सततच्या नैसर्गिक आपत्ती ,शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती परंतु सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने २०१९ कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६ ,२०२६-२७ चे पिककर्ज भरण्याची घातलेली अट यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता.
राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना त्यांचे नेते , राजकिय पक्ष त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आ. रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन !
राजमाता जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवत होत्या.
जिजाऊ जयंतीच्या निमित्त अभिवादन !
स्व.सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी बीड जिल्हयात जन आक्रोश मोर्चामध्ये सर्व आमदार खासदार आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी पक्ष बाजुला ठेवून देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी एकत्र आले त्यांचे मनापासून आभार मानतो.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या एका निर्णयामुळे भारत आज मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून पाहिलं जातं. आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा कोहिनूर हिरा गमावला. अशाच उच्च शिक्षित देशाला पंतप्रधान भेटाव अशी ईश्वर चरणी प्रार्थना. भावपुर्ण श्रद्धांजली💐💐
शिवरायांच्या महाराष्ट्रात संगमनेर विधानसभा मतदारसंघात भरसभेत महिला लोकप्रतिनिधिवर अशिल भाषेत बोलणे. काळीमा फासणारी गोष्ट आहे. निवडणुक आयोग पोलिस प्रशासन यांनी कडक कारवाई करावी.या वक्तव्याचा जाहीर निषेध!
@rajivkumarec@AmitShah@mieknathshinde
भारताने अर्थव्यवस्थेचा एक पिलर गमावला तसेच नैसर्गिक आपत्तीत सामाजिक सेवा व आर्थिक हातभार लावणारे देवमाणूस रतन टाटा सर आपल्यातून निघून गेले. रतन टाटा सर युवा उद्योजकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते.
भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा सर 💐💐
श्री क्षेत्र नारायणगड येथे संघर्ष योद्धा मनोज दादा यांच्या उपस्थित दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यानिमित्त गडाचे मठाधिपती ह. भ. प गुरुवर्य प्रेम मूर्ती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शन खाली तयारी जोरात..
चलो नारायणगड! चलो नारायणगड!
आमचे दैवत श्री क्षेत्र नारायणगडचे मठाधिपती ह.भ.प गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या उपस्थित नारायणगड येथे 12 ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा पार पडणार आहे. तरी आपण दसरा मेळाव्याला उपस्थित राहावे.
@abpmajhatv पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्या नराधमाचा एन्काऊंटर केला असेल आम्ही समर्थन करतो.
परंतु कुणीतरी सरकारच जवळच महोरक्या असणारे वाचवण्यासाठी केला असेल ती चुकीचे गोष्ट आहे
सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार १३सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली.17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला.
खरीफ फसल बीमा 2023
कुछ किसानों को फसल क्लेम की जानकारी नहीं है तो कुछ 72 घंटे बाद क्लेम देते हैं। इसे खारिज कर दिया गया. जिन किसानों को फसल बीमा स्वीकृत किया गया है, उनके आधार पर सीधे उस मंडल के किसानों को फसल बीमा दिया जाए।
@narendramodi@ChouhanShivraj@dhananjay_munde
खरीप पीक विमा 2023
काही शेतकऱ्यांना पिकाचा क्लेम विषयी माहिती नसून काहींनी 72 तासाच्या नंतर क्लेम केला. तो नामंजूर झाला. पीक विमा मंजूर झालेले शेतकरी फक्त बोटावर मोजण्याइतके आहे. ज्यांना पीक विमा मंजूर झाला त्यांच्या आधारे त्या मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा.