16.12.1971 : भारतीय सेना युद्ध जिंकली. अशी अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप आणि पगारवाढीचे बक्षीसही मिळाले पाहिजे होते.
02.07.1972 : शिमला करार सही केला. जे सैन्याने युद्धात कमावले, बाईने सगळं घालवले.
01.01.1973 : तिसरे वेतन आयोग लागू करून भारतीय सैन्यातील जवानांची पेन्शन-कपात केली. युद्ध जिंकले याची ही भारतीय सेनेला दिलेली एकप्रकारे शिक्षाच होती!!
पुढचं पण वाचा :
डिसेंबर-1971 पासून मे-1974 पर्यंत बाई 93000 सैनिकांना निवांत पाकिस्तानात पाठवत होती. एकाच वेळी सगळ्यांना वाघाह बॉर्डर वर नेऊन पाठवता आले असते, पण बाईला या लोकांचे आतिथ्य करण्यात जाम इंटरेस्ट! पाकिस्तानी कैद्यांना एवढे विशेष आतिथ्य दिले गेले, की त्यांना बॅरॅकमध्ये ठेवण्यात आले आणि भारतीय सैनिक तंबूंमध्ये! या कैद्यांना दर महिन्याला पगारही मिळाला. आणि त्याहून शॉकिंग म्हणजे ईदच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानातून येऊन त्यांना भेटण्याची परवानगीही देण्यात आली.
कशी वाटली आयर्न लेडी?
(सोर्स : "Blunders of Indira Gandhi after India’s Win in Indo-Pak War of 1971" : लेखक डॉ.देबल देव बसू. ते वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असून भारतीय लष्करातील माजी मेजर आहेत. सध्या ते कोलकात्यात खाजगी प्रॅक्टिस करतात. ते राजकारण आणि इतिहास या विषयांवर लेखन करतात.)
🔥 'पहलगाम' हल्ल्याला मोदी सरकारने दिलेला रिस्पॉन्स हा भारताच्या इतिहासातील सर्वात तगडा रिस्पॉन्स म्हणून नोंद होणार!
लष्कर-ए-तयबा, जैश-ए-महंमद, हिजबुल आणि जमात ए दावा या चार दहशतवादी संघटनांच्या हेडक्वार्टर फोडण्यात आल्या.
सिंधु नदी करार इतिहासजमा झाला आहे.
दहशतवादी कृत्ये ही 'act of war' ही आता अधिकृत पॉलिसी बनली आहे.
पाकिस्तानात घुसून त्यांची वायुदलाची तळे उडवण्यात आली.
पाकिस्तानी सैन्य आणि वायुदलाला त्यांची लायकी दाखवण्यात आली!
आणि, या सिझफायरची ऑफर पाकिस्तानच्या DGMO कडून दुपारी 3.35 वाजता आली आहे!!
आजवर शेकडो दहशतवादी हल्ले भारतात करण्यात आले, पण त्याची एवढी मोठी किंमत पाकिस्तानला कधीच मोजावी लागली नाही!!
वेल-डन मोदी सरकार..!!!
जय हिंद 🇮🇳
स्वतंत्र भारतातील पहिले भ्रष्टाचार प्रकरण ठरलेल्या नेहरू सरकारच्या डिफेन्स जीप घोटाळ्या पासून सोनिया गांधी सरकारच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारापर्यंत आणि इंदिरा गांधी सरकारच्या एचडीडब्ल्यू पाणबुडी व्यवहारापासून ते राजीव गांधी सरकारच्या बोफोर्स घोटाळ्यापर्यंत, प्रत्येक संरक्षण खरेदीमध्ये काँग्रेस पक्षाने दलाली खाल्ली! अश्या 'डिफेन्स भ्रष्टाचारात' आकंठ बुडालेल्या काँग्रेसने मात्र वाजपेयी सरकारच्या काळात जॉर्ज फर्नांडिस आणि मोदी सरकारच्या काळात मनोहर पर्रिकर यांच्या सारख्या अतिशय नॉन-करप्ट, राष्ट्रनिष्ठ लोकांवरच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले! डिफेन्स जाऊद्या, एक प्रदीर्घ पण अतिशय निष्कलंक राजकीय जीवन जगलेल्या या लोकांनी आपल्या आयुष्यात कधी पाच पैश्यांचाही भ्रष्टाचार केला नव्हता.
