जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा साजवाहाळ येथे "संविधान दिन" साजरा.
संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिका वाचन,प्रभात फेरी, वकृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
आयुष्य, अनुभव, नातेवाईक आणि दोस्त हेच आपले गुरु. रोजचाच दिवस आपल्यासाठी पौर्णिमा. गरज पडेल तशी "दुनियादारी" शिकवणाऱ्या सगळ्या मैतररुपी गुरुंना शुभेच्छा आणि वंदन.
असंच पाठीशी उभे रहा! ☺
#GuruPurnima2025
आयुष्यात जंगलात पाय न ठेवलेल्या वाचकाला फक्त आपले अनुभव आणि समर्थ लेखणी यांच्या सामर्थ्यावर जंगलात भटकवून आणणारे मारुती सर आपल्याला सोडून गेलेत 🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏.
आज "शाळा प्रवेशोत्सव" उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा तुंगन दिगर येथे पहिलीतील विद्यार्थ्यांचा उत्सव मिरवणूक, पाऊलाचे ठसे, गणवेश आणि पुस्तक वितरणाने साजरा झाला. पालकांचा सहभाग व उत्साह उल्लेखनीय. मराठी शाळांकडे वाढता कल ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पावती!
#firstdayofschool
स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक ठरविताना राज्य सरकारच्या विविध संस्था, विभागांमधील समन्वयाचा अभाव ; फटका मात्र शेकडो उमेदवारांन बसतोय. #शिक्षकभरती
किमान आता सरकारचेच उमेदवारांनी नेमकी कोणती परीक्षा द्यावी?, हे सांगावे
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dadajibhuse@kamblesandeep12
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा साजवहाळ, ता. मालेगाव येथे दि. 29/03/2025 रोजी "गुढी पाडवा पट वाढवा" या उपक्रमांतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पुस्तकरूपी गुढी उभारून इयत्ता पहिली साठी पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.