स्वराज्य, न्याय आणि जनकल्याणाची प्रेरणा देणारा हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या पवित्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन!
शिवस्वराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाने महाराष्ट्राच्या इतिहासात स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचा नवा अध्याय लिहिला गेला.
#शिवराज्याभिषेकसोहळा
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर श्री. अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. आज त्यांनी देवगिरी या निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा पक्ष राहिला आहे. स्व. अजितदादा पवार यांनी जपलेल्या जनसंपर्काच्या विचारांना पुढे नेत राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती. सुनेत्रावहिनी पवार यांनी आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी वैयक्तिक, सामाजिक तसेच शासकीय अडचणींबाबत निवेदने सादर केली. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आत्मीयतेने ऐकून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कायम जनतेसोबत खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास श्रीमती. सुनेत्रावहिनी पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
🔸CM Devendra Fadnavis chairs the Cabinet Sub-Committee of the Industries Department meeting.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Uday Samant and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में उद्योग विभाग के मंत्रिमंडल उपसमिति की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री उदय सामंत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐 12.50pm | 26-5-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १२.५० वा. | २६-५-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@samant_uday
#Maharashtra #DevendraFadnavis #IndustryDepartment
आज मुंबई येथे नूतनीकृत बालभवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहिले. या पवित्र वास्तुच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं हे मी माझं संचित समजते.
बालभवनमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय मौल्यवान आहेत. इथल्या शिबीरांमधून मुलांना आपला छंद जोपासण्याची संधी मिळते आणि त्यांचा वेळ सकारात्मक, सर्जनशील क्रियांमध्ये व्यतित होतो. आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात मुलांचं बालपण हरवत चाललं आहे का, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. आताच्या मोबाईलच्या आणि पूर्वी टीव्हीच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या पिढीला मातीशी जोडण्याचं, त्यांना चित्रकलेच्या रंगात भिजवण्याचं आणि संगीताच्या सुरात रमवण्याचं काम हे बालभवन गेल्या 75 वर्षांपासून सातत्यानं करत आहे, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
एक लाखापेक्षा जास्त मुलांनी या संस्थेचा लाभ घेतला आहे, ही महत्वाची बाब आहे. या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सोयी-सुविधा मिळतील. या सोहळ्यानिमित्त बालभवनच्या सर्व कर्मचारी, शिक्षक आणि संचालकांचं अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या नवीन वास्तूच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख फुटतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पक्षाचे विविध पदाधिकारी यांची आज आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासह विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा आणि विकासाभिमुख भूमिका अधिक सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
📍 पुणे
लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेच्या जिम्नॅस्टिक्स केंद्रात सराव करणाऱ्या १९ खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या १४ व्या ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ६ सुवर्ण पदकं, २७ रौप्य पदकं आणि १५ कांस्य पदकं पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या युवा खेळाडूंनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं नावलौकिक करणाऱ्या या होतकरू खेळाडूंचं मनापासून अभिनंदन केलं, क्रीडा क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई
📍मुंबई
माहिती तंत्रज्ञान विभाग आणि महा आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'टेक महा इम्पॅक्ट २०२६' या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत सहभागी झाले. यावेळी उपस्थितांचे स्वागत करत संबोधित केले.
महाराष्ट्र नेहमीच देशाचे आर्थिक आणि औद्योगिक इंजिन राहिले आहे. राज्य सरकार सर्वसमावेशक आणि प्रगतीशील विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहे. "तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि सीएसआरच्या माध्यमातून समाजाचे सक्षमीकरण" ही संकल्पना राज्याच्या विकास धोरणाचे एक मूलभूत तत्त्व आहे.
सीएसआर आणि सरकार यांच्यात एक मजबूत समन्वय साधला, तर आपण शेवटच्या टोकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो. आजची 'डिजिटल दरी' सांधणे हे केवळ एक तांत्रिक काम नाही तर तो सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. जर आपण ग्रामीण विद्यार्थी आणि महिलांना तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने सक्षम केले, तर ते राज्याच्या प्रगतीचे चित्रच बदलू शकतात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक संधींमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हे केवळ त्यांचे सक्षमीकरण नाही तर संपूर्ण समाजाचे सक्षमीकरण आहे.
सामान्य नागरिकांना सरकारी सेवा मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी डिजिटल व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. डिजिटल समावेश म्हणजे केवळ इंटरनेट सुविधा नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य आणि सरकारी योजनांचा समान हक्क मिळवून देणे होय. आज झालेले सामंजस्य करार आणि ई-गव्हर्नमेंट मासिकाचे प्रकाशन ही त्या दिशेने उचललेली महत्त्वपूर्ण पावले आहेत. शरीर आणि मन या दोन्हींची काळजी घेणारा सक्षम महाराष्ट्र घडवणे, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.
महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. हवामानाचा अंदाज, पिकांचे उत्पादन वाढवणे आणि संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन यासाठी एआयचा उपयोग शेतकऱ्यांना मोठी मदत करत आहे. बारामती मतदारसंघात ऊसासह विविध पिकांच्या लागवडीत एआयचा वापर केला जात आहे. या उपक्रमांना आदरणीय अजित दादांनी विशेष पाठिंबा देत, CSRच्या माध्यमातून एआय लॅब उभारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्रात तंत्रज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित विकास मॉडेल मजबूत करण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरेल तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी एक नवीन 'रोडमॅप' म्हणूनही काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान “ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट” तसेच स्वीडनचा “रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार, कमांडर ग्रँड क्रॉस” हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
हा गौरव केवळ आपल्या नेतृत्वाचा सन्मान नसून, संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा, प्रभावी परराष्ट्र धोरण आणि देशहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पावती आहे.