भारताने 2014 नंतर 'मेड-इन-इंडिया' या मंत्राचा वापर करत देशातच अनेक शस्त्रे विकसित केली, वर्ल्ड-क्लास संरक्षण प्रणाली तयार केल्या, मिसाईल डेव्हलपमेंट मध्ये गरुडझेप घेतली आणि डिफेन्स स्टार्ट-अप इकोसिस्टिम पण उभी केली. त्याव्यतिरिक्त, याच दशकात जे अनेक G2G व्यवहार करण्यात आले, त्यात मनोहर'भाई' यांच्यामुळे राफेल आणि S-400 व्यवहार पण झाले होते. हे व्यवहार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असल्याने त्यात कोणी दलाल नव्हतेच. दलाल नसल्याने या व्यवहारांत एक रुपया पण भ्रष्टाचार झाला नाही, ज्यामुळे आज S-400 असो की राफेल, हे 'प्रॉडक्ट' आज आपल्याला संपूर्ण व्हॅल्यू फॉर मनी (VFM) देत आहेत. 'भाईंच्या' राफेल आणि S-400 मुळे आज भारतीय सैन्यदल अक्षरशः 'भाई'गिरी करू शकत आहे.
स्व.मनोहर 'भाई' पर्रीकर यांना कोटी कोटी नमन..🙏🏼
जय हिंद 🇮🇳
🔥 होळीपूर्वी उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये जामा मशिदीला ताडपत्रीने झाकण्यात आले आहे! फक्त जामा मशीद नाही, संभलमधील आणखी 10 मशिदींनाही असे झाकण्यात आले आहे. तेवढंच नाही, आज जिल्ह्यातील 67 मशिदीही ताडपत्रीत झाकलेल्या आहेत!! सगळ्यात महत्त्वाचं : या मशिदी प्रशासनाने नव्हे, तर मुसलमानांनीच स्वतः झाकलेल्या आहेत.
ज्यांच्या नावावर संपूर्ण हिंदुस्थानाचाच सातबारा आहे, त्या आमच्या प्रभु श्रीरामचंद्र यांना ताडपत्रीत राहावं लागलं होतं तेंव्हा कोणत्याही सेक्युलर भडव्यांना वाईट वाटलं नव्हतं. आज जामा मशीद ताडपत्रीत बघून रडत आहेत! रडू द्या त्यांना. They deserve it!!
बाकी, हिंदूंनी लक्षात ठेवावं : संभल मुस्लिमबहुल झाला, त्यानंतर आज तब्बल 46 वर्षांनंतर या शहरात पहिल्यांदा होळी साजरी करण्यात आली आहे!!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संभलचे सीओ अनुज चौधरी यांचे अभिनंदन, सविनय जय श्रीराम आणि साधुवाद..🙏
🔥 विसरू नका, कायम लक्षात ठेवा! तारीख 12 मार्च 1993, दिवस जुम्मा, 12 ठिकाणी बॉम्बस्फोट, RDX चा वापर, 257 ठार, 1100+ जखमी आणि मुख्यमंत्री होते शरद पवार!!
काल मध्यरात्री अजित पवार देवेन्द्र फडणवीस यांना भेटले होते, जवळजवळ 2 तास ही बैठक चालली. सबळ पुरावे पुढे येईपर्यंत 'बेनिफिट ऑफ डाउट' दिलेल्या धनंजय मुंडे यांना सबळ पुरावे समोर आले असल्यामुळे आता राजीनामा द्यावाच लागेल हे देवेन्द्र फडणवीस यांनी या बैठकीत स्पष्ट केले. अजितदादांनी काही पर्यायी मार्ग सुचविल्याचे समजते, पण मुख्यमंत्री देवेन्द्रजी यांनी अजितदादांनी दिलेले पर्याय कसे legally untenable आहेत हे त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर ही बैठक संपली.
आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला, जो मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून अंतिम स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे पाठवला.
'मीडिया ट्रायल' किंवा 'सोमी शोधपत्रकारिते'च्या आधारावर इमोशनल होऊन अथवा राजकीय दबावाखाली नव्हे, तर देशमुख मर्डर केसशी संबंधित कोर्टात सिद्ध होतील असे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यावर ही कारवाई तात्काळ करण्यात आली, जे अतिशय योग्य आहे.
एकदा सबळ पुरावे मिळाल्यावर मात्र, अजितदादांशी कितीही घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध असले तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेन्द्र फडणवीस यांनी घेतलाच!
वेल-डन देवेन्द्रजी..👍
जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उद्या दावोस दौऱ्यावर जात आहेत.
• डेटा सेंटर्स, ऑटोमोबाइल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात अनेक करार या दौऱ्यात होणार आहेत.
• गुंतवणूक आणणे ही एक लॉंग-टर्म प्रक्रिया आहे. ऐतिहासिक बहुमत मिळाल्यावर आता कामे पण त्याच स्केलची करावी लागणार आहेत. निकालांना 2 महिने होत आलेले असल्याने सोमी/आयटी सेलने पण आता आपली 'व्हेकेशन' संपवून पुन्हा कामावर रुजू व्हावं. सरकारचे प्रत्येक काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याची खात्री करावी.
• यापूर्वी देवेन्द्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या 2014 ते 2019 या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. परिणामी, गुंतवणूकीचा ओघ वाढून 2019 येता-येता औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला!
• त्यानंतर मविआ च्या काळात आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी वैगेरे पण अडीच वर्षात दावोस वाऱ्या करून आले, परिणामी जून 2022 पर्यंत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या नंबर वरून पाचव्या नंबर वर आला.
• महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्यात येणार आहे. यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
• राज्यात सर्व क्षेत्रात, तसेच फक्त मुंबई-पुणे नव्हे तर सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठीही यावेळी रणनीती आखण्यात आली आहे.
• टॅक्स-पेयर्सच्या पैश्यावर पिकनिकला जाणारे आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत कोणाला घेऊन गेले होते एकदा तपासून बघा. ते सरकारी खर्चावर आपल्या पर्सनल लोंबत्यांना घेऊन मजा मारायला दावोसला गेले होते. आता फरक बघा, राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देवेन्द्रजी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, अश्विनी भिडे, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, उद्योग विभागात नावाजलेले पी.अन्बलगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, MMRDA आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थपकीय संचालक विजय सिंघल, MIDC CEO पी.वेलरासू अशा जबरदस्त 'सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स' अर्थात SMEsची टीम सोबत घेऊन जात आहेत!
महाराष्ट्राचे CEO देवेन्द्रजी फडणवीस आणि त्यांच्या टीमला माझ्या शुभेच्छा!!
ओपन चॅलेंज! मला या फोटोत हिंदू, हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि त्यावर आमचे महाराज दिसत आहेत. विरोधकांनी याच फोटोत कोण दलित, कोण ओबीसी, कोण मराठा, कोण ब्राह्मण, कोण आदिवासी सांगून दाखवावं!!
#महाकुंभ मध्ये नागा साधूंच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज..🚩
धक्कादायक!! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आज कर्नाटकातील बेळगावात सुरू झाले आहे. पॅलेस्टाईनची बॅग घेऊन प्रियांका गांधी पण या अधिवेशनात गेल्या आहेत. भारत तोडो अभियान फेम राहुल गांधी पण तिकडे आहेत. चीन सोबत एमओयु करार करणाऱ्या सोनिया गांधी पण तिकडे आहेत. या ठिकाणी लावलेल्या बॅनर, पोस्टर, होर्डिंगस, स्टँडीज् वर असलेल्या भारताच्या नाकाश्यातून जम्मूकाश्मीरचा एक भाग चीनला आणि एक भाग पाकिस्तानला देऊन टाकला आहे, तर अरुणाचल प्रदेश पण चीनच्या घश्यात घातला आहे काँग्रेसने!! 'इंडियन नॅशनल काँग्रेस' नाव बदलून आता पक्षाचे नाव 'इंडियन मुस्लिम लीग चायनीज कम्युनिस्ट काँग्रेस पार्टी' करावं यांनी!!
