महाराष्ट्रातल्या श्री गणेश मूर्तिकार, कामगार व उद्योजकांचे काय? त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येत आहे. राज्यशासनाला याविषयी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याविषयी कोणताच मंत्री काहीच का बोलत नाही? यावरून श्री गणेश मूर्तिकार व कामगार तुमच्यासाठी दुर्लक्षित घटक आहे असेच दिसून येते.