अनाथस्य जगन्नाथ नाथस्त्वं मे न संशयः।
यस्य नाथो जगन्नाथस्तस्य दुःखं कथं प्रभो॥
श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथील श्रद्धा, भक्ती आणि निस्सीम समर्पणाचा महासोहळा—'श्री जगन्नाथ रथयात्रा' आजपासून सुरू होत आहे. सर्व भाविकांना जगन्नाथ रथयात्रा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
निसर्गाच्या अथांग सौंदर्याला आणि मानवी भावनांना शब्दांचे अलौकिक कोंदण देणारे संस्कृत साहित्याचे दैवत, नाटककार, कविकुलगुरू महाकवी कालिदास यांना कालिदास दिनानिमित्त कोटी-कोटी वंदन!
#महाकवीकालिदास#कालिदासदिन
मराठी संगीत नाटकाचे सुवर्णयुग आणणारे अष्टपैलू रंगकर्मी बालगंधर्व पद्मभूषण नारायण श्रीपाद राजहंस यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#बालगंधर्व#मराठी_नाटक#कलाकार#नाटककार#पद्मभूषण
आमचे प्रेरणास्रोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक परमपूजनीय रज्जू भैय्या जी यांना पुण्यतिथीदिनी कोटी-कोटी नमन!
#रज्जू_भैय्या#Rajju_Bhaiya#RSS#BJP
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, पराक्रमी लढवय्ये, शौर्य, त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#बाजीप्रभू_देशपांडे#BajiprabhuDeshpande
ज्ञानाचा दिवा लावून जगताला सन्मार्ग दाखवणारे सद्गुरू, गहिनीनाथांचे शिष्य आणि ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक...ज्यांच्या कृपेने वारकरी संप्रदायाची पायाभरणी झाली, अशा आद्य संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
#संतनिवृत्तीनाथ#पुण्यतिथी#निवृत्तीनाथमहाराज
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते.
#जागतिक_लोकसंख्या_दिन
कोट्यवधी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय श्री. राजनाथ सिंहजी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
#RajnathSingh#BJPFamily#BirthdayWishes
विधिमंडळ आणि संसदेत सामान्य जनतेचा आवाज बुलंद करणारे अभ्यासू आणि निष्कलंक नेतृत्व, स्व. रामभाऊ म्हाळगी यांना जयंतीनिमित्त आदरांजली!
#RambhauMhalgi#संसदपटू#जयंतीअभिवादन
आपल्या अमूल्य निरूपणातून मानवी मनांची मशागत करणारे आणि निस्वार्थ समाजसेवेचा आदर्श घालून देणारे थोर विचारवंत, 'महाराष्ट्र भूषण' डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#NanasahebDharmadhikari#पुण्यतिथी#महाराष्ट्र
विठू माऊलीच्या भेटीची आस,
विठ्ठल नामाचा मुखात ध्यास!..
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. आळंदीतून निघालेला हा वैष्णवांचा मेळा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना!
#ज्ञानोबामाऊली#Wari2026
कारगिल युद्धात पॉईंट ५१४० आणि पॉईंट ४८७५ वर तिरंगा फडकवून वीरगती प्राप्त करणाऱ्या परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#VikramBatra#ParamVirChakra#Kargil1999#IndianHeroes
"काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
आवडिला भाव तया साटी ॥"
पाऊले चालती पंढरीची वाट... 👣
ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सुरु झालेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#तुकाराममहाराजपालखी#आषाढीवारी२०२६#Wari2026
एक देश में दो प्रधान, दो विधान और दो निशान नहीं चलेंगे' हा मंत्र देऊन देशाच्या एकतेसाठी आयुष्य वेचणारे महान नेते, श्रेष्ठ विचारवंत, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#ShyamaPrasadMukherjee
भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची ताकद संपूर्ण जगाला दाखवून देणारे, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन!
#SwamiVivekananda#YouthIcon