बाकी, आता निर्लज्ज गुलाम म्हणतील 'हुआ तो हुआ', आणि चप्पलचाटु संपादक म्हणतील 'पेढे वाटा पेढे'!!
एक है तो सेफ है! कर्नाटकात लिंगायत समाजाला काँग्रेसने निवडणुकीच्या आधी बरीच आमिषे दाखवली होती, बिचारे बळी पडले आणि काँग्रेसला मतदान केले. आता दुसरं काही मागत नाहीयेत, फक्त दिलेली वचने पूर्ण करा म्हणत आहेत तर पोलिसांच्या लाठ्या नशिबी आल्या! दुर्दैव!! बटेंगे तो अशीच डोकी फुटेंगे!!
निर्भय बनो मुख्यमंत्री..😍
'निर्भय बनो' गॅंगशी संबंधित कोणाच्या तरी एका पोस्टचा स्क्रिनशॉट सध्या मार्केट मध्ये फिरतोय. त्यात 'निर्भय बनो'वाले असं म्हणत आहेत की त्यांचा मुख्यमंत्री झाला असता, तर सेवाग्राममध्ये बापू कुटीच्या समोर झाडाखाली शपथ घेतली असती. आणि मग सात्विक जेवण आणि ताकाची पार्टी,'असा त्यांचा बेत होता.
ही पोस्ट वाचून मी सरळ सेवाग्रामला गेलो आणि हा आश्रम बघितला. एकदा तुम्ही पण या आश्रमाला अवश्य भेट देऊन या. मग तुम्हाला समजेल की हे गांधीवादी लोक्स तिकडे जाऊन का शपथ घेणार होते. मस्करी नाय करत, आश्रम बघून मी स्वतःच गांधीवादी झालोय!! हे निर्भय वाले मला संधी देणार असतील ना, तर मी फक्त शपथविधीच नाही.. संपूर्ण पाच वर्षे कारभार पण तिकडूनच चालवेन! एवढा मस्त आश्रम आहे हा!
बापू कुटीर बघून सांगतोय..
'अ डे इन अ निर्भय मुख्यमंत्रीज् लाईफ' कसा असणार बघा -
स्टेप-१) सकाळी ७ वाजता : सकाळी सात वाजता निर्भय उठला की दुसरं कामच नाही, थेट मसाज टेबल गाठायचं! (बापू कुटीर मध्ये बापूंचे 'मसाज टेबल' आहे बरं का. फोटो जोडला आहे). एकदा का बेबी ऑईल लावून तासभर ऑईल-थेरपी मसाज झाला, की सकाळीच कसं एकदम्म फ्रे...श्श!!
स्टेप-२) सकाळी ८ वाजता : बेबी ऑईल मसाज झाला, की मस्त गरम पाण्याच्या टब मध्ये तासभर हायड्रो-थेरपी घेत लोळत पडायचं! (बापू कुटीर मध्ये बापूंचा त्याकाळातील 'जकुझी' आहे बरं का. फोटो जोडला आहे).
स्टेप-३) सकाळी ९ वाजता : बेबी ऑईल मसाज आणि जकुझी मध्ये लोळून झालं की खादीच्या पंच्याने अंग पुसून येऊन 'पेट-थेरपी' सुरू, बकरीचे दूध पीत खाटेवर पडायचं! (बापू कुटीर मध्ये बापूंची त्याकाळातील 'खाट' आहे बरं का. फोटो जोडला आहे). पुढचे दोन तास यासाठी राखीव.
स्टेप-४) सकाळी ११ वाजता : बेबी ऑईल मसाज, जकुझी मध्ये लोळून आणि बकरीचे दूध पिऊन झाले, की पाहुण्यांना भेटायची वेळ. पुढचा एक तास पाहुण्यांना समोर बसवून आपला मस्त चरखा फिरवत बसायचं. 'ईश्वर अल्लाह तेरो नाम' इत्यादी गाणी लावायची आणि 'कम्युनिटी म्युजिक थेरपी'चे सेशन उरकून टाकायचे.(बापू कुटीर मध्ये बापूंचा चरखा आहे बरं का. फोटो जोडला आहे).
