पनवेल शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टेंभोडे-वाघऱ्याची वाडीतील आदिवासी समाजातील नागरिकांना अन्नधान्य व गृह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेल शहराध्यक्ष विश्वजित पाटील हजर होते. #RaigadNews
रायगडावर सापडली सोन्याची बांगडी
दुर्गराज रायगडावर उत्खननात दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या धातूपासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी (पाटली) सापडली. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी स्वत: गडावर जाऊन पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
#रायगड