अखंड श्रद्धा... अढळ स्वाभिमान...! 🚩
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित मुंबई ते सोमनाथ विशेष रेल्वे यात्रेला आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या 'सोमनाथ स्वाभिमान पर्व - अखंड श्रद्धेची १००० वर्षे' या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित ही यात्रा भारतीय संस्कृती, इतिहास, श्रद्धा आणि स्वाभिमानाचे दर्शन घडवणारी आहे. शतकानुशतके संकटांचा सामना करत पुन्हा उभे राहिलेल्या सोमनाथ मंदिराच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून देणारा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार जी, संयोजक दिनेश झाला, नगरसेवक शिवा शेट्टी, नगरसेवक रोहिदास लोखंडे, कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, मंडळ अध्यक्ष नैनेश शाह, वॉर्ड अध्यक्ष धर्मवीर ठाकूर, रेल्वे अधिकारी, भाजपाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने यात्रेकरू उपस्थित होते.
#सोमनाथ_स्वाभिमान_पर्व #Somnath #Maharashtra #SanjayUpadhyay #Borivali
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या 'सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे' या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित मुंबई ते सोमनाथ विशेष रेल्वे यात्रेला आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
#सोमनाथ_स्वाभिमान_पर्व #SomnathYatra
#MumbaiToSomnath #Maharashtra #AshishShelar
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. येथे आयुक्त अश्विनी भिडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिवसभराचा आढावा घेतला. तसेच उद्याचा हवामान खात्याचा अलर्ट पाहता करावयाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
मुंबईतील पाणी साचणारी ठिकाणे, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते वाहतूक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, रेल्वेसह बेस्ट व अन्य प्राधिकरणांशी असलेला समन्वयाबाबत माहिती घेतली.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
संपूर्ण सत्य जाणून घ्या!
मा. भाजपा मुंबई अध्यक्ष अमितजी साटम जी माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी मा. जयंत पाटील जी यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचा अपूर्ण भाग दाखवत काही माध्यमांनी आणि काही वाचाळवीरांनी चुकीचा अर्थ लावण्याचा व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
या संदर्भात अमितजी साटम जी यांनी सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पूर्ण संभाषण ऐका, वस्तुस्थिती जाणून घ्या आणि त्यानंतरच आपले मत बनवा.
@AmeetSatam
#Bjp #BjpMumbai #Mumbai #AmeetSatam #MPLodha
भावपूर्ण श्रद्धांजली
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या विलक्षण दिग्दर्शनशैली, सृजनशील दृष्टी आणि रंगकलेप्रती असलेल्या अखंड निष्ठेमुळे त्यांनी मराठी तसेच भारतीय रंगभूमीला नवी ओळख प्राप्त करून दिली. त्यांच्या कार्याचा ठसा अनेक कलाकारांना प्रेरणा देत राहील.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. तसेच मेहता कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏
Contingents from the Assam Regiment and the Indian Navy took part in the National Day celebrations of Seychelles yesterday. It was yet another reflection of the enduring friendship between India and Seychelles.
संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आले असून जेष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दुर्मिळ दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचे जतन व संवर्धन करणार आहे. यासंदर्भात विधानपरिषद सभागृहात निवेदन सादर केले.
•संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १५० दुर्मिळ छायाचित्रे व त्यामध्ये भाग घेतलेले नेते, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती उपलब्ध आहेत.
•या मुलाखतींची संख्या ३५ एवढी असून त्यांचा कालावधी सुमारे १ हजार २५८ मिनीटे एवढा आहे.
•"Two women’s Report" , मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका सर्व पक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतर पत्रव्यवहार आदी दस्तऐवजाचा समावेश आहे.
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026 #AshishShelar
राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक घेतली. चर्चेअंती 44 खटले मागे घेण्याबाबत शासनाला शिफारस केली. यापुर्वी झालेल्या बैठकीत 77 खटले मागे घेण्यात आले होते.
आज निर्णय झालेल्या खटल्यांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, सामाजिक कार्यक्रम, गोवंश संरक्षण आंदोलन, कामगार आंदोलन अशा विविध खटल्या़चा समावेश आहे.
#Maharashtra #AshishShelar
Yuva Shakti Driving Viksit Bharat!
India’s Amrit Peedhi is shaping the future with skill, innovation, entrepreneurship and sporting excellence.
Under the vision of Hon PM Narendra Modi Ji, transformative initiatives such as Skill India, PMKVY, Startup India, MY Bharat, Rozgar Melas and Khelo India are empowering youth with opportunities, confidence and global recognition, driving the nation’s journey towards Viksit Bharat.
@narendramodi
#12YearsOfYuvaShakti #KheloIndia #NewIndia #YoungEntrepreneur #ViksitBharat
Maharashtra to Drive the Vision of Viksit Bharat 2047!
Grateful to attend the 11th Meeting of the Governing Council of NITI Aayog, chaired by our Hon PM Narendra Modi Ji.
Under the visionary leadership of Hon PM Modi Ji and his transformative framework of Viksit Bharat 2047, Maharashtra is charting an ambitious roadmap of Viksit Maharashtra 2047 towards becoming $5 trillion economy by 2047.
From strengthening education through NEP 2020, AI-integrated learning and world-class educational hubs to empowering youth through skilling, entrepreneurship, startups and apprenticeships, Maharashtra is building a future-ready ecosystem. Progress in healthcare, women's empowerment, inclusive development, labour and HR reforms, sports excellence and AgriStack-driven agricultural transformation is ensuring equitable and sustainable growth.
As we move forward, Maharashtra remains committed towards focused action plans, aspirational district and taluka development and innovation-led progress, contributing significantly to India's vision of becoming a developed, inclusive and globally competitive nation.
@narendramodi@NITIAayog
#ViksitBharat2047 #GoverningCouncil #ViksitMaharashtra2047
LIVE | श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभ
🕤 रा. ९.३३ वा. | ८-६-२०२६📍डोंबिवली, ठाणे.
#Maharashtra#Thane#PimpaleshwarMahadev https://t.co/9qQiB4A9gx
लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या 'टाइमलाइन' या पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सहभागी झालो.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#AshishShelar
मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा- मुंबई येथे उभारणार जागतिक दर्जाचे मीडिया आणि फिल्मसिटी हब!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे फिल्मसिटीच्या जागेच्या एकात्मिक विकासासंदर्भात बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा 'एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब' उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मान्यता दिली.
सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी. तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी प्रसार भारती, एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे.
या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@ShelarAshish@prasarbharati
#Maharashtra #DevendraFadnavis #PrasarBharati
ગુજરાત વિધાનસભાના વરિષ્ઠ સભ્ય શ્રી યોગેશભાઈ પટેલના અવસાનના સમાચારથી દુઃખ થયું. તેમના નિધનથી મેં મારા સાર્વજનિક જીવનના એક અનન્ય સાથી ગુમાવ્યા છે.
શ્રી યોગેશભાઈ સાચા અર્થમાં લોકનેતા હતા. તેમણે હંમેશાં પ્રજાના પ્રશ્નોને નિષ્ઠા, સંવેદના અને પ્રતિબદ્ધતાથી વાચા આપી હતી.
પરમાત્મા સદ્ગતના આત્માને ચિર શાંતિ આપે અને શોકાકુલ પરિવારજનોને આ અગાધ દુઃખ સહન કરવાની શક્તિ પ્રદાન કરે તેવી હાર્દિક પ્રાર્થના.
ૐ શાંતિ…!!
'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' 🪷🚩
१२ वर्षांचा यशस्वी प्रवासाचा लेखाजोखा 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने करण्यात आला आहे. या तपपूर्तीच्या पूर्वसंध्येला या विशेष संग्राह्य अंकाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले.
रविंद्रजी नाट्यमंदिर येथे झालेल्या या अनावरण सोहळ्याला मंत्री मंगलजी प्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमितजी साटम, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजनजी डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. योगेशजी सागर, प्रदेश सरचिटणीस संजयजी कुटे, प्रदेश सरचिटणीस सुनीलजी राणे, प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
Maharashtra Leading the Way in Impact-Driven CSR
Glad to attend and address the 'TechMahaImpacT: Maharashtra's Premier CSR and Technology Conclave' in Mumbai today.
Maharashtra generates the highest volume of CSR funds in the country, creating immense opportunities to drive meaningful and inclusive development across the state. These resources are being channelled across diverse sectors, including education, healthcare, agriculture and livelihood, ensuring that benefits reach every section of society and every part of Maharashtra.
The Government of Maharashtra and the CSR partners aspire to create a measurable and lasting impact. By bringing together the institutional strength, administrative capacity and implementation ecosystem of the Government of Maharashtra, these efforts will gain greater scale, speed and effectiveness.
When governance and CSR partnerships work in alignment, the impact multiplies significantly, accelerating development outcomes and ensuring that the benefits reach the common citizen in a meaningful way.
This partnership is an absolute win-win model, where collective efforts have the potential to create impact at an entirely new scale and transform lives across Maharashtra.
DCM Sunetratai Pawar, Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were present.
@SunetraA_Pawar@ShelarAshish@Maharashtra_IT@egovonline@eletsonline@EY_India
#Maharashtra #TechMahaImpacT2026 #CSR
कलागंध आर्ट्स तर्फे सेंट्रल रेल्वे मैदान, परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश कार्यशाळेचा शुभारंभ केला.
यावेळी भाजपा मुंबई चिटणीस जितेंद्र राऊत, नगरसेवक रोहिदास लोखंडे, माजी नगरसेवक पराग विठ्ठल चव्हाण, मूर्तीकार सिद्धेश ढिगोळे, राजू शिंदे, निलेश विधाते, सुशांत पोहेकर, सिद्धांत मोहिते उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला अनुसरून आज मान्सूनपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी,कार्यकर्त्यांसह सार्वजनिक उपक्रमातल्या बेस्ट ने दादर ते रे रोड दरम्यान प्रवास केला. सध्याच्या जागतिक तेल संकटात इंधनाची बचत करणं ही आपली महत्त्वाची सामूहिक जबाबदारी असल्याने प्रत्येक नागरिकांनी प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देवून देशाला साथ देणं आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनीही आपला सुरक्षा ताफा कमी करून दुचाकी वरून मंत्रालय गाठले होते. त्यांनी आपल्या कृतीतून राज्यातील जनतेला काटकसरीचा संदेश दिला आहे. तसेच यासंदर्भात प्रशासनस्तरावर नियमावली ही आखून दिली असून मंत्रिमंडळातील माझे सहकारी त्याचे काटेकोरपणे पालन करत आहेत.
@narendramodi@Dev_Fadnavis
#SaveFuel #NationFirst #PublicTransport #NarendraModi
'कनेक्टिव्हिटी'ची नवी सुरुवात! वेगवान प्रवास, अत्याधुनिक सुविधा, जागतिक विक्रम आणि अर्थव्यवस्थेला चालना, मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण!
#Maharashtra#MissingLink