पुण्यात सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलावर आल्यावर डावीकडे कर्वे नगरच्या दिशेने “पुस्तकघर" आहे. वाचकांसाठी विविध प्रकारची पुस्तके वाचायला मोफत आहेत. तुम्ही पुस्तके वाचण्यासाठी घरी देखील घेऊन जाऊ शकता. इथे पुस्तके दान करता येतात. 📚📖
@LetsReadIndia#पुणे
माझ्या प्रबंधाच्या निमित्ताने मी सावरकरांच्या विचारांचा अभ्यास केला होता. आता 'सावरकर : तीन भावांची गोष्ट' लिहितो आहे. निष्ठा एकच असली तरी बाबूराव, तात्याराव आणि डॉक्टर नारायणराव यांचं वेगळेपण काय याचा शोध यात घेतला आहे.
#सावरकरजयंती
चिदानंद नगरकर हे माझे जवळचे नातेवाईक. मी संगीतक्षेत्रात शिरलो त्यांच्या प्रभावाखाली. शिकलो मात्र पंडित एस सी आर भट यांच्याकडे. तरीही गुरुऋण मानून 'तीन गानमूर्ती'मधून नगरकरांचं चरित्र आणि 'चित् आनंद' मध्ये त्यांच्या बंदिशी मी उपलब्ध करू शकलो.
#चिदानंद_नगरकर_पुण्यतिथी
ग्रेस, प्रत्यक भेटण्याआधीपासून आपले संबंध आहेत; ते इतके घट्ट की ग्रेसचे प्रकाशक-मित्र अशी माझी ओळख तयार व्हावी... केवळ मीच नव्हे तर आम्ही सगळेच तुमचे झालो.
#ग्रेस_स्मृती
आताच निरोप आला आहे कशासाठीही बाहेर पडू नका आणि कोणालाही भेटू नका. तेव्हा इंटरनेट माझा सखा -- तोही एकुलता एक -- म्हणण्याची पाळी आली आहे.
#घरीच_राहा_सुरक्षित_राहा#कंटाळा_आलाय
रवींद्रनाथ टागोर ह्यांची आठवण काढायला जन्मदिवसच का हवा? साहित्य, संगीत, चित्रकला, नाटक, शिक्षण -- सगळं त्यांच्या शिवाय अशक्य. दहा वर्षांपूर्वी शांतिनिकेतनला गेलो होतो तेव्हाही कुठेही जा; ते भेटायचेच.
#Remembering_Ravindranath
6 मे 2001 रोजी बाळूताई गेल्या तेव्हा मी पुण्याला गेलो होतो. कसलेही अंत्यविधी करायचे नाहीत ही त्यांची इच्छा पाळली गेली. त्यांचं लेखन काळाच्या पुढे होतं. आजही ते आपल्यासोबत आहेच. ते आम्ही प्रकाशित करू शकलो याचा आनंद वाटतो.
संगीत शिक्षणाला गती देणं शक्य झालं ते 5 मे 1901 ला लाहोरला गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली त्यानंतर. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी आणि काही वर्षांनंतर विष्णू नारायण भातखंडे यांनी अथक प्रयत्नांनी हिंदुस्तानी संगीत घराण्यापलीकडे नेलं.
आज जगासाठी कामगार दिन. महाराष्ट्र दिन या राज्यासाठी. दोन्ही अत्यंत महत्त्वाचे; तरी माझ्या जीवनाला आकार देणाराही हा दिवस. ९७ वर्षांपूर्वी गणेश रामराव भटकळ यांनी पॉप्युलर बुक डेपोची सुरुवात केली. त्यातून एक प्रकाशनसंस्था उभारण्याची संधी आम्हाला मिळाली.
#महाराष्ट्रदिन#मुंबई_१९४५
आज जगासाठी कामगार दिन. महाराष्ट्र दिन या राज्यासाठी. दोन्ही अत्यंत महत्त्वाचे; तरी माझ्या जीवनाला आकार देणाराही हा दिवस. ९७ वर्षांपूर्वी गणेश रामराव भटकळ यांनी पॉप्युलर बुक डेपोची सुरुवात केली. त्यातून एक प्रकाशनसंस्था उभारण्याची संधी आम्हाला मिळाली.
#महाराष्ट्रदिन#मुंबई_१९४५
लहानपणी 1 एप्रिलला आम्ही फुल बनवत असू आणि होतही असू. गेली दोन वर्षे हा महिना जाताना वेडावून जात आहे. पुढील दोन महिन्यांत जबाबदारीने वागून आपण त्यालाच वाकुल्या दाखवूया.
गेले काही दिवस मी काही सांगितलेलं तुम्ही वाचावं अशी मन:स्थिती नव्हती. योगायोगाने काही आप्तांचे वाढदिवस एका पाठी एक आले. प्रत्येक जण आनंदात होता. माझ्या नातवाने केलेली व्याख्या आठवली, आनंदाचे छोटे छोटे तुकडे जोडा म्हणजे सुख सापडेल.
#एक_धागा_सुखाचा
काल कस्तुरबा गांधी यांचा मानलेला जन्मदिवस. बा बापू यांच्यावर मी तीन कथा लिहिल्या आणि जगदंबा नाटक. ते लिहिताना जणू मी त्यांच्या आसपास होतो त्या अनुभवातून बाहेर पडूच नये असं वाटायचं.
Tweet
आज दांडी यात्रा पूर्ण झाल्याचा दिवस. गांधीजींसारखं सर्वंकष विचार करण्याचं भान आपल्याला कधी येणार? मिठाचा सत्याग्रह असो की येरवडा तुरुंगातील उपोषणं, सबंध देश जागृत करण्याची शक्ती त्यांच्यात होती.
आज विश्व बालसाहित्य दिन.
पन्नास वर्षांपूर्वी विंदा करंदीकर सदानंद रेगे मंगेश पाडगावकर सरिता पदकी भा. रा.भागवत रत्नाकर मतकरी यांचं बालवाङमय पॉप्युलरने प्रकाशित केलं. नंतर आम्ही का थांबलो? या श्रेष्ठ पुस्तकांचं फारसं स्वागत झालं नाही. शिवाय तसं उत्कृष्ट लेखनही पुढे हाती आलं नाही.