@waglenikhil जी. डी. अग्रवाल यांचे ११ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन झाले. गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी त्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाच्या १११ व्या दिवशी ऋषिकेश येथील 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (एम्स) मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.