Mpsc मधील भ्रष्टाचाराचे सिंडिकेट उध्वस्त करण्याची शेवटची संधी.... या सिंडिकेट ने मागील पाच वर्षात तुफान कमाई केलेली आहे व भ्रष्टाचार केलेला आहे... सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला घोडा लावलेला आहे यांनी..यांना जागा दाखवायची असेल तर आंदोलनाला फुल सपोर्ट करा.
@RRPSpeaks
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता खा. सुप्रियाताई सुळे तसेच 10.30 वाजता काँग्रेसचे आ. विश्वजित कदम आंदोलनस्थळी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने मनापासून आभार!
#लढुया_आणि_जिंकूया
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCचे_भ्रष्ट_अध्यक्ष_भीमनवार
#राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
आ.रोहितदादा पवार यांनी कोपरगाव (अहिल्यानगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)मध्ये प्रवेश केला. आ. रोहितदादा पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एस. एम. जोशी पुलाजवळ रात्रीपासून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
MPSCच्या कारभारातील अनियमितता, पेपरफुटीच्या घटनांबाबत पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करावी, रखडलेल्या व रिक्त पदांची तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा व भरती प्रक्रियेतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने पाहून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा खंबीर पाठिंबा असून, त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस ठामपणे विद्यार्थ्यांच्या सोबत उभी आहे.
पुण्यात काल रात्रीपासून MPSC विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी सत्याग्रह करत आहेत.
पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी स्पष्ट आहे, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा.
आमदार रोहितदादा पवार आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष ठामपणे उभे राहत या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
काँग्रेस पक्षाचा या सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा असून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नाही. पारदर्शक MPSC साठी संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal@INCRojgar
#MPSC #MPSCStudents #विद्यार्थी #सत्याग्रह #Congress
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
पुण्यात सुरु असलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दारु पिऊन पत्रकाराला मारहाण आणि शिविगाळ करणारा तरुण हा एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता आणि त्याला मुद्दाम या आंदोलनात घुसवल्याची आमची शंका आहे. संबंधित तरुणाला तत्काळ अटक करावी, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडं केली असून त्याला ताब्यातही घेतल्याचं कळतंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसून अशा प्रकारे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या या विचारधारेचा आम्ही जाहीर निषेध करतो..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
रात्रीचे एक वाजले तरी विद्यार्थ्यांचा एल्गार थांबलेला नाही!
पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ MPSC विद्यार्थ्यांचा सत्याग्रह सुरू आहे. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची असून, या मागणीसाठी विद्यार्थी ठामपणे आंदोलन करत आहेत.
या लढ्यात , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे, आमदार रोहित दादा पवार यांच्यासह असंख्य विद्यार्थ्यांसोबत युवक काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी मध्यरात्रीही आंदोलनस्थळी ठामपणे उभे आहोत.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि त्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. त्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने संवाद साधून निर्णय घ्यावा.
रात्र कितीही झाली तरी विद्यार्थ्यांचा आवाज थांबणार नाही!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSC #MPSCStudents #Pune
@imshivrajmore@INCMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis@RRPSpeaks
MPSC चे विध्यार्थी, रोहित दादा, शिवराज मोरे हे रात्रभर आंदोलन करत आहेत.
मागण्या सोप्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आंदोलनात फूट पाडण्यामध्ये ताकत न लावता मागण्या सोडवण्यात ताकत लावावी.
गांधी जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना.
@RRPSpeaks@imshivrajmore@IYCMaha
रोहित दादा S.M जोशी पूल (पत्रकार भवन जवळ) अंदोलनाला बसले आहेत जोपर्यंत #MPSC अध्यक्षाचा राजीनामा होत नाही तोपर्यंत उठणार नाहीत तरी सर्वांनी सहभागी व्हावे.
विद्यार्थ्यासाठी कोणत्याहीत रात्री सरकारला भिडणारा महाराष्ट्रातील एकवेव नेता रोहीत पवार.
सत्याग्रह आंदोलन पुण्यात सुरू 🔥🔥🔥
गर्दी.....🔥🔥🔥🔥
#MPSC#Pune#आंदोलन@RRPSpeaks
MPSC ची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी हे सामान्य घरातून येतात. या विद्यार्थ्यांना स्वच्छ व पारदर्शक परीक्षा व्यवस्था मिळण्यासाठी MPSC सारख्या घटनात्मक संस्थेवर स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती बसणे आवश्यक आहे. त्यामुळेच MPSC चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा व्हायला हवा, हीच विद्यार्थ्यांची सुरुवातीपासूनची मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या मुख्य मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काहीही झालं तरी भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय विद्यार्थी स्वस्थ बसणार नाहीत आणि सरकारला विद्यार्थ्यांच्या या मागण्यांची दखल घ्यावीच लागेल.
#MPSC #विद्यार्थी #सत्याग्रह
@RRPSpeaks
आज राज्याच्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी MPSC च्या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. परंतु यंदाच्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना असंख्य आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला बिकट आर्थिक परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा व्यवस्थेतील अनिश्चितता, अशा प्रतिकूल परिस्थितीत हे विद्यार्थी अडकले आहेत.
त्यामुळे शासनाने सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI या संस्थांद्वारे MPSC च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या जागांमध्ये किमान तीनपट वाढ करून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला हवी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात तरी आर्थिक दिलासा मिळेल.
सरकारने तत्काळ याबाबत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis
#MPSC #StudentScholarship #SARTHI #BARTI #MAHAJYOTI #TRTI #StudentsRights