स्थितप्रज्ञ कालखंडाचा अस्त...
दबावात असतांना देखील केनच्या चेहर्यावर येणारे स्मित हास्य आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दिसणार नाही.
2019 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील इंग्लंड विरुद्धचा दुर्दैवी पराभव नेहमीच लक्षात राहील...
कवडसा...! ❣️
यमुना बरीच मोठी झालेली. पाचवीला शाळेत जात होती.सगळं सुरळीत चालू होतं. किसन यमुनाचा बाप आणि शारदा तिची आई. गावाकडे राहत असले तरी शेती आणि त्याला जोडधंदा यातून त्यांचं चांगलं चालू होतं. यमुना त्यांना एकुलती एक मुलगी होती. यमुना गुणी आणि हुशार होती...
अशी ही बनवाबनवी (१९८८) ❤️
सिनेमाचं बजेट होतं १०-१५ लाख, त्याकाळात सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं होतं तब्बल ३ कोटी रुपये. सिनेमा ऑल टाईम ब्लॉकबस्टर झाला. पण मला अजुनही आश्चर्य वाटतं की ३ रुपये तिकिटाच्या दरावर त्याकाळात ३ कोटी व्यवसाय करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. यावरुन तुम्ही विचार करू शकता की हा सिनेमा मराठी लोकांना किती भावला होता. या सगळ्या यशामागे मेहनत होती ती म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, विजू खोटे या मातब्बर सिनेअभिनेत्यांच्या अभिनयाच्या जादूची. २०२८ मध्ये सिनेमाला ४० वर्ष पूर्ण होतील पण मराठी प्रेक्षकांवर त्या सिनेमाची छाप अजूनही तशीच आहे. मराठी सिनेसृष्टीत हा सिनेमा अव्वल असेल कायम. डायलॉग, कास्टिंग, दिग्दर्शन, अभिनेते, अभिनय, स्टोरी या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या बाबतीत खूप चांगल्या जुळून आलेल्या होत्या. अशोक सराफ यांच-धनंजय माने, लक्ष्याचं- परशुराम/पार्वती हे कॅरॅक्टर मराठी सिनेसृष्टीत अजरामर झालेत ❤️
उदाहरणार्थ आई सगळी तयारी करून ठेवायची..पेन पेन्सिल पट्टी..त्यावेळी परीक्षेला जाताना आईचं ठरलेलं वाक्य असायचं.. 'बाळा, येतं ते अगोदर लिही.'
आलं की, आई मायेनं चेहऱ्यावरून हात फिरवायची..दुधात साखर टाकून प्यायला द्यायची.
मग घर सुटलं आणि परीक्षेचं अप्रूप वाटणं बंद झालं..❤️
#नेमाडपंथी
अनेकांनी राज्य निर्माण केलं.. अनेकांनी राज्याभिषेक केले.. अनेकजण राजा झाले... पण रयतेसाठी रयतेचं राज्य हे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवून राज्य निर्माण केलं फक्त छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले या श्रीमंतयोगीने...
#शिवराज्याभिषेक
हजारो गाणी येतील आणि जातील पण जी ऊर्जा या गाण्यात आहे ती कोणत्याच गाण्यात दिसणार नाही.😊
हे गाणं ऐकताना फक्त डोळे जरी मिटले तरी समोर महाराजांचा राज्याभिषेक समोर येतो.
राजं छत्रपती झालं ❤️ #शिवराज्याभिषेक
१) Folk लोक 🚩
२) Folk आख्यान 🚩
३) अभंग repost 🚩
४) The लोकरंग🚩
हे फक्त show राहिले नाहियेत तर महाराष्ट्राची सांस्कृतिक, लोककलेची ओळख बनले आहेत. खरा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि लोककलेचा वारसा तर ते पोरं जपत आहेत. एकदा का ही गोडी लागली की ते काही केलं तरी सुटत नसते. शब्द कमी पडतात अशा कलाकारांची प्रशंसा करायला. Respect 🫡
तुझ्याकडे माझा कोणता नवस नाही की कोणतं मागणं नाही..आहे फक्त तुझ्यावर निव्वळ प्रेम... तू दिलंस त्यात समाधानी आहे.. तू माज येईल इतकं दिलं नाहीस की कुणापुढे हात पसरावा लागेल असंही नाही... तुझ्यावर प्रेम करण्याचा माझा अधिकार अबाधित राहुदे इतकंच काय ते बा विठ्ठला...!
#बा_विठ्ठला ❣️