#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 नितीन रिंढे
या कादंबरीतली गोष्ट नेमकी आहे कोणाची ? एका भांडीविक्याने घेतलेल्या एका लेखकाच्या शोधाची की भांड्यांवर नावं ���ालणाऱ्या लेखकाची ? लेखकाने लिहिलेल्या सिनेमाच्या पटकथेची की त्या पटकथेत न मावणाऱ्या शेतकऱ्याची ? जोतीराव फुल्यांच्या स्वप्नभंगाची की दिवसेंदिवस स्वार्थी-आत्मकेंद्री विखंडीत होत चाललेल्या समकालीन समाजाची ? की या सगळ्यांचीच ? सांगणं अवघड आहे. पण ही केवळ गोष्ट नाही एवढं निश्चित.
झपाट्याने 'नागर' होत चाललेल्या ग्रामीण-बहुजन समाजाविषयीचा, त्यातल्या व्यक्ती आणि कुटुंबांविषयीचा हा गुंता आहे. नागरीकरणाच्या वामनी पावलाने समाजाच्या तळाशी गाडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाविषयीचा हा गुंता आहे. वाजतगाजत सुरू असलेल्या नागरीकरणाची नेमकी दिशा कोणती? ती आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे ? या नागरीकरणाची मूल्यव्यवस्था कोणती? त्यातून कोणाचं हित जपलं जात आहे ? अशा कळीच्या प्रश्नांचा हा गुंताळा आहे.
ही कादंबरी व��चणं म्हणजे प्रश्नांच्या या गुंताळ्यात गुरफटत जाणं. वाचकाची त्यातून सुटका नाही आणि कादंबरीला शेवट नाही.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
परंतु हे अनुभव साहित्यिक व कल���त्मक दृष्टीने पटलावर मांडणे प्रत्येक पोलिसाला जम���लच असे नाही. या पुस्तकात असे सुंदर अनुभव राजमाने यांनी मांडले आहेत.
पुस्तकाची नोंदणी खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर 986724240 किंवा या लिंकवर करा.
https://t.co/rC2k5DrV3T
या मोठ्या जगामध्ये प्रत्येकाचे आपापल्या अनुभवांनी समृद्ध असे एक छोटेसे जग असते. पोलिसांचे जग तर अनेक साहसी धाडसी जिकिरीच्या, नकोशा वाटणाऱ्या तरीह�� कराव्या लागणाऱ्या कर्तव्यांचे, कायदा-सुव्यवस्था हाताळताना झालेल्या संघर्षाचे तथापि समाधानाचे, वैश्विक आनंदाच्या अनुभवांनी समृद्ध असते
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
नक्षलग्रस्त प्रदेशात बऱ्याच कालावधीकरिता आपले पोलीस-कर्तव्य बजावणाऱ्या गजानन राजमाने यांच्या अनेक चित्तथरारक अशा कार्यानुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. समोर आलेले गुन्हेगार, अन्यायग्रस्त माणसे, आरोपी अशा सगळ्यांकडेच सर्वप्रथम माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन हे पुस्तक देते.
गुन्हा करण्यामागील काहीएक अपरिहार्यता व्यक्तीला गुन्हेगार बनवत असते. गजानन राजमाने यांनी आपल्या आजवरच्या पोलीस-प्रशासकीय सेवेत गुन्हेगारांच्या अशा अपरिहार्यता समजून घेऊन, त्यावर प��िणामकारक उपाय योजून त्यांतील अनेकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्याचं काम केलं आहे. धर्म-जात यापलीकडे जाऊन त्यांनी बाळगलेला हा मानवीय विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे आणि यातील प्रत्येक प्रकरण वाचताना त्याची प्रचिती येते. त्यामुळे पोलीस सेवेत येऊ इच्छिणाऱ्या मुलामुलींकरिता हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
जगातील सर्व सत्ये, दुःखे शेवटी पोलिसांच्या जवळ येऊन थांबतात. त्यामुळे त्यांच्याकडे लिखाणाचे विषय होतील अशा उत्सुकता वाढविणाऱ्या, रोमांचकारी, जगण्याचे न उलगडलेले पैलू दाखविणाऱ्या गोष्टी साठलेल्या असतात. त्यांचे जग अनेक अनुभवांनी सजलेले असते.