आपल्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताची जागतिक ओळख अधिक मजबूत होत असून, देश विकासाच्या नव्या उंचीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
या ऐतिहासिक आणि उल्लेखनीय सन्मानाबद्दल पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन !
@narendramodi
शासकीय कामकाजातून सवड काढून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांशी भेटीगाठी केल्या. प्रत्येकानं त्यांचे प्रश्न, अडचणी व समस्या माझ्यासमोर मांडल्या. त्यांचं म्हणणं समजून घेत सर्वांचं आपण निराकरण करू, असं आश्वस्त केलं.
📍राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती. सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि स्व: अजितदादा पवार यांनी उभ्या केलेल्या जनसंपर्क व सर्वसमावेशक राजकारणाच्या विचारांना पुढे नेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. प्रबोध वसंतराव डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मा. भुजबळ यांनी श्री. डावखरे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले की, “वसंतराव डावखरे यांनी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले. विधान परिषदेसह विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. स्व: अजितदादा पवार यांच्यावर त्यांची कायम निष्ठा राहिली. आज त्यांचे सुपुत्र प्रबोध डावखरे पक्षात प्रवेश करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ते यशस्वी उद्योजक असून फिटनेस आणि जिम व्यवसाय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम उभं केलं आहे. पक्षाकडून त्यांना योग्य सन्मान आणि संपूर्ण पाठबळ दिलं जाईल. त्यांनी निर्धास्तपणे काम करावं, आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. ते एक यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचे वडील वसंतराव डावखरे ठाणे महानगरपालिकेचे महापौर, विधान परिषद सदस्य आणि उपसभापती म्हणून कार्य केले. स्व: अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा आणि आपल्या वडिलांचा राजकीय-सामाजिक वारसा पुढे नेत प्रबोध डावखरे संघटनेत प्रभावी काम करतील, असा विश्वास आहे.”
पक्षप्रवेशानंतर श्री. प्रबोध वसंतराव डावखरे म्हणाले की, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. माझ्या वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दिलं. स्व: अजितदादा पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा आणि पक्षाशी असलेली बांधिलकी हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मन भरून आलं आहे.
विशेषतः खासदार श्री. पार्थदादा पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला पक्षप्रवेशासाठी मोलाचं सहकार्य केलं. तसेच ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मा. श्री. आ. संजय बनसोडे, मा. आ. श्री. प्रताप पाटील चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते श्री. संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस श्री. सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस श्री. नजीब मुल्ला, सहकोषाध्यक्ष श्री. संजय बोरगे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष श्री. नाजेर काझी, प्रदेश सरचिटणीस श्री. लतिफ तांबोळी तसेच मुंबई महिला कार्याध्यक्ष मनीषा तुपे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
📍मुंबई
आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्वराज्यनिष्ठा आणि अदम्य शौर्य यांचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आजही प्रत्येकाला राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि पराक्रमाची प्रेरणा देते.
📍रायगड
रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले. रोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण आणि नवी सुरुवात आहे. या विकासकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे.
रायगड म्हणजे केवळ एक जिल्हा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे. याच भूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह करत सामाजिक समतेचा लढा उभारला. विशेष म्हणजे, यंदा या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याला इतिहास, प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाचा अद्वितीय वारसा लाभला आहे.
कोकण ही साक्षात देवभूमी आहे. निसर्गाने भरभरून दिलेली समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली ही भूमी महाराष्ट्राच्या वैभवात मोलाची भर घालणारी आहे. आदरणीय अजितदादांचे देखील कोकणावर विशेष प्रेम होते. राज्याच्या विकासकामांची कोणतीही चर्चा झाली की, कोकणच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. आज ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला, त्याच ठिकाणी असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी आदरणीय अजितदादांच्या हस्ते पार पडला होता, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
आजच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून श्री धावीर महाराज मंदिर परिसरातील भक्तनिवासाचे नूतनीकरण, कुंडलिका नदीकाठावरील पूरसंरक्षक भिंतीचे बांधकाम, कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये भव्य शिवसृष्टी शिल्प उभारणी तसेच कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची ओळख जपत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची सुरुवात होत आहे. ही सर्व कामे रोहा-अष्टमीच्या पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
छत्रपती शिवरायांची प्रेरणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आणि कोकणातील कष्टाळू माणसांची जिद्द व ताकद या तिन्ही गोष्टी आपल्या पाठीशी आहेत. याच बळावर रोहा-अष्टमीचा सर्वांगीण विकास आपण सर्वांनी एकत्रितपणे घडवूया, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
आज आसाममधील कामाख्या देवी मंदिर येथे जाऊन आदिशक्ती माता कामाख्या देवीचे पवित्र दर्शन घेतले. नीलाचल पर्वतावर वसलेल्या या शक्तीपीठात मातेच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली.यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री मा.श्रीमती रेखा गुप्ता जी यांची सदिच्छा भेट झाली. तसेच महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांशी देखील आत्मीय संवाद साधला.
माता कामाख्या देवीच्या दर्शनाने आध्यात्मिक अनुभूती, नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा लाभली.
पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा.श्री. शुभेंदु अधिकारी यांच्यासह मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण सोहळ्यात सहभागी झाले. यानिमित्ताने श्री. अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यांना पुढील यशस्वी राजकीय व सामाजिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेबांशी व्यासपीठावर भेट झाली, आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार श्री. प्रफुल्ल पटेल जी आणि खासदार श्री. पार्थ पवार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष तथा मा. आमदार मा. श्री. सुनील अण्णा टिंगरे यांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपले नेतृत्व आणि जनसेवा अशीच निरंतर बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#HappyBirthday#suniltingre@suniltingre
इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर झाल्यानंतर तसेच लवकरच १० वीचा निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.