आजकाल माणसांमध्ये पेशन्स कमी होत चालला आहे आणि कदाचित त्यामागचं कारणही खूप खोल आहे. प्रत्येक जण कुठेतरी धावत आहे..काहीतरी मिळवण्यासाठी, कुणाला तरी मागे टाकण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी. या धावपळीत थांबून स्वतःला ऐकणं, समजून घेणं हेच हरवत चाललं आहे..🙌
पेशन्स म्हणजे फक्त वाट पाहणं नाही..तर त्या प्रतीक्षेतही शांत राहून स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. पण आजकाल लगेच घडत नाही म्हणून लोक तुटतात, थकतात आणि कधी कधी हार मानतात. खरं तर काही गोष्टी वेळ मागतात कारण त्या फक्त मिळायच्या नसतात..त्या घडायच्या असतात..🙌
कदाचित आपल्याला पुन्हा शिकावं लागेल..थांबायला नाही तर वाट पाहताना हरवू नये हे. कारण वेळ नेहमी योग्य गोष्टी योग्य वेळेला घडवतो आणि पेशन्स हे त्या प्रवासाचं सर्वात शांत पण सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे..😇🙌
आपल्याकडे लक्ष देणारी माणसं आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व कळलेलं चांगलं असतं.. एकदा की ती माणसं दूर गेली.. की, स्वतःला जपणं ही जिकिरीचं होऊन जातं..❤️
#जगण्याची_रीत
शाळेत सोडताना, क्लासला जाताना, संध्याकाळी उशीर झाला की जीव खाली वर होतो. कारण आपण रोज"काही ना काही"बघतो, ऐकतो. महाराष्ट्रात असो की नसरापूर - कुठेच सुरक्षित नाही वाटत.
1. निर्भया झाली - देश पेटला. काय झालं
2. कोपर्डी झाली - मोर्चे निघाले. काय झालं
3. आज नसरापूर - उद्या नवीन.
आमच्याच मातीत आमचाच अपमान! हक्काचं तिकीट, तरीही प्लॅटफॉर्मवर उभे: खिशात कन्फर्म तिकीट असतानाही रत्नागिरी स्टेशनवर आम्हाला गाडीत शिरू दिले जात नाही. का? कारण पूर्ण डबा अवैध गर्दीने आणि परप्रांतीयांनी व्यापलेला असतो.nव्हिडिओ: Nitin Satope
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे राजमाता जिजाऊ खंबीरपणे उभ्या होत्या.महात्मा फूलेंच्या सोबतीला सावित्रीबाई होत्या.बाबासाहेबांच्या साथ द्यायला रमाबाई कणखर होत्या.
प्रत्येक पुरुषामागे कधी आई तर कधी पत्नी,कधी बहिण म्हणून स्त्री कायम पाठीशी उभी असते.
जागतिक महिला दिनाच्या शुभेछा!!
सगळ्यांनीच छत्रपती व्हायला जाऊन जमायचं नाही.. आपापली कुवत ओळखून.. कोण तानाजी व्हा..कोण बाजी व्हा.. मुरारबाजी व्हा.. कोण जिवा महाला व्हा.. कोण शिवा काशीद व्हा..आव्हानं लाख पेला.. पण ठायी छत्रपतींचे संस्कार ठेवा.. जय शिवराय..🔥❤️
#ChhatrapatiShivajiMaharaj
सविनय आवाहन
महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव आग्रही असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या धक्कादायक निधनाने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
याच दुःखद परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराच्या अनुषंगाने माझे सर्व सहकारी, मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व उमेदवार यांना सविनय विनंती आहे की प्रचार करताना कोणत्याही प्रकारचे हार, तुरे, सत्कार, वाजंत्री, बँड, हलगी, फटाके टाळून, निवडणुकीची प्रचार यंत्रणा साध्या पद्धतीने राबवावी
अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे भान व जाण ठेवूनच ही निवडणूक लढवावी, ही नम्र विनंती
मृत्यू नंतर पोराने टाळूला लोणी लावावे
तोंडात तुळशीपत्र द्यावें आणि तोंडात जल सोडावे
पण हे संस्कार जेव्हा वर कपड्यावर झाले
हे बघताना
आणि डोळे हळूच ओले झाले
बा विठ्ठला........कुणाच्या नशिबी हे नको
अजातशत्रू कोणी नसतो, पण मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या शत्रूलाही मानाचा मुजरा करावा, ही या महाराष्ट्राच्या मातीची रीत आहे!
काल महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान पुत्र गमावला. अजितदादांच्या जाण्याने केवळ राजकारणातील एक पद रिकामे झाले नाही, तर प्रशासकीय शिस्तीचा एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला. उभ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत मग तो चाहता असो वा कट्टर विरोधक. कारण, इथली माती सुडाचे राजकारण शिकवत नाही, तर माणुसकीचे मूल्य जपायला शिकवते.
आज जो एकोपा महाराष्ट्र दाखवत आहे, तेच आपल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. इथे आखाड्यात कुस्त्या खेळल्या जातात, विचारांची शिंगे फसवली जातात, पण नियतीने घाला घातला की आम्ही सर्व मराठी म्हणून सह्याद्रीसारखे एकत्र उभे राहतो. हीच ती छत्रपतींची शिकवण आहे.
दुसरीकडे, काही राज्यांतून (BIMARU ) व्यक्त होणारा आनंद हा त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे. ज्यांना मृत्यूचा उत्सव साजरा करावासा वाटतो, त्यांनी समजून घ्यावे की, आमचा महाराष्ट्र विचारांनी लढतो, विकृतीने नाही! संकटात हसणे हे नामर्दाचे लक्षण आहे, तर दुःखाच्या प्रसंगी खांदा देणे ही मर्दाची ओळख आहे. ही बिमारू मानसिकता म्हणजे मानवी मूल्यांचा अपमान आहे, ज्याचा निषेध करावा तितका थोडाच!
अजितदादा,
तुमचा तो स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर असलेली पकड आणि पहाटेपासून कामाला लागण्याची ती जिद्द... महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव तेवत राहील. एका पर्वाचा असा अकाली अंत चटका लावून जाणारा आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
#अजितपवार
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐
#भावपूर्ण_श्रद्धांजली
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!