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 कृष्णात खोत
अमर गोरे यांची ‘पारक’ ही कादंबरी गावखेड्यात उनाड बागडणाऱ्या पौगंडावस्थेतल्या मुलाच्या भावविश्वाचे चित्रण करते. गावस्तरावरील वाडीतील बहुविध जगण्याचे अतिशय तरल आणि सेंद्रिय अनुभव देणारे हे लेखन आहे. कोवळ्या वयातील मुलाचे कुतूहल, निरागसपणा, अल्लडपणा आणि त्यातून तयार होणारे नायक आणि त्याच्या मित्रांचे फंटीमय जग या कादंबरीत रंगांच्या विविध छटांसारखे कागदावर सांडत जाते. तर, वाडीतील जगण्यातले अंतर्गत मतभेद-विरोधाभास, त्यातून होणारा संघर्ष, निवेदकाची आई, मोठा भाऊ, बाप, बापाचे गावातले कारभारपण, त्यांच्या आपसांतल्या विवंचना अशा अनेक घटनांचे चिरकालीन पडसादही कादंबरीभर उमटत राहतात.
झाडे, वारा, पाखरे, यांसारख्या कित्येक निसर्गघटकांचे, भवतालाचे असंख्य आवाज आणि त्यांच्याशी समरस होऊन गेलेल्या नायकाच्या कोमल, हळव्या भावविश्वाचा नवानाद आणि त्याचा जैविक असा गंध अविरत आपला माग काढत राहतो. आपल्या अनुभवाला, आपल्या भवतालाला कोणतेही अस्तर न लावता केलेल्या या लेखनात नैसर्गिकपणाच्या अनेक खुणा पानोपानी जाणवतात. हे ‘पारक’ या कादंबरीचे वेग��ेपण आहे.
कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या नायकाच्या बालमनाची नाडी सतत थडथडत ठेवणारी आणि विस्मरणात निघालेल्या खेड्यातल्या उघड्या जगाचे अनोखे दर्शन घडवणारी ही महत्त्वाची कादंबरी आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
काल दिल्लीत 'संगीत देवबाभळी' पाहिलं. इतकं अप्रतिम नाटक अद्याप पाहिलं नव्हतं, याचं वाईट वाटलं. अत्यंत अस्सल कलाकृती. 'भद्रकाली' आणि प्रसाद दादांचे खरंच आभार. यापूर्वी वोल्गा या तेलुगू लेखिकेची 'सीतेची मुक्ती' आणि 'यशोधरा' ही पुस्तकं वाचली होती, त्यांची आठवण झाली. @PrasadMKambli
फायद्यांसकट जुनं सोडत राहावं. तोट्यांसकट नवं घेत राहावं. असं भटकं तत्त्वज्ञान मानगुटीवर ठेवून, आहे त्या गोष्टींना बुडवून, सगळ्या वस्तुजातावर आपण सूड घेत राहावं. एकदा उलथून पडल्यावर कशातच मुळं रुतवावीशी वाटत नाहीत. फारकतीमागून फारकती. निव्वळ फारकती.
— जरीला / नेमाडे
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
#विंदाकरंदीकर यांनी आपल्या काव्यप्रवासात सामाजिक, लैंगिक व चिंतनात्मक अशा तीन जाणिवांची कविता लिहिली. यांपैकी लैंगिक जाणिवेची कविता त्यांनी आरंभापासून अखेरपर्यंत लिहिली. हिलाच स्थूलमानाने प्रेमकविता असे म्हणता येईल. या कवितेने अन्य ��ोन जाणिवांनाही सहजपणे स्वतःत सामावून घेतले आहे. तसेच करंदीकरांनी केलेल्या बहिरंगविषयक प्रयोगांनाही त्यांच्या प्रेमकवितांमध्येच अधिक लक्षणीयता आली आहे.
करंदीकरांवरील विविध संस्कारांचा मागोवा घेण्यासाठीही त्यांची प्रेमकविताच अधिक साहाय्य देते. या कवितेत विविध संस्कार आत्मसात करून अधिक समृद्ध, अधिक स्वतंत्र झालेल्या करंदीकरांचे दर्शन होते. येथे ते संस्कार स्वीकारण्याची आणि न��कारण्याची अशी दुहेरी भूमिका दिसते आणि या संवाद-संघर्षातून प्रेमकवितेला अधिक बळ मिळाल्याचा प्रत्यय येतो. तसेच स्त्री हे त्यांच्या कवितेचे महत्त्वाचे केंद्र असल्याची जाणीवही त्यांच्या प्रेमकवितेतच अधिक ठळकपणे होते. सारांश, करंदीकरांची प्रेमकविता हा त्यांच्या निर्मितीचा गाभा आहे. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा आणि सर्वसमावेशक जाणिवेचा शोध प्रेमकवितेच्या अनुषंगाने घेणेच फलदायी ठरते.
