सहकार हा केवळ आर्थिक प्रगतीचाच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचाही आधार आहे. देशाच्या समृद्धीची मुळे ही सहकारातच रुजलेली असतात.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार क्षेत्रातील सर्व शेतकरी आणि कर्मचारी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
#InternationalCooperativeDay #जागतिकसहकारदिन
आज मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णू देव वर्माजी यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी बैठकीदरम्यान राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सक्षम व गुणात्मक करण्यासाठी राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या विविध कल्याणकारी योजना तसेच विभागाच्या आगामी धोरणात्मक नियोजनाबाबत यावेळी सकारात्मक संवाद साधला.
त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांना अधिक गती देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी हे देखील उपस्थित होते.
📍३ जुलै २०२६, मुंबई
#HigherEducation #SkillDevelopment #उच्चवतंत्रशिक्षण
@Jishnu_Devvarma@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
आज मुंबईतील विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावलेजी आणि खासदार श्रीरंग बारणेजी यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्माचित उपसभापती सचिनजी अहिर यांच्या दालनास सदिच्छा भेट दिली.
यावेळी सर्वांनी सचिनजी अहिर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. उपसभापतीपदाची ही नवी जबाबदारी ते उत्तमरीतीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान विधान परिषदेच्या आगामी कामकाजाविषयी आणि विविध लोकहितकारी विषयांवर सकारात्मक चर्चाही झाली.
📍३ जुलै २०२६, मुंबई
#महाराष्ट्र_विधानपरिषद #मुंबई
#Mahrashtra
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@Prof_RamShinde@AhirsachinAhir@MPShrirangBarne@ibharatgogawale
जगामध्ये भारतीय संस्कृतीचा अभिमान उंचावणारे युगप्रवर्तक आणि तरुणांचे प्रेरणास्थान, स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे आदर्श जीवन आणि विचार आपण कायम आत्मसात करूया.
#SwamiVivekananda#स्वामीविवेकानंद
विधानपरिषदेत बोलताना नक्षलग्रस्त व डोंगराळ भागांतील कॉलेजेससाठी ६७५ कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवल्याची माहिती दिली. तसेच प्राध्यापक भरती, MSW कॉलेजेसची पुनर्रचना आणि विद्यार्थ्यांची फी प्रतिपूर्ती करून शासन सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवणार असल्याचे आश्वस्त केले.
📍विधानभवन,मुंबई | २ जुलै २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#HigherEducation
#NaxalAreaDevelopment
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निकच्या) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 02-07-2026 ही शेवटची तारीख होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत 1,61,786 उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर त्यापैकी 1,32,996 विद्यार्थ्यांनी शुल्क भरुन अर्ज निश्चित केले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद पाहता, विद्यार्थ्यांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी देण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवार दिनांक 06-07-2026 पर्यत अर्ज करू शकतील.
प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेरींचे तारखांसह सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, तसेच अर्ज भरण्यासाठी https://t.co/UobpllZAJz या वेबसाइटला भेट द्यावी आणि सुधारित अंतिम तारखेचा लाभ घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी SEBC आणि OBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांना 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
#MaharashtraGovernment #Admission2026 #EducationUpdate #CasteValidity
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
नवीन शैक्षणिक धोरण आणि प्राध्यापक भरतीच्या निकषांबाबत विधानपरिषदेत भूमिका मांडली. सध्याची प्राध्यापक संख्या शासन निर्णयानुसारच निश्चित करण्यात आली असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ सुधारल्या जातील, असे सभागृहात नमूद केले.
📍विधानभवन,मुंबई | २ जुलै २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#प्राध्यापकभरती
#शैक्षणिकधोरण
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
महाविद्यालयीन भरतीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी जॉइंट डायरेक्टर स्तरावरील NOC बंद करून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली असून, दोषींवर कडक कारवाई केली आहे. विद्यार्थी संख्येनुसार पारदर्शक पदवाटप करण्यात आले असून, शारीरिक शिक्षण व ग्रंथालय विषयांच्या मान्यतेसाठी अर्थ खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे निवेदन विधानपरिषदेत केले.
📍विधानभवन,मुंबई | २ जुलै २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#प्राध्यापकभरती
#उच्चशिक्षण
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
गडचिरोली व चंद्रपूरसाठी स्वतंत्र सहसंचालक (JD) कार्यालय मंजूर करण्यात आले असून, तूर्तास नागपूरच्या अधिकाऱ्यांची साप्ताहिक उपस्थिती निश्चित केली आहे. तसेच प्राध्यापकांच्या CAS प्रश्नासाठी स्वतः दिल्लीत पाठपुरावा करणार असून, संपूर्ण गडचिरोली जिल्हा १००% अनुदानित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे विधानपरिषदेत नमूद केले.
📍विधानभवन,मुंबई | २ जुलै २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#HigherEducation
#Gadchiroli #Chandrapur
#UGC_CAS
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली..!
मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजयाजी मेहता यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणून जी पिढी घडवली, त्याचे ऋण मराठी संस्कृती कधीच विसरणार नाही. चित्रपट असो वा नाटक, त्यांची प्रत्येक कलाकृती म्हणजे अभ्यासाचा विषय होती. एका युगाचा अंत झाला असला, तरी त्यांनी दिलेला वारसा अनंत काळ जिवंत राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो.
ॐ शांती 🙏🏻
आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होऊन आज यशस्वी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
गेल्या एका वर्षात आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे पक्ष संघटनेला नवी ऊर्जा आणि गती मिळाली. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दृढ करत संघटन विस्तारासाठी आणि पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आपण घेतलेले परिश्रम निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहेत.
आगामी काळातही आपल्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र अधिक बळकट होऊन नवे यश संपादन करेल, असा दृढ विश्वास आहे.
आपल्याला पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#भाजपा_महाराष्ट्र #प्रदेशाध्यक्ष #रवींद्र_चव्हाण #RavindraChavan
#BJPMaharashtra
@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
भावपूर्ण श्रद्धांजली..!
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जालिंदरभाऊ कामठे त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. समाजकारणात आपल्या कर्तृत्वाने एक आदर्श निर्माण करणाऱ्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जालिंदरभाऊंनी आपल्या कार्यकाळात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. आपल्या साध्या, मनमिळावू स्वभावाने आणि लोकसेवेने त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि कामठे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
ॐ शांती 🙏🏻
@BJP4Maharashtra@BJPForPuneCity