कारगिल विजय दिवस
१९९९ च्या कारगिल युद्धात आपल्या वीर जवानांनी हिमालयाच्या कठीण शिखरांवर केवळ विजय मिळवला नाही,तर भारताचा स्वाभिमानही उंचावला.
आज आपण मुक्तपणे श्वास घेतो,कारण कोणीतरी आपल्या सीमांवर निःस्वार्थपणे उभा आहे.शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठेच्या अमर गाथेला विनम्र अभिवादन
कधी कधी वाटतं...
अन्यायच जिंकतोय, सत्य हरतंय, आणि संघर्ष व्यर्थ जातोय.
पण विठ्ठलाच्या विटेवरून पाहणारी ती करुणामयी नजर सांगते..
विश्वास ठेवा...
अंधार कायमचा नसतो आणि सत्याचा पराभव कधीच होत नाही.
॥ विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल ॥ 🙏🚩
काळ माणसाला आपल्यातून दूर नेतो,पण त्यांच कार्य, त्यांचा प्रभाव व त्यांनी निर्माण केलेला विश्वास कधीच दूर नेत नाही.म्हणूनच काही व्यक्तिमत्त्वं काळाच्या पलीकडे जाऊन कायम स्मरणात राहतात.
मा.अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
येऊरच्या मध्यभागी वनखात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. सर्व अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, एकाही अधिकाऱ्याने व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे, याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.
आमच्या नावावर जमीन आहे. पण, इतर हक्कांमध्ये इतरांची नावे आहेत. इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी भिंत बांधण्यात येत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो.
जंगलामध्ये सीसी बाऊंड्री... पूर्ण सिमेंटचे बांधकाम ही जरा धक्कादायक बाब आहे. येऊरमध्ये जमिनींचा वाटप कार्यक्रम वनखात्याने सुरू केला आहे की काय? सोबत एक व्हिडिओदेखील पाठवत आहे अन् एक मोठे झाड स्वतः वनखात्यानेच भिंत बांधताना तोडले आहे.
वाह रे... वा! मजेशीर आहे, सगळं! गणेश नाईक साहेब, काय चालू आहे हे.
"११ वर्षांच्या सत्तेनंतरही बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक असुरक्षितता वाढत असेल तर सरकारने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.अनेक सरकारी अधिकारी आणि अभिनेते आता बोलू लागले आहेत. #Economy#India"
मनोज कुमार अग्रवाल, बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी, आता पश्चिम बंगालचे मुख्य सचिव ?
भाजपप्रेरित विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) राबवून ह्यांनी तब्बल ९१ लाख मतदारांची नावे यादीतून हटवली होती.
लोकशाहीला धक्का देणाऱ्या या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांची पश्चिम बंगालच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावर नियुक्ती करण्यात आली आहे का ? हा योगायोग आहे , का लोकशाहीवरचा उघड आघात ?
बंगालात भाजपाला 1.39 कोटी मतं मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 1.26 कोटी. फक्त 13 लाख मतांचा फरक आहे.
आता यात ग्यानेसची 90 लाख मतं ॲड करा आणि सांगा कोण जिंकलं.
म्हणून हा फक्त आणि फक्त ग्यानेसचा विजय आहे.
- विश्वंभर चौधरी
पुण्यातील भोर मधील नसरापूर येथील ४ वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून निर्घृणपणे तिची हत्या केलेली घटना खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारी आहे...!!
किमान आतातरी झोपेचे सोंग घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे गांभिर्याने लक्ष द्यावे... आणि त्या आरोपीवर कठोर कारवाई करून त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा..!!
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
#maharashtra #MaharashtraPolitics #pune #nasrapur #punekar
ममता बनर्जी जी लगभग 5 घंटे तक उस स्ट्रॉन्ग रूम के बाहर बैठी रहीं, जहाँ ईवीएम मशीनें रखी गई थीं। उनके बैठने की वजह यह थी कि बिना पार्टी के अधिकृत एजेंट हुए कुछ लोग स्ट्रॉन्ग रूम के अंदर घुस आए थे।
घुसने वाले वही लोग हैं जो डकैती से बिहार में चुनाव जीते हैं।
साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला ती सोशल मीडियावर भाजपाला अडचणीत आणणारे व्हिडिओ टाकते म्हणून भाजपाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. तीची पोलीसांकडे तक्रार करत आहेत तसेच तीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे.
महिलांना न्याय देण्याच्या मोदीजींची इच्छेला फडणवीसांच्या राज्यात भाजपा कसे मूर्त स्वरूप देत आहे हे त्या महिलेनेच सांगितले आहे.
भाजपाचे महिलांना न्याय देण्याचे ढोंग हे मणिपूर असेल, हाथरस असेल किंवा महिला खेळाडूंच्यावरील अत्याचारातून समोर आले आहेच. भाजपातील बलात्काराच्या आरोपी नेत्यांची संख्याही अभूतपूर्व आहे. मात्र महिलांचा आवाज दाबण्यासाठी किती खालच्या स्तरावर भाजपाचे कार्यकर्ते जात आहेत हे ही स्पष्ट होते. या महिलेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सातारा पोलीस आणि राज्य सरकारची आहे हे लक्षात ठेवा.
https://t.co/HzuFWarie3
विरोधी पक्षनेता राहुल गांधी याने निकोबार बेटाला भेट दिल्यावर अंदमान-निकोबारच्या बंदर प्रकल्पाबद्दल कळले आणि थोडा अभ्यास केला.
थोडक्यात हे कळाले की:
• अंदमान आणि निकोबार बेटांच्या अतिसंवेदनशील परिसरात सुमारे ७२,००० कोटी रुपयांचा हा अजस्र प्रकल्प राबवला जात असून, यात आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आणि विमानतळाचा समावेश आहे.
• या विकासकामांमुळे निकोबारमधील १३० चौरस किलोमीटरचे अतिशय घनदाट सदाहरित अरण्य कायमचे नष्ट होणार असून, जवळपास १० लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीनुसार, एका मोठ्या झाडाचे वार्षिक पर्यावरणीय मूल्य सुमारे ७४,५०० रुपये असते. या हिशोबाने १० लाख झाडांची ५० वर्षांची किंमत लाखो कोटींच्या घरात जाते, जी या प्रकल्पाच्या एकूण खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
• तरीदेखील, ‘हस्तक्षेप करण्यास ठोस कारण नाही’, असे म्हणत राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) अंदमान-निकोबार बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
• हा भाग ‘बायोस्फीअर रिझर्व्ह’ असतानाही, केवळ सामरिक महत्त्वाचा बागुलबुवा उभा करून, जायंट लेदरबॅक कासव आणि निकोबार मेगापॉड यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त केले जात आहेत.
• जगातील मानववंशशास्त्रज्ञांनी या प्रकल्पाला शोम्पेन आदिवासींसाठी ‘मृत्यूचे फर्मान’ म्हटले आहे. शेकडो वर्षांपासून बाह्य जगाशी संपर्क नसलेल्या या आदिम जमातींचे नैसर्गिक कवच हिरावून घेऊन त्यांना विनाशाच्या खाईत लोटले जात आहे.
• आर्थिक आणि सामरिक प्रगतीची स्वप्ने दाखवून निसर्गाची ही कत्तल करणे म्हणजे भविष्यातील महाभयंकर पर्यावरणीय संकटाची सुरुवात आहे. विशेष म्हणजे, या प्रगतीची कोणतीही शाश्वती नाही. भारताच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूर आणि सिंगापूर-कोलंबोसारख्या प्रस्थापित बंदरांच्या स्पर्धेत असलेल्या या प्रकल्पापासून नेमके कोणते व्यापारी फायदे मिळतील, हे कोडेच आहे.
पण भोंदू राष्ट्रवादाने पोखरलेला आणि धर्म द्वेषाने पिसाळलेला समाज पर्यावरणाची कशाला बरे चिंता करेल
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री बाबाचे समर्थन करून महाराजांबाबत चुकीचे विधान करणाऱ्या आनंद स्वरूप याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज नौपाडा पोलीस स्टेशन निरीक्षक यांच्याकडे फिर्याद दिली #thane
Residents of Parsik Nagar, Kharegaon (Ward 9) are facing severe hardship due to ongoing water cuts. To highlight issue, NCPSP corporator Abhijit Pawar staged a unique protest by taking a bath inside the TMC office, demanding immediate action to resolve the water crisis. #Thane
हवामान बदलावर दुर्दैवाने कोणीही आवाज उठवत नाही.भावी पिढीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो.वाढत्या उष्णतेने,हवामान बदलाने सर्दी,सांधेदुखी,डोळ्यांचे विकार,श्वसनाचे आजार होत आहेत.सरकार झाडे नाही भविष्य तोडत आहेत @NCPspeaks
या विषयाचे गांभीर्य सरकारने समजून घ्यायलाच हवे लोकसभा व विधानसभा या दोन्ही सभागृहात याबद्दल सखोल चर्चा करीत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
या भागांचा विकास व्हावा यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात यायला हव्यात.तसेच आदिवासी विभागाचा निधी योग्य प्रकारे वापरला जायला हवा
महाराष्ट्रात फक्त 50 हजारात 12 ते 14 वर्षांच्या मुलींची विक्री....
सावित्रीबाई-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुंबईपासून 100 किलोमीटरवर
●12-13-14 वर्षाच्या आदिवासी लहान मुलींची दलालाकडून काही हजारात सौदेबाजी, ●बापाच्या वयाच्या व्यक्तीसोबत खोटं लग्न,
●मग लैंगिक अत्याचार, मारहाण, गर्भपात
●पोटुशी राह्यलीच तर मग मुलगी झाली की घरातून हाकलायच अगदी कचरा फेकतो तसं.. ●ते ही कसं तर दोनशे तीनशे रुपये देऊन. आज या 13 ते 14 वर्षाच्या वीटभट्टी कामगार मुली कडेवर लेकरू घेऊन फिरतायत. त्यांचा गुन्हा काय तर-
-पहिला गुन्हा आदिवासी पाड्यावर जन्म
-दुसरा गुन्हा मुलगी म्हणून जन्म
-तिसरा गुन्हा म्हणजे मुलीलाच जन्म
ज्याची प्रचंड मोठी किंमत त्यांनी आयुष्यात मोजलीये..अशी एक दोन नाही तर अनेक प्रकरणं आहे.
लहान वयातच बालपण मेलं, आयुष्य उध्वस्त झालं,2 वेळच्या खाण्याची भ्रांत, त्यात त्यांच्या कडेवर असलेल्या चिमुकल्यांचंही भविष्य अंधारात गेलं.. पुढे जाऊन काय काय संघर्ष वाट्याला येईल त्याची तर कल्पना करवत नाही... पण एक नाही तर 3 पिढ्या यात उध्वस्त होतायत।
हे सगळं कोणामुळे तर पालघर ठाणे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या एका रॅकेट मुळे, मुलींना खरेदी करणाऱ्यांमुळे होतंय.. याच रॅकेट चा पर्दाफाश झी 24 तासने केलाय. लोकांचं जगणं बतम्यांमधून दिसणं कमी झालेलं असताना या गंभीर प्रश्नाचं विदारक वास्तव राज्यातल्या जनतेसमोर...
OPERATION SAITAAN
राजकीय गोंगाटात हा मुद्दा महाराष्ट्राला किती महत्वाचा वाटतो?
https://t.co/vEjUWVTkh7
ठाण्यातील पाचपाखाडी,नितीन कंपनी परिसरातील बांधकामामुळे होणाऱ्या गंभीर धूळ प्रदूषणावर तातडीने आवाज उठवत ठाणे मनपा आयुक्तांकडे वॉटर स्प्रिंकलिंग,हिरवी जाळी वापरणे व प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.नागरिकांना त्वरित दिलासा द्या