स्टेप-५) दुपारी १ वाजता : बेबी ऑईल मसाज, जकुझी मध्ये लोळून, बकरीचे दूध पिऊन, चरखा फिरवत संगीताचा आनंद घेऊन झाला की 'डाएट-थेरपी' - जमलेल्या लोकांसोबत 'सात्विक जेवण आणि ताक'! (बापू कुटीर मध्ये बापूंच्या काळापासून सात्विक जेवण आणि ताक मिळतं. फोटो जोडला आहे).
मग, २ वाजेपर्यंत आलेल्या सगळ्या पाहुण्यांना गेट मधून बाहेर हाकलून द्यायचं.
बेबी ऑईल मसाज घेऊन, जकुझी मध्ये लोळून, बकरीचे दूध पिऊन, चरखा फिरवून, गाणी ऐकून, 'सात्विक जेवण आणि ताक' याचा आनंद घेऊन झाला, की आपला निर्भय परत मसाज टेबल वर तयार..! रात्री ९ पर्यंत परत सगळ्या स्टेप रिपीट!!
आज पासून मी 'निर्भय बनो' पार्टी जॉईन केली आहे. कोणी निंदा कोणी वंदा, गांधीवाद हाच आमचा धंदा!!
🔥 बिग ब्रेकिंग न्यूज : गुजरातचे आइस्क्रीम महाराष्ट्राने पळवले!!
अमूल डेअरी पुण्याजवळील MIDC खेड मध्ये आपला नवीन आइस्क्रीम प्लांट उभारत आहे. 11 एकरांमध्ये पसरलेले हे आइस्क्रीम प्रॉडक्शन युनिट पूर्णत्वाकडे जात आहे. प्रतिदिन 50000 लीटर आइस्क्रीम इथे तयार करण्याची क्षमता आहे (जी 1 लाख LPD पर्यंत वाढवता येईल). अमूलच्या 1000 कोटी रूपये गुंतवणुकीच्या विस्तार योजनेचा हा एक भाग आहे.
गुजरातसेना (उबाठा गट) आणि गुजरातवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट न्यायप्रविष्ट) या गुजरात मधील दोन किरकोळ पक्षांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यावर गुजरातचे आइस्क्रीम पळविल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना गुजरातद्रोही म्हटलं आहे.
१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभर वातावरण तापले होते. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते. पोलिसांनी आरोपींना अटक केली. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. प्रकरण वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे, पण मधल्या काळात यातील प्रमुख आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली!
पुढे याच प्रकरणातून मराठा आरक्षणाचा लढा उभा केला गेला होता. आधी शांततेत निघालेले मराठा क्रांती मोर्चे तर त्यानंतर अलीकडे सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन या सर्व प्रवासात आंदोलकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच कायम टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे सरकारच्या काळात ही आंदोलने बंद होती, आणि त्यानंतर मराठा मुख्यमंत्री असूनही शिव्या-श्राप मात्र फडणवीस यांनाच द्यायचा जातीवादी खेळ खेळला गेला.
__________________
कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी आज संपन्न झाला. सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे ठेवण्यात आले होते. कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीचे हे लग्न होते. देवेन्द्र फडणवीस हे कोपर्डीच्या या बहिणींच्या वडिलांसोबत गेली आठ वर्षे कायमच संपर्कात राहिले होते. त्यामुळे सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते. त्यांनी यायचे कबुलही केले होते. मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कारभारही सुरू केला. मात्र, लग्नाला येतो, असा दिलेला शब्द त्यांनी आज पाळला. छोट्या गावातील एका साध्या लग्न समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फौजफाट्याह हजेरी लावत कोपर्डीच्या त्या कुटुंबाला दिलेला शब्द पाळला. या लग्नाला हजर राहून त्यांनी वधू-वरांना आणि दोन्ही कुटुंबाना शुभेच्छा दिल्या.
अजून टार्गेट करा, वाट्टेल तेवढं ट्रोल करा, जात काढा किंवा पर्सनल अटॅक करा.. काही फरक पडत नाही आमच्या नेत्याला! वेल-डन बॉस!
