अधिक आढळले आहे! येथील पाणी पूर्णपणे पिवळे आणि विषारी झाले असून, प्राथमिक तपासणीत १९ जणांना त्वचेचे गंभीर आजार झाले आहेत. औद्योगिक कंपन्यांच्या घातक प्रदूषणामुळे आज २५,००0 हून अधिक नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने काही कंपन्यांवर कारवाई सुरू केली असली आणि हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला असला, तरी यावर कायमस्वरूपी तोडगा हवा! येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी आणि नंदिनी नदीचे प्रदूषण थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.
नाशिक प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी!
नाशिक महानगरपालिका
#nashik #maharashtra #WaterPollution #PublicHealth
जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहे!
दुष्काळामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेली आहेत. महिनोनमहिने मेहनत करून, कर्ज काढून, बियाणे, खते आणि औषधांवर पैसे खर्च करून शेतकऱ्याने पिके उभी केली; पण पावसाने साथ सोडल्यामुळे आज त्याच्या डोळ्यांसमोर संपूर्ण शेती वाळून जात आहे.ज्या पिकातून कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा होती, तेच पीक हातातून निघून जात आहे. खर्च केलेले पैसे कसे परत मिळवायचे? बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंबाचा संसार कसा चालवायचा? या चिंतेने शेतकरी हतबल झाला आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, शेतकऱ्यांच्या या वेदना समजून घ्या. दुष्काळग्रस्त भागांतील शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन पात्र शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याची मेहनत वाया जात असताना त्याला मदतीसाठी महिने-महिने वाट पाहावी लागू नये.आज शेतकऱ्याला आश्वासनांची नाही, तर तातडीच्या आणि प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. सरकारने विलंब न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#महाराष्ट्र #शेतकरी #दुष्काळ #शेतकरीमदत #Maharashtra #Farmers
हुकूमशाहीसमोर गप्प बसणे हा सुद्धा एक गुन्हाच आहे
मतांच्या उघड-उघड चोऱ्या करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात आता एकत्र या आणि आपल्या लोकशाहीचे भविष्य वाचवा.
ठिकाण: शिवाजी पार्क टी-जंक्शन, दादर
वेळ: आज दुपारी ४:०० वाजता
या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हा आणि तुमचा आवाज बुलंद करा!
Silence in the face of Dictatorship is a crime." ✊🇮🇳
Stand up against the blatant Vote Theft and save the future of our democracy.
📍 Where: mumbai Shivaji Park T-Junction, Dadar
⏰ When: Today at 16:00 Hours (4:00 PM)
Join the peaceful protest. Let your voice be heard! 🗳️
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे (FIR) दाखल करून प्रश्न सुटणार नाहीत. ही राजकारणाची वेळ नाही, तर तरुणांचे करिअर वाचवण्याची वेळ आहे. मुख्यमंत्री महोदय, तातडीने अॅक्शन घ्या! विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात ढकलू नका.
Pune 📍
MPSC Protest
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#pune
Pune 📍
MPSC Protest
MPSC Students are demanding the resignation of the MPSC Chairman, Vivek Bhimanwar
Cm Devendra Fadnavis
Students is the future
#pune#mpscprotest#StudentsProtest
मराठी हिंदी चित्रपटाचे जेष्ठ अभिनेता
नाना पाटेकर ७५ वर्षी निधन
"मरण तर सर्वांनाच येते, पण जग सोडून गेल्यावरही करोडो लोकांच्या मनातील आदर आणि प्रेम कायम राहणे, हेच खऱ्या अर्थाने सार्थकी लागलेले जीवन आहे." नानांचे विचार आणि त्यांचे समाजकार्य आपल्या मनात सदैव जिवंत राहील. ॐ शांती