His condition is worsening, health is deteriorating rapidly as it is a 15th day of his hunger strike.
Government should look at it sympathetically. As they are protesting for the rightful things of students of this country. To ignore such voices isn’t the good in democracy.
A Ramon magsaysay awardee, educationist, innovator and activist @Wangchuk66 is an asset to the country.
Hope union govt will act soon.
मालवणला भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, ही या राज्याची बदनामी नाही का? तो एक भगतसिंह कोश्यारी म्हणून राज्यपाल होता. महात्मा फुलेंपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत त्यांनी जी वक्तव्ये केली, त्यांची बदनामी केली आणि तुम्ही त्याचे समर्थन करत होतात. ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट.
#SanjayRaut #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathiNews
मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतले भाषण कळलं नाही..
वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून का सुरू झाले
कोणासाठी हिंदी बोलत होता..
विधानसभेतील समोरचे आमदार मराठी..
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेत हिंदीत बोलतो कशासाठी कोणासाठी..
:- राजसाहेब ठाकरे
बोगद्याचं काम नीट झालं नाही म्हणलं की महाराष्ट्राचा अपमान होतो.
पुलवामात सैनिक कसे शहीद झाले विचारलं की देशाचा अपमान होतो.
अयोध्येत पैसे कोणी खाल्ले म्हणलं की हिंदू धर्माचा अपमान होतो.
अदानीलाच सगळी कंत्राटं का म्हणून प्रश्न विचारला की भारतीय उद्योग जगताचा अपमान होतो.
फडणवीस थेट मोदींच्या वाटेवर चालत आहेत. मुझे गाली दे दो लेकीन भारत माता को कुछ मत कहो टाईप्स.
पंतप्रधान देशाचा आणि मुख्यमंत्री राज्याचा मालक नसतो. दोघंही लोकांचे सेवक असतात.
आमच्या तिजोरीतून सदोष कामं करू नका हे सांगण्याचा करदात्यांना अधिकार असतो.
@Dev_Fadnavis जी
ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वापरून दुसऱ्यावर टीका केली, त्यांना आज स्वतःवर होणारी उत्स्फुर्त टीका देखील भाडोत्री लोकांची टीका वाटते ?
लोकशाहीत जनतेला टीका करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. अगदी काल परवा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा सरकारला फटकारले आहे.
मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खेळाडूवृत्तीने घेवून कामात सुधारणा करायची असते. विधानभवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात!
पण बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय!
@Dev_Fadnavis@BJP4India@INCIndia@INCMaharashtra
महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत
ज्जे बात!!
आता कंत्राटात पैसे खाऊन प्रकल्पांचा दर्जा न राखणाऱ्यांची खैर नाही!!
पेपरफुटीतल्या माफियांना तर हे विधान ऐकूनच घाम फुटला पाहिजे..देशभरात सगळ्या अटकेत महाराष्ट्र होता.
खरातसारख्या महाराष्ट्राचे नाव देशभर बदनाम करणाऱ्या ढोंगी बाबांनी तर आता आपला बोऱ्या बिस्तर आवरायलाच घ्यावा.
कोकण रेल्वे बांधायला घाबरणाऱ्यांचेही अत्यंत योग्य उदाहरण दिले मुख्यमंत्र्यांनी. सुरुवातीला दरडी कोसळत होत्या पण त्यातून आपण शिकत गेलो असं म्हणाले. त्यावेळीही अशा घटनेनंतर प्रश्न विचारले गेले..त्याच प्रश्नांना सरकारं प्रतिसाद देत गेली
कनेक्टिंग लिंक आपल्या सर्वांच्या पैशातून बांधली गेली आहे. ती आपल्या सर्वांची आहे. प्रत्येक प्रश्न या लिंकच्या सुरक्षित प्रवासासाठी.
गर्जा महाराष्ट्र माझा!!
