Dedicated to exploring and spreading happiness in the most remarkable way possible.Join the journey.#Astrophile😊🌱#Positivity#ExploreTheWorld🌍 महाराष्ट्र ❤️
ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा !🙇
✅ लढण्याची ,जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा मिळते ती इथूनच !.
छत्रपती शिवाजी महाराज ~अखंड स्फूर्तिदाता,शक्तीदाता ,चिरंतन प्रेरणास्त्रोत!.🙏 जयंतीदिनी महाराजांना मानाचा मुजरा आणि सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐#शिवराय#Shivjayanti
I visited the southernmost tip of India.
I stood at Indira Point. I walked under trees that have stood for centuries. I dove into coral reefs among the most vibrant on earth.
And I sat with the people who live there. Tribal communities, whose land is being taken away by violating the Forest Rights Act. Settlers, many of them former soldiers, placed on these islands by the Indian government, who aren’t getting fair compensation.
The Modi government and BJP tells you Great Nicobar Project is about defence. It is not.
Expand INS Baaz - we will back the government fully. The Navy has been asking for expansion for five years - it has been ignored.
They tell you it is about a transhipment port. It is not. India is already building one in Kerala, which is on the mainland.
What it actually is: 1.5 crore trees felled. Coral reefs erased from official maps. Soldiers and tribals displaced - so one businessman can build hotels and casinos on India’s most irreplaceable ecological land.
Every young Indian I have spoken to understands this. You know that no amount of profit is worth destroying what can never be recovered.
I stand for ecologically balanced development. These islands can be the most extraordinary sustainable destination the world has ever seen. That is the India worth fighting for.
#GreenOverGreed
#NicobarMatters
#WorldEnvironmentDay
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
आव्हानांच्या वादळातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद म्हणजे महिला.
जिद्द, संघर्ष, त्याग आणि धैर्याच्या बळावर प्रत्येक अडथळा आणि अडचणींवर मात करणाऱ्या महिलांच्या सामर्थ्य शक्तीला महिला दिनानिमित्त सलाम..🙏
जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! 🌼
#WomensDay2026#महिला_दिन
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला असून, त्यांनी सांगितले की, "अजित पवार मोजून ११ वेळा माझ्या घरी आले होते.
आजच हा विडिओ बाहेर आला.... यातच सगळं आलं.
या विडिओ मध्ये तटकरे, पटेल, भुजबळ यापैकी कोणीही दिसत नाहीये. म्हणजे या लोकांची इच्छा नव्हती वा दादांच्या दरबारी यांची किंमत नव्हती.
असो येणारा काळ मजेशीर आहे. आपण पाहत राहायचं.
याला फोड त्याला फोड.. इडी लाव सीबीआय लाव.. असले उद्योग आता तरी थांबवावेत.. आयुष्य एकदाच मिळतं.. ते ही आता भरवशाचं राहिलं नाही.. चार दिवस माणसांना आपल्या माणसात सुखाने राहू द्या.. प्लिज, महाराष्ट्राला महाराष्ट्र राहू द्या..❤️
#महाराष्ट्र
कफ,खोकला, ताप आणि संबधित तक्रारी झाल्याने 28 डिसेंबर रोजी या Air purifier चा वापर सुरू केला.
सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळे मध्ये 28 डिसेंबर ते 8 जानेवारी मध्ये पांढरा रंग असलेल्या purifier चा रंग किती बदलला आहे.
कोथरूड, पुणे सारख्या ठिकाणी ही परिस्थिती असेल तर काय म्हणावे? इथे AQI 200 ते 300 च्या दरम्यान असतो.
श्वासनलिका, फुफ्फुस, घसा, नाक संबधीत समस्या
एवढ्या प्रचंड प्रमाणात पुण्यात व महाराष्ट्रात सर्वत्र असून या वर लोक का बोलत नसावीत?
याचे दूरगामी दुष्परिणाम भयानक असून लहान मुल व वृद्ध यांना सर्वात जास्त त्रास होतो.