अशा अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या विंदांच्या या प्रेमकवितेचे एकत्रित दर्शन या संकल��ात घडविण्याचा हा प्रयत्न आहे. विजया राजाध्यक्ष यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेमुळे या कवितेचे अनेक पैलू विविध कोनांतून उलगडण्यास वाचक -समीक्षकांना मदत होईल व काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विंदांच्या या महत्त्वपूर्ण कवितेवर नव्याने प्रकाश पडेल.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#प���स्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 राजन गवस
कृष्णात खोत यांच्या 'झड-झिंबड' या कादंबरीत पाऊस वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतील एकमेव कादंब��ी आहे. पावसाची विविध रूपे ह्या कादंबरीत सहजपणे विकसित होत जातात. शेतकरी आणि पाऊस, खेडे आणि पाऊस यांचे असणारे अनोखे नातेबंध या कादंबरीत उलगडत जातात. झडीचा पाऊस येण्याआधी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा गाव आणि झडीचा पाऊस सुरू झाल्यानंतर बेहाल झालेले गाव या कादंबरीत चित्रित झालेले आहे.
पाऊस आपला स्वभाव बदलतो आहे याचे कारण आपण अपरिमित केलेली सृष्टीची हानी हे या कथेपाठीमागचे गर्भित सूचन आह���. अपरिमित ऊर्जेची नासाडी, निसर्गावर केलेला अनन्वित अत्याचार यांमुळे पाऊसही आपले रूप बदलतो आणि सुरू होतो झड-संताप. या झडीत गाव, माणूस, शेती, वृक्षवल्ली, जलचर, पाळीव प्राणी हे सारेच हतबल, अगतिक होऊन जातात आणि त्यांची दाणादाण उडून जाते. पाण्याचे, पावसाचे आणि माणसाचे नवे ताणतणावात्मक, उद्ध्वस्ततेकडे झुकलेले नातेबंध ही कादंबरी वाचकासमोर ठेवते.
जागतिकीकरणानंतर बदलती अर्थव्यवस्था, बदलते नातेसंबंध या पार्श्वभूमीवर पावसाची झड लागल्यानंतर संकटात सापडलेल्या माणसाला लुटण्याची भावना होणे आणि तशा पद्धतीचा व्यवहार अस्तित्वात येणे हे बदलत्या कृषिजन सं��्कृतीतील नवे आवर्तन, ताणतणाव ही कादंबरी अधोरेखित करते. पावसाने हाहाकार मांडल्यानंतर जीव गमावणारे, जीव वाचविण्यासाठी धडपडणारे, जगण्याची तीव्र आकांक्षा असणारे या सर्व परिस्थितीत कसे बदलतात, वर्तन करतात याचे सूचन कादंबरीच्या सर्व तपशिलातून कृष्णात खोत अतिशय समर्थपणे करतात.
महापुरातील चौमाळ पाण्यासारखी कृष्णात खोत यांची भाषा या कादंबरीत वाचणाऱ्याला खिळवून ठेवतेच, पण त्याहीपे��्षा अधिक घन मानसिकतेतून द्रव मानसिकतेत आणून वादळी व्हायला भाग पाडते. हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे. ही कादंबरी सुजाण वाचकाला विचारप्रवण करतेच पण त्याबरोबरच वाढत्या महापुरासारखी त्याला वाढविते, पसरविते पण कशाचाही नाश न करता आंतरिकतेला संपन्न करते.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_त��थे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकाचे नाव - ��्कायक्रेपर्स
लेखक - तहसीन युचेल
अनुवाद - शर्मिला फडके
मुळ तुर्की भाषेतील ही कादंबरी आपल्यासमोर भविष्यातील जवळपास अर्धशतकांनतरचे २०७३ सालातील सामाजिक व राजकीय चित्र उभे करते. जे अत्यंत भयावह आहे.
@LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth
@DrVidyaDeshmukh उलट अनुभव असा आहे की अलीकडे non fiction पुस्तकंच जास्त वाचली जातात, विशेषतः व्यक्तिमत्त्व विकासावरच्या पुस्तकांना खूप मागणी आहे. खरंतर व्यक्तिमत्त्व विकासासाठी, आपली भाषा आणि वैचारिक पातळी उंचावण्यासाठी चांगलं ललित साहित्य वाचणं गरजेचं आहे.
@KulkarniRL शिरा, उपमा, लापशी, काही वेळा ढोकळा, इडली, अप्पे यांत गव्हाचा रवा वापरतात. कटलेट, पॅटीस, मासे तळण��यासाठी रवा वापरतात. गव्हाचा रवा वापरून केलेले सगळे पदार्थ.
@namdevwrites धनंजय कीरांनी इंग्रजीत लिहिलेलं बाबासाहेबांचं चरित्र - Dr. Babasaheb Ambedkar: Life and Mission- बाबासाहेब हयात असताना प्रकाशित झालं होतं. ते लिहिताना स्वतः बाबासाहेबांनी कीरांना एक प्रदीर्घ मुलाखत दिली होती आणि प्रकाशनापूर्वी स्क्रिप्ट वाचून मान्यता दिली होती.