भाजपचे एक आमदार विधानसभेत म्हणतात "कबुतरांच्या विष्ठे मुळे माझ्या आईचे निधन झाले आहे"
त्यावर स्वतःला मुनी म्हणवून घेणारा तोतया निलेश म्हणतो "आईच्या मृत्यूचा पुरावा द्या"
सतत मराठी विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपने आता या परप्रांतियांना आपल्या आईच्या मृत्यूचे पुरावे द्यावे. #कबुतर
देवेंद्र फडणवीस,
तुमच्या लबाड्या, भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि अपयशावर टीका म्हणजे महाराष्ट्रावर टीका नव्हे.
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र तर अजिबात नाही.
महाराष्ट्राचा आडोसा घेऊन स्वतःवरील टीका दडपण्याचा हा बुद्धीभेद बंद करा.
आणि सोडणार नाही म्हणजे नेमकं काय करणार?
प्रश्न विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, की टीका करणाऱ्यांना धमक्या देणार?
मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प
किंमत सुमारे 7,000 कोटी.
या प्रकल्पातील कंत्राटदार नवयुग इंजिनिअरिंग.
याच कंपनीने निवडणूक बाँडद्वारे भाजपला 55 कोटी (30 + 15 + 10 कोटी) दिले.
हा सगळा क्रम पाहिला की एक प्रश्न पडतो…
सरकारी कंत्राटे मिळण्याचा निकष गुणवत्ता आणि स्पर्धात्मक निविदा आहे, की सत्ताधारी पक्षाच्या तिजोरीत जमा होणारे कोट्यवधी रुपये?
देशाला उत्तर हवं आहे
कारण पारदर्शकतेची मागणी करणे हा विरोधकांचा नव्हे, तर प्रत्येक करदात्याचा अधिकार आहे.
एखाद्या कामात काही प्रॉब्लेम असले तर समजू शकतो. पण प्रत्येक प्रकल्पात त्रुटी कशा राहू शकतात?
आणि ही काय टूम लावली आहे की यावरून प्रश्न करू नये? लोकांच्या पैशाचा चुरा झाला की प्रश्न विचारणारच.
टक्केवारीला राजकारण समजणाऱ्या लोकांना जनतेचे प्रश्न उचलणे म्हणजे राजकारण वाटते.
‘बिनशर्त पाठिंबा’ खूप धोकादायक असतो.
माझा एक ‘अजेंडा’ राबवणारं सरकार आहे म्हणून त्याच्या बाकी चुकांना मी पाठीशी घालेन; हा विचार पूर्ण समाजाचा घात करणारा असतो.
सदसदविवेक बुद्धी प्रत्येकाला असते. ती गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का हा निर्णय ज्याचा त्याचा.
#GlobalPhenomenon
आपल्या डोळ्यासमोर अख्खा महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरला जातोय आणि तिकडे महाराष्ट्रातील
पुरुष - एक है तो सेफ है मध्ये रममाण
महिला - महिन्याला १५०० रुपये मध्ये आनंदी 🤑
नीतिमूल्ये हरवलेला समाज 😑
सुरुवातीच्या काही पावसानेच सरकारच्या 'Infra Man'चा फुगा फुटला..!
मिसिंग लिंक बंद...
लोहमार्ग बंद...
मुंबई-गोवा महामार्ग ठप्प...
मुंबईत इमारती कोसळतात, झाडे पडतात, मॅनहोलमध्ये पडून निष्पाप नागरिकांचा जीव जातो...
पुण्यात रस्त्यांमधून पाण्याचे फवारे उडतात...
हजारो कोटींच्या जाहिरातींमध्ये दिसणारा विकास पावसाच्या चार सरीही सहन करू शकत नसेल, तर तो विकास नाही, जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे.
#InfraDisasterMan
'मिसिंग लिंक'चे उद्घाटन १ मे २०२६ रोजी करण्यात आले.
सर्व “इन्फ्रा वॉचर्स” आणि भाजप म्हणजे विकास ह्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव... ह्या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? पैसा जनतेचा... काँट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच!
आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत.
की मग सेफ्टी चेक शिवाय उद्घाटन केले होते?
मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती.
जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना ह्या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते, ह्या रस्त्याचा ५० फूटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही. संपूर्ण रस्ता उंच-सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो.
भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंधे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला.