आज औसा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांचे सोलापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माझ्यासमवेत आ. श्री. संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.
#ravindrachavan#abhimanyupawar#bhetghat#bjp
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा यज्ञाचा संकल्प’ उपक्रमांतर्गत आज औसा येथील विजय मंगल कार्यालयात ३५० महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिलाई मशीनच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे या बद्दल समाधान वाटत आहे.
MPSC परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, या विद्यार्थ्यांच्या भावनेची दखल घेत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत बैठक घेतली. आयोगाची स्वतःची यंत्रणा उभारल्याशिवाय ऑनलाईन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही असेही मा. मुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासित केले. याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार! यानुषंगाने माध्यमांशी संवाद साधला.
#mpsc #maharashtra #devendrafadnavis #exam
महाराष्ट्राचे लोकप्रिय,संवेदनशील मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना MPSC च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन बाबत भावना वेळोवेळी पोहचल्या आणि त्यावर आज मा. देवाभाऊंनी योग्य तो तोडगा काढला.
अभिमन्यू पवार साहेब हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात
MPSC विद्यार्थ्यांचे तारणहार मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रयत्नांना यश...!!
आजवर आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी जे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न मा. मुख्यमंत्रीमहोदय यांना मांडले ते सर्वच्या सर्व सकारात्मक पणे 100% स्ट्राईक रेट ने सोडवले.
शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला त्यावर नवा इतिहास लिहीता यावा यासाठी आम्ही हे निर्णय घेत आहोत. यावर्षी केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतीमध्ये 95 हजार कोटींची गुंतवणूक करत आहोत. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी
#DevendraFadnavis#EmpoweringFarmers#bjp#KarjMukti #शेतकरी
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.
#MPSC @mpsc_office
मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ कार्यभार सांभाळणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली प्रगतीची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहो आणि जनहिताच्या कार्यात त्यांना अखंड यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#Progress #TeamMaharashtra #Development #LeadershipMatters #Congratulations #BestWishes #DevendraFadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
आ अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले .
मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतील ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत सामूहिक ऑनलाईन पसायदानाला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक; लाखो भाविकांनी विश्वशांतीच्या प्रार्थनेत मिसळला स्वर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्वकल्याणाच्या संदेशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत आयोजित सामूहिक ऑनलाईन पसायदान पठणाला देश-विदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी (दि. १०) रात्री ९ वाजता भवानी पेठ येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मुक्कामस्थळ तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामस्थळी सामूहिक पसायदानाचे पठण करण्यात आले.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात “आता विश्वात्मके देवे…” या पसायदानाच्या मंगल स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. प्रत्यक्ष उपस्थित हजारो वारकरी तसेच डिजिटल माध्यमातून पुणे, महाराष्ट्र आणि देश-विदेशातील लाखो भाविकांनी विश्वशांती, मानवता आणि सर्वांच्या कल्याणासाठी एकत्रित प्रार्थना केली.
यावेळी मा. केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, मा. आमदार श्री. हेमंत रासने, मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भीमाले, मा. सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. उपआयुक्त श्री. माधव जगताप, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मा. विश्वस्त डॉ. श्री. भावार्थ देखणे, मा. पालखी प्रमुख श्री. राजेंद्र उमाप, मा. श्री. योगी निरंजननाथ, मा. श्री. चैतन्य लोंढे, मा. डॉ. श्रीमती रोहिणी पवार, मा. श्री. पुरुषोत्तम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
#पसायदान #PunePratham #Pasaydaan #MassRecietingRecord #PMCCare #PuneCityUpdate #PuneMayor @Dev_Fadnavis
समान नागरी कायद्याच्या दिशेने महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल!
आज महाराष्ट्राने समान नागरी कायद्याच्या - Uniform Civil Code दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. भारतीय जनता पक्षाने जनतेसमोर ठेवलेल्या वैचारिक वचनांपैकी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी आणि समान नागरी कायदा ही तीन प्रमुख आश्वासने होती. यापैकी दोन ऐतिहासिक निर्णय यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता समान नागरी कायद्याच्या दिशेनेही ठोस प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्व नागरिकांना समान न्याय, समान अधिकार आणि भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाने मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मा. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
ही समिती विविध विद्यमान कायदे, सामाजिक वास्तव आणि सर्व संबंधित घटकांच्या मतांचा सखोल अभ्यास करून पुढील सहा महिन्यांत शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे. समानतेच्या, न्यायाच्या आणि संविधानिक मूल्यांच्या दिशेने उचललेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!
#ConstitutionalValues #MaharashtraGovernment #ViksitMaharashtra #India #Governance #PublicPolicy #HistoricDecision
आज माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वादाचा स्वीकार केला.
यावेळी मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या शुभेच्छा आणि सदिच्छा मला काम करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत. आगामी काळात अधिक जोमाने जनहिताच्या कार्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.
#DevendraFadnavis #gratitude #abimanyupawar #birthdayspecial
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष काही विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी सातत्याने राजकारण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा स्वतःचे राजकीय करिअर घडविण्याची धडपड अधिक दिसून येते. मात्र आजचा विद्यार्थी अत्यंत जागरूक आहे. कोण मनापासून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आले आहे आणि कोण केवळ प्रसिद्धीसाठी धडपड करते, हे त्यांना चांगलेच कळते. महाविकास आघाडीच्या काळात MPSC परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले, अनेक निर्णयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. महायुती सरकारने ती घडी पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अचानक लागू करण्यात आलेल्या Descriptive Pattern ला देखील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.
माझी कार्यपद्धती पहिल्यापासून स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद, सोशल मीडियावरील दिखाऊ भूमिका, केवळ tweet करणे किंवा आंदोलनांना खतपाणी घालण्यापेक्षा मुख्यमंत्री, MPSC अध्यक्ष, सचिव आणि संबंधित विभागांशी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यावर माझा विश्वास आहे. काही जणांना प्रत्येक प्रश्नात कॅमेरे, ट्वीट आणि आंदोलन दिसते पण मला मात्र त्या प्रश्नामागे विद्यार्थ्यांचे भविष्य दिसते. म्हणूनच मी आजपर्यंत या विषयाचे राजकारण केले नाही आणि पुढेही करणार नाही. विद्यार्थी अनेकदा पुण्यात येण्याचा आग्रह करतात. पण केवळ फोटो, व्हिडिओ किंवा टाळ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणे माझ्या स्वभावात नाही. प्रश्न सुटणे महत्त्वाचे की प्रसिद्धी मिळणे, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा विषय आहे.
काहींना महाराष्ट्राच्या तरुणाईचा स्वयंघोषित मसीहा बनण्याची घाई आहे. त्यांना त्यांच्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा. माझा मार्ग मात्र एकच राहील; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट पाठपुरावा.
#mpsc
आज पुणे येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात UPSC, MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गौरव समारंभ पार पडला.
यावेळी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस भाषण करताना म्हणाले की, २०१८ मध्ये स्थापन झालेल्या ‘सारथी’च्या माध्यमातून आतापर्यंत २ लाखांहून अधिक युवक-युवतींना UPSC, MPSC, बँकिंग आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात सारथीला यश आले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शुल्क सवलत, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेद्वारे आर्थिक सहाय्य, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याजमुक्त कर्ज योजनांमुळे हजारो युवकांना उद्योजकतेची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या सर्व उपक्रमांमागे समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी देत स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा व्यापक दृष्टिकोन आहे.
मा. देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतून २५ जून २०१८ रोजी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी ‘सारथी’ ची स्थापना करण्यात आली. आज सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या विविध योजना राबवल्या जात असून हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला आहे. सारथीच्या साहाय्याने मराठा समाजातील हजारो तरुणांची अधिकारी पदावर निवड झाली आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्ताने सारथीची स्थापना आणि तिच्या यशस्वी वाटचालीसाठी मा.देवेंद्रजींच्या अमूल्य योगदानाची पुन्हा एकदा प्रचिती आली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, पुण्याच्या महापौर श्रीमती. मंजुषाताई नागपुरे, ‘सारथी’चे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
#Maharashtra #Sarthi
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अभिनंदन!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच विद्यार्थीहिताला प्राधान्य देत घेतलेले निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहेत. नुकतीच झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल 25 दिवसांच्या आत जाहीर करून आयोगाने वेगवान आणि कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. UPSC च्या धर्तीवर जलद निकाल जाहीर करण्याचा हा निर्णय स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.
यासोबतच, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नागरी सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय तसेच पूर्व परीक्षा वर्षातून 2-3 वेळा घेऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याच्या 2-3 संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय हे देखील स्वागतार्ह पाऊल आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेली अनेक दशके आपली गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत विद्यार्थीकेंद्रित, वेगवान आणि सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका निश्चितच अभिनंदनीय आहे.याबद्दल आयोगाचे अध्यक्ष , सर्व सदस्य, सचिव आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र