@Dev_Fadnavis जी, तुमचा समर्थक असल्याचा अभिमान होता, अभिमान आहे आणि कायम अभिमान राहणार!!
🔥 इनसाईड स्टोरी : महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ न घेण्याचं जाहीर केले! त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या आमदारांवर लोकांनी छि...थु झाली. प्रचंड टीका झाल्यावर आदित्य ठाकरे, नाना पटोले, भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले. ही थर्ड-क्लास आयडिया त्यांनीच दिली होती अशी माहिती तिकडे गेल्यावर बाहेर आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी फोनवरून बेक्कार भोसडलं!! त्यातील काही गोष्टी फोनवरील डिस्टर्बन्स मुळे असावे, पण नीट समजल्या नसल्या तरी ती साहेबांना राग अनावर झाल्यावर वापरतात ती 'विशेषणे' होती एवढं समजलं. उद्या महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी मुकाट्याने शपथ घ्यायची असं मग ठरलं. काही लोकं तर आजच धावतपळत शपथ घ्यायला गेले मग. असो!
असा शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा नीच प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. लोकांच्या मताचा व जनादेशाचा याहून मोठा अनादर कोणी केला नव्हता. संसदीय लोकशाहीसाठी हे अशोभनीय कृत्य मविआवाल्यांनी आज केले आहे. ज्या महाराष्ट्राच्या जनतेने यांना गांडीवर लात मारून घरी बसवलं, त्यांचा तो निर्णय किती योग्य होता हे आज यानिमित्ताने त्यांना पटले.. एवढेच काय ते समाधान!
याचसाठी मला अजितदादा आवडतात! वेळ चांगली असो की वाईट, ते आपल्या माणसांना टाकत नाहीत. काल शपथविधी झाला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक 'वेगळीच' बैठक घेतली. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना अजितदादा यांनी स्वतः फोन करून बैठकीला येण्याचा आग्रह केला होता. कोण होते त्या बैठकीत? वाचा :
पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील पराभूत झालेल्या आपल्या उमेदवारांची ही बैठक त्यांनी देवगिरी बंगल्यावर घेतली. पक्ष कुठं कमी पडला आणि उमेदवार कुठं कमी पडले यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि मग या आपल्या शिलेदारांना पाठीवर कौतुकाची थाप देऊन पुढच्या निवडणुकीत त्यांना 100% विजयी करून विधानसभेत आणणार असे वचन दिले. पराभवाने खचून न जाता त्यांना नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागायला सांगितले. पराभूत झाले असले, तरी त्यांच्या मतदारसंघातील कामे घेऊन या मी ती कामे करून देतो, असे आश्वासन पण त्यांनी दिले आहे!
'गरज सरो आणि वैद्य मरो' अशी प्रवृत्ती आपल्याला राजकारणातच नव्हे तर सर्वत्रच दिसत असताना अजितदादा यांचा हा 'रिफ्रेशिंग अप्रोच' अनुकरणीय आहे, फक्त राजकारणी लोकांनी नव्हे तर सर्वांनीच.
वेल-डन दादा!
सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन..😊💐
या सरकारला 233 जागांचा अभूतपूर्व कौल लाभला आहे. विरोधक तर नावालाही शिल्लक ठेवलेले नाहीत जनतेने, एवढा हा एकतर्फी निकाल आहे. जर जनतेनेच विरोधक संपवले आहेत, तर संपलेल्या लोकांना ट्रोल करून महत्व देण्यात काही अर्थ नाही. उलट, आता सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रत्येक काम या राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेच पाहिजे. तरच ही 'प्रो-इन्कमबन्सी' तशीच राहील! एक समर्थक म्हणून मी या कामात माझा वाटा उचलणार आहे, एवढं गॅरंटेड सांगतो! सरकारने कामे करत जावी, आणि इकडे आम्ही ती लोकांपर्यंत पोहचवता जाणार..😊
त्याची सुरूवात त्यांनी आज केली, आता मी पण आपलं काम सुरू करतोय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेन्द्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली! पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
वेल-डन देवेन्द्रजी!
शुभेच्छा..💐
तो पुन्हा आलाय!!
विरोधकांनो, तो परत आलाय!!
आणि आलाय तोही कसला रुबाबात, कसला स्टाईलमध्ये!! सर्व वाईट प्रवृत्तींना पायदळी तुडवत आलाय!! तुम्ही केलेल्या त्याच्या हेटाळणीला, तिरस्काराराला पचवून समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या इंद्राच्या ऐरावता सारखा आलाय!! तो काशी विश्वनाथाच्या नंदीसारखा आलाय!! टरबूज म्हणून तुम्ही त्याला हिणवलंत… त्याच्या जातीवरून त्याला टार्गेट केलंत… त्याच्या पत्नी आणि मुलीवरून नीच पातळी गाठलीत… पण या सगळ्याने जराही विचलित न होता, चेहऱ्यावरील स्माईल शाबूत ठेवत ते सगळं विष प्राशन करून तो परत आलाय… अधिक मुरलेला, अधिक सहनशक्ती असलेला, अधिक अनुभवी आणि हिशेब चोख करण्यात आता अधिक तरबेज झालेला राजकारणी बनून तो आलाय!!
तुम्ही त्याला कुठलीही माणुसकी दाखवली नाही पण त्याने माणुसकी कधीच सोडली नाही!! तो मुळातच शांत स्वभावाचा होता… तुम्ही कपट केलं, त्याचा हक्क मारला तरी तो शांत होता… तेवढ्यावर न थांबता तुम्ही कटकारस्थाने केली तरी तो शांत राहिला… तुम्ही जे करायचं ते सगळं केलं, आता तो शांतपणेच आलाय…”अकेला क्या करेगा?” विचारत होता ना तुम्ही… 'क्या करेगा' ते शांतपणे केलं त्याने… जर रुद्रावतारात आला तर? याचा विचार तुम्हीच करा आता... “मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी येणार!!” असं तुम्हाला ऑन-कॅमेरा, विधानसभेत उभं राहून, लाईव्ह टीव्हीवर सांगितलं होतं... आज तुमच्या नाकावर टिच्चून त्याच विधानसभेत तो आलाय!! आणि तुम्ही ज्या बाकांवर बसून त्याला त्याच्या त्या वक्तव्याची सारखी आठवण करून देत कुत्सितपणे हसला होता, आता तो तुम्ही जिथे बसून त्याला हसला होता त्याच जागेवर ठाण मांडून बसायला आलाय!! केवढा तुम्ही त्याला सत्तेचा माज दाखवत होता आणि केवळ अडीच वर्षात एका लाल परी मधून सगळे एकत्र विधानसभेत जाऊ शकाल अशी तुमची अवस्था करून तो आलाय!! ना वायफळ तोंड वाजवून, ना कोणाचं थोबाड फोडून, ना खोटे नरेटिव्ह बनवून, ना समाजात दुफळी माजवून... तर मतपेटीतून कौल आणि चौदा कोटी जनतेचा आशीर्वाद घेऊन तो आलाय!! जेव्हा तुमची वाट बिकट झालेली असेल, जेव्हा तुम्हाला कोणी १% पण चान्स देत नसेल, जेव्हा तुमच्या आजूबाजूला “काहीही होऊ शकत नाही” म्हणत रडारड करणाऱ्या 'तुमच्याच' निराशावादी लोकांचा गराडा असेल, सगळीकडून अडचणीत असाल... तेव्हा 'फिनिक्सची भरारी' वगैरे गुगल करण्यापेक्षा देवेन्द्र फडणवीस यांचा ‘४ जून २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४ मधील प्रवास आणि अथक परिश्रम बघा…’ आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा आणि सकारात्मकतेची अनुभूती नाही मिळाली तर सांगा!!
अशा नेत्याला त्याचा कारभार सांभाळण्याची धुरा देणारा शपथविधीचा आजचा मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार🙏🏻
व्हॉट अ कमबॅक!!!
🔥🔥🔥
एका लाडक्या बहिणीकडून लाडक्या देवाभाऊला - 'शाब्बास!' आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
- @RupaliMhatre18 ताई