#पुणे #Pune #AQI #Kothrud #कोथरूड
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते.
- गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार!
- मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट.
- अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली.
- भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत.
- तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून?
- सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
- जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल.
सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का?
- वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार.
- आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल.
- एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे.
- देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?
- काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली?
- तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे.
- मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत.
- माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू.
- हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते.
- ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा.
- माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा.
- ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते.
- जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो.
- 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
जगभरात भारताची पहिली ओळख ही मुंबईच आहे पण येत्या काळात ती जपायची, वाढवायची असेल तर आपल्यापुढे फार मोठंमोठी चॅलेंजेस आहेत.
मुंबईवरचा “आर्थिक राजधानीचा” क्लेम येत्या काळात टिकवायचा असेल तर मराठी माणसांना उद्योगात यावचं लागेल.
निदान काही मुद्दयांवर ठामपणे एकत्र रहावचं लागेल.
१/३
आदरणीय मनोज दादा,
स्पर्धा परीक्षा जाहिराती वेळेवर येणं, जाहिरातीमध्ये न्याय्य जागा असणं, परीक्षा वेळेवर होणं, निकाल वेळेत लागणं, वेळेत जॉईनिंग मिळणं अशा आंदोलनांचं मूळ असलेल्या प्रश्नांना हात घाला..
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळं मुलं अभ्यास करणाऱ्या भागातील लोकांनाही नाहक त्रास होतो. नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची दिशा भरकटते, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊन भविष्य पणाला लागतं हाही भाग आहेच.
आपण या मुलांना परत रस्त्यावर यायची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
#mpsc #MPSCआंदोलन #competitive #exams #YOUTH #Students #YouthEmpowerment
राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोग नेहमी सुरवातीला उमेदवारांच्या 'तार्किक आणि रास्त' मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. मग त्या सर्व प्रकरणाचे राजकीयकरण होऊन, सरकारला निर्णय घ्यावा लागतो.
यंदाच्या राज्यसेवा जाहिरातीत केवळ 79 जागा काढणार्या सरकारला किमान संवेदनशीलता दाखवायला हरकत नाही.
@AdvAshokBNCP_SP मा.सर,PSI वयवाढ मुद्दा न्याय्य व बरोबरच आहे पण आत्ता या आंदोलनात सरकारला mpscकडे राज्यसेवेच्या जास्तीत जास्त जागा पाठवण्याची विनंती करावी.2026 राज्यसेवा परीक्षा फक्त 79 जागांसाठीच होत आहे.ही फार मोठी शोकांतिका आहे.79 जागांसाठी उमेदवार अंदाजे 3 लाख+.या मागण्याही मांडल्या पाहिजेत🙏
@RealBacchuKadu मा. बच्चू भाऊ, PSI वयवाढ मुद्दा बरोबरच आहे पण आत्ता या आंदोलनाबरोबरच सरकारला mpsc कडे राज्यसेवेच्या जास्तीत जास्त जागा पाठवण्याची विनंती करावी .
2026 राज्यसेवा परीक्षा फक्त 79 जागांसाठीच होत आहे... ही फार मोठी शोकांतिका आहे..आणि 79 जागांसाठी उमेदवार अंदाजे 3 लाख..😱😞#mpsc#psi
@RRPSpeaks मा. रोहित दादा, PSI वयवाढ मुद्दा बरोबरच आहे पण आत्ता या आंदोलनाबरोबरच सरकारला mpsc कडे राज्यसेवेच्या जास्तीत जास्त जागा पाठवण्याची विनंती करावी .
2026 राज्यसेवा परीक्षा फक्त 79 जागांसाठीच होत आहे... ही फार मोठी शोकांतिका आहे..आणि 79 जागांसाठी उमेदवार अंदाजे 3 लाख..#mpsc#psi
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही.
याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC