रत्नागिरी येथे उभारणार २५ कोटींचे मराठी भाषा संग्रहालय! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि संशोधनासाठी शिवसेना-महायुतीचा महत्त्वपूर्ण निर्णय !
#Shivsena#EknathShinde
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब या शिवसेनेच्या दैवतांना गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन!
#Shivsena#Eknathshinde#गुरुपौर्णिमा
ll राम कृष्ण हरी ll
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित भव्य महाआरती सोहळ्यास ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह आवर्जून उपस्थित राहावे, असे सस्नेह आवाहन आहे.
भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम असलेल्या या पवित्र महाआरती सोहळ्यात सहभागी होऊन श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. आपल्या सन्माननीय उपस्थितीमुळे या भक्तिमय सोहळ्याचे वैभव अधिक वृद्धिंगत होईल.
🗓️ शनिवार, २५ जुलै २०२६
🕕 सायंकाळी ६:०० वाजता
📍 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट, ठाणे (प.)
@PratapSarnaik
📍 मुंबई |
#महाराष्ट्र - #कर्नाटक राज्यातील सीमाप्रश्नावर आज उच्चाधिकार समितीची विशेष बैठक विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठक सभागृहात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी उच्च अधिकार समितीचे सदस्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सचिन कल्याण शेट्टी, रोहित आर.पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रकाश आवाडे तसेच सबंधित विभागाचे अधिकारी आणि ज्येष्ठ वकील उपस्थित होते.
#Mumbai #Maharashtra #Karnatak #BorderIssue #EknathShinde
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@PawarSpeaks@ChDadaPatil@shambhurajdesai@mrhasanmushrif@Jayant_R_Patil
#ठाणे |
ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्कालीन यंत्रणा सतर्क रहावी आणि त्याद्वारे तातडीने मदत पोहचवली जावी अशा सक्त सूचना देत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी शिंदे साहेबांनी दिले.
ठाणे शहरात मुसळधार पावसात पाणी साचू नये यासाठी ८४ पंप तैनात करण्यात आले आहेत. सध्या सोसाट्याचा वारा आणि हवेचा दाब असल्याने झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडांच्या फांद्या छाटून पडलेली झाडे हटवण्याचे निर्देश यावेळी शिंदे साहेबांनी दिले. तसेच आपत्कालीन कक्षातील जे अधिकारी काम करत नाहीत त्यांना त्वरित बदलण्याचे तसेच वृक्ष प्राधिकरणात चांगले अधिकारी आणून कार्यक्षमता वाढवण्याचे आदेश दिले.
यासोबतच ठाणे मनपामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी तात्काळ आऊटसोर्सिंग करून कमी पडणारे कर्मचारी भरावे. तसेच गरज वाटल्यास इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी वापरा असेही यावेळी शिंदे साहेबांनी सुचित केले.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, #शिवसेना गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Eknathshinde
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे जाणार्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकर माफ करण्याचा निर्णय शिवसेना महायुती सरकारने घेतला आहे. ६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत ही टोलमाफी लागू असेल. या निर्णयामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
#Shivsena#EknathShinde
Mumbai observed heavy rain & wind since 5 days, as instructed by our leader @mieknathshinde ji our team worked on-field to resolve issues such as untrimmed tree, water logging, non-operational street light, open manhole faced by the residents
@DrSEShinde ji @RahoolNKanal ji
1/2