📍पुणे पोलिसांचा नवीन जावई शोध!
📍आंदोलनाला विध्यार्थी नेते, किंवा बाहेरच्या लोकांनी पाठिंबा देणे हा गुन्हा नक्की कोणत्या कायद्याने होतो याचे अधिकृत पुणे पोलिसांनी परिपत्रक काढून जाहीर करावे.
📍विद्यार्थ्यांना स्मशानभूमी जवळ आंदोलनाला जागा दिली, तिथं कुठलीच सोय नाही, आंदोलनाला बसताना ओळखपत्र मागणे हे कोणत्या लोकशाही च्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नियमात बसते हे पुणे पोलिसांनी जरा सांगावे.
📍 भारताच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना असेल जिथे एक सुशिक्षित वर्ग आंदोलनाला बसतोय आणि त्या आंदोलनाला बसताना ओळखपत्र मागत आहेत.
@CPPuneCity@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks@Jayant_R_Patil@MahebubShaikh20
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
📍 राज्यसेवा तसेच Combine जागावाढ आंदोलन.
📍उद्या कलेक्टर ऑफिस पुणे येथे मुलांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे त्यामुळे आता आता ही लढाई आता मुलांच्या हातात आहे की किती मोठ्या संख्येने जमा होतात ते.
📍शेवटी ही लढाई मुलांची आहे आणि मुलांनाच जास्तीत जास्त संख्येने पुढे होऊन लढावी लागणार आहे.
📍बाकी कोणी पुढारी आले किंवा नाही आले, कोणी पाठिंबा दिला किंवा नाही दिला, ही लढाई अतिशय उत्साहात आणि शरीरातील सर्व प्राण एकत्र करून लढावी लागणार आहे.
📍आंदोलनाला कलेक्टर ऑफिस लाच परवानगी देण्यामागे दुसरा हा पण उद्देश आहे की सदाशिव पेठेत जेवढी मुलं जमू शकतात तेवढ्या प्रमाणात कलेक्टर ऑफीस ला मुलं जाऊ शकणार नाही!(हा पोलीस प्रशासनाचा अंदाज असू शकतो)
📍उद्याचे आंदोलन हे ऐतिहासिक व्हावे यासाठी माझा जाहीर पाठिंबा असेलच तसेच ही लढाई मुलांच्या बाजूने जिंकू असा विश्वास पण आहेच.
भेटूया उद्या, कलेक्टर ऑफिस, पुणे याठिकाणी🙏
@PMCMCO@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@RRPSpeaks@PawarSpeaks@MahebubShaikh20@Jayant_R_Patil
📍कंबाईन जागा वाढ साठी आणि राज्यसेवा पुढे जावी यासाठी रुपाली ताई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे
📍आदरणीय ताईंना विनंती आहे की आंदोलनात पुढील तिन्ही मागण्यांचा समावेश करण्यात यावा
१) राज्यसेवा पुढे जावी
२) कंबाईन जागा वाढ
३) क्लर्क च्या मुलांना लवकरात लवकर जॉइनिंग द्यावी
📍ताई तुम्हीच नेतृत्व करावे ही तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची इच्छा आहे, तरच यामध्ये सरकार लक्ष घालून काही तरी तोडगा काढेल कारण तुम्ही सरकार मध्ये आहात.
#combinejagavadh
#rajysevapostpone
#clerkjoining
@mpsc_office@PawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@supriya_sule@RRPSpeaks@MahebubShaikh20
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेले मागणीपत्रातील जागा 2025 मध्ये वर्ग का केल्या.?
१७ फेब्रुवारी रोजी #MPSC E-news latter #MES २०२४ साठीचे जागा एका दिवसात १८ फेब्रुवारी रोजी #MES २०२५ साठी जातात.
याच्यामागे कोणती लॉबी आहे याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
राज्यसेवा परीक्षा 2024 साठी पाठवलेल्या उपशिक्षणाधिकारी आणि ADR (सहाय्यक निबंधक अधिकारी) या दोन्ही पदांची फाईल वित्त विभागाकडे मंजूरीसाठी गेल्या आहेत.
तरी या दोन्ही फाइल्सना तात्काळ मंजुरी देऊन या जागा MPSC कडे पाठवण्यात याव्यात.
सहायक कक्ष अधिकारी (ASO) पदांच्या 100% रिक्त जागा 2024 मधील परीक्षेत समाविष्ट झाल्या पाहिजेत.
GAD ने तातडीने ज्यादाच्या जागांचे मागणीपत्रक MPSC कडे पाठवावे.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
यंदा होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तूनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असेल. परंतु अनेक विद्यार्थी अजूनही 2025 च्या पॅटर्नबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यसेवा परीक्षेचा वस्तूनिष्ठ पॅटर्न तातडीने लागू न करता 2025 पासून लागू करावा या विद्यार्थ्यांच्या मागणीला शासनाने व आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2 अधिकच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आता संभ्रमावस्थेत अधिक वेळ न दवडता सर्वांनी नवीन पॅटर्न स्वीकारून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे योग्य. राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असून कुठलाही न्यूनगंड न बाळगता वर्णनात्मक पॅटर्नमध्ये देखील आपण आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवाल असा विश्वास आहे.
गेली काही दिवस राज्यसेवा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याचे प्रयत्न चालू असताना अनेक मुलांनी 2025 साठी जागा शिल्लक राहतील कि नाही अशी चिंता माझ्याकडे व्यक्त केली. त्यांना मी सांगू इच्छितो कि, वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या मुलांना “शेवटची संधी” चा तणाव काय असेल हा विचार केला तर आपणही माझ्या मागणीशी सहमत व्हाल. आणि 2025 च्या परीक्षेसाठीही पर्याप्त पदसंख्या असेल यासाठीही प्रयत्न केले जातील असा मी विश्वास देतो.
#MPSC
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
राज्यसेवा २०२४ परिक्षेची objective pattern ची मुख्य परिक्षा देण्याची शेवटची संधी असल्याने राज्य सरकारने रिक्त असणा-या सर्व संवर्गातील जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढून राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांना संधी ऊपलब्ध करून द्यावी. @Dev_Fadnavis@mpsc_office@Mpsc_Andolan
राज्यसेवा 2024 च्या जाहिराती मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सह सर्व रिक्त संवर्गाच्या जागा लवकरात लवकर पाठवून लाखो MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mieknathshinde
राज्यसेवा परीक्षांची तयारी करनाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जागा कमी असून यात वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचण लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले. या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis
राज्यसेवा 2024 च्या जाहिराती मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सह सर्व रिक्त संवर्गाच्या जागा लवकरात लवकर पाठवून लाखो MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mieknathshinde
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@BaliramDoleyINC