येरोळ पंचायत समिती गण ता.शिरूर अनंतपाळ जि.लातूर येथून माझ्या लहान भावाची पत्नी सौ.पूनम चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विजयी झाल्या आहेत.
हा विजय मी माझे नेते अजित दादांच्या चरणी अर्पण करतो. 🙏
कारखाना ते निळकंठेश्वर मंदिरादरम्यान दंडवत घालत नवसपूर्ती केली.
किल्लारी कारखाना सहकारातूनच पुनर्जीवित करण्याचा शब्द औसेकरांना दिलेला, तो सुरूही केला पण मृतावस्थेत गेलेल्या मशिनरीमुळे कारखान्याची अपेक्षेप्रमाणे शिस्त लागत नव्हती. 2025 च्या पहिल्या तिमाहीत कारखान्याची मशिनरी बदलण्याचे आणि क्षमतावाढीचे काम हाती घेतले. काम संथगतीने सुरु होते, फेब्रुवारी 2026 पूर्वी गाळप सुरु होणार नाही अशी परिस्थिती होती. निकराचे प्रयत्न तर सुरु होतेच पण त्यावेळी दैवी आशिर्वादाचीही नितांत गरज वाटत होती. अनेक प्रश्नांनी घेरलेले मन घेऊन श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी निळकंठेश्वर मंदिरात जाऊन साक्षात निळकंठेश्वरालाच साकडे घातले. 'कारखाना वेळेवर सुरु होऊ दे, कारखान्यातील साखरेचे पहिले पोते घेऊन कारखान्यापासून पायी दंडवत घालत तुझ्या दर्शनाला येईन' असा नवस बोलला. त्यानंतर निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने क्षमतावाढीच्या कामांना गती आली, भक्तिभावनेतून किल्लारी कारखान्याचे 'श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकार साखर कारखाना, किल्लारी' असे नामकरण करण्याचाही निर्णय घेतला.
किल्लारीचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वराने माझे, माझ्या शेतकरी बांधवांचे आणि किल्लारीकरांचे गाऱ्हाणे ऐकले, किल्लारी कारखान्याचा गळीत हंगाम व्यवस्थित सुरु झाला, साखर बाहेर पडली आणि 20 हजार + मेट्रिक टन उसाचे गाळपही पूर्ण झाले. त्यामुळे आज कारखाना ते निळकंठेश्वर मंदिरादरम्यान साष्टांग दंडवत घालत साखरेचे पहिले पोते निळकंठेश्वरचरणी अर्पण करून नवसपूर्ती केली. श्री निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने संपूर्ण गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पडेल याची खात्री आहे. ॐ नीलकंठाय नमः🔱
#Killari #SugarFactory #farmers #nilkantheshwar
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्याची सांगता झाल्यानंतर, त्यांना दिल्लीला निरोप देण्याचा सन्मान मला मुंबई विमानतळावर लाभला.
@narendramodi
मनःपूर्वक आभार 🙏
लाडक्या लेकीचं लग्न 24 मे रोजी विधिवत पार पडलं. सिक्कीमचे महामहीम राज्यपाल सन्माननीय श्री. @OmMathur_Raj जी, राजस्थानचे महामहीम राज्यपाल सन्माननीय श्री. हरीभाऊ बागडेजी, विधानपरिषद सभापती मा. प्रा. @RamShindeMLA जी, विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. @rahulnarwekar जी, माझे मार्गदर्शक तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. @AjitPawarSpeaks दादा, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री मा. श्री. @RamdasAthawale जी, केंद्रीय मंत्री मा. श्री. @mohol_murlidhar अण्णा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. @SunilTatkare जी, राज्याच्या मंत्रिमंडळातील सन्माननीय मंत्री सर्वश्री मा. श्री.
@cbawankule जी, मा. श्री. @ChDadaPatil दादा, मा. श्रीमती @Pankajamunde ताई, मा. श्री. @girishdmahajan भाऊ, मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज, मा. श्री. गणेशजी नाईक, मा. ॲड @ShelarAshish जी, मा. श्री. @JaykumarRawal जी, मा. श्री. संजयजी सावकारे, विधानपरिषद उपसभापती मा. श्रीमती नीलमताई गोऱ्हे, राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरीताई मिसाळ, मा. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, युवराज छत्रपती संभाजीराजे, विधानपरिषद भाजपा गटनेते मा. श्री. प्रविणजी दरेकर, सहकारमहर्षी मा. श्री. दिलीपरावजी देशमुख, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. पाशाभाई पटेल, खासदार सर्वश्री श्री. संजय उर्फ बंडू जी जाधव, श्री. श्रीरंगअप्पा बारणे, डॉ. शिवाजीरावजी काळगे, माजी मंत्री सर्वश्री मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील, मा. आ. श्री. विजयबापू शिवतारे, मा. आ. श्री. संभाजीरावजी पाटील निलंगेकर, मा. श्री. बसवराजजी पाटील, मा. श्री. मधुकररावजी चव्हाण, काँग्रेस नेते तथा माजी मंत्री मा. आ. श्री. विश्वजीतजी कदम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आ. श्री. मिलिंदजी नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आ. श्री रोहितजी पवार, प्रसिद्ध उद्योगपती श्री. अविनाशजी भोसले, युवा उद्योजक श्री अमितजी अविनाश भोसले, लातूर जिल्ह्यातील नेतेमंडळी सर्वश्री श्री. शिवाजीरावजी पाटील कव्हेकर, श्री. सुधाकरजी श्रृंगारे, श्री सुधाकरजी भालेराव, श्री. त्र्यंबकनाना भिसे, श्री वैजनाथदादा शिंदे, श्री. अशोकरावजी निलंगेकर, सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व श्री राहुलजी केंद्रे, विधिमंडळातील सर्वपक्षीय सहकारी मित्र, माजी खासदार, माजी आमदार, विविध पक्षांमधील मान्यवर नेते, राज्यभरातील आध्यात्मिक/सामाजिक /राजकीय/औद्योगिक क्षेत्रातील नामवंत, भाजपा परिवारातील जीवाभावाचे सहकारी, सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, औसा मतदारसंघातील नागरिक, मित्र परिवार, नातेवाईक व परिचित इत्यादींनी या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून पवार व जाधव परिवारांचा आनंद द्विगुणित केला, सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार.
पुणे जिल्ह्यात मागच्या 5-7 दिवसांपासून भरपूर पाऊस होता, विपरीत परिस्थितीतही हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी माझी अनेक जीवाभावाची माणसं राबत होती, त्यांचेही आभार. मुलीचं लग्न जन्मल्यापासून लग्न पार पडेपर्यंत फार थोडा अवधी मिळाला, त्यामुळे अनावधानाने जांच्यापर्यंत निमंत्रण पोहचू शकले नाही त्यांची तसेच उपस्थित मान्यवरांपैकी ज्यांचा नामोल्लेख सदरील पोस्टमध्ये करणं राहिलं असेल त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद 🙏
आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांची आज सहपरिवार भेट घेऊन 24 मे रोजी पुणे येथे पार पडणाऱ्या, माझी कन्या चि. सौ. कां. आकांक्षा व चि. शौनक जाधव यांच्या शुभविवाहाचे आग्रहाचे निमंत्रण त्यांना दिले.
@Dev_Fadnavis
जगाला समता व मानवतेचा संदेश देणारे जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आज लातूर येथील राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर कॉलेज दरम्यान भव्य शोभायात्रा संपन्न झाली. श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीद्वारे आयोजित या शोभा यात्रेमध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले. यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यूजी पवार यांच्यासह शोभायात्रेत सहभागी होऊन बसवण्णांना अभिवादन केले.
समता व विश्वबंधुत्वाची साद देऊन समाजाला एकत्र करणारे थोर संतपुरुष जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त शतकोटी प्रणाम!
बसवण्णा यांनी सांगितलेले विचार आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांचे जीवन व कार्य हे आपल्या सर्वांना कायमच प्रेरणा देणारे असून त्यांचे हे विचार आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे.
#महात्मा_बसवेश्वर_जयंती #महात्मा_बसवेश्वर #Maharastra #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #निलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा
जय बसवण्णा
निलंगा शहरात समतानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज निलंगानगरीतील महात्मा बसवेश्वर वाचनालय,बसव सृष्टी येथे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी बसवण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. बसवण्णांना मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्रीताई तेरणी पाटील, लातूर जिल्हा मजूर संस्थेचे संचालक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोदजी आर्य, शिवाजीरावजी रेशमे गुरुजी, भाजपा शहराध्यक्ष रवीजी फुलारी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष मनोजजी कोळ्ळे, बसव जयंती उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सोमनाथजी आग्रे, सचिव राजकुमारजी चिकराळे, अमोलजी आर्य, इंजिनिअर एम.के. कस्तुरे जी, युवराजजी बिराजदार, प्रकाशजी शेटकार, शंकरजी भुरके, प्रशांतजी सोरडे, वीरभद्रजी आग्रे, श्रीशैलजी बिराजदार आदींसह बसव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक सुधारणांचे आद्य प्रवर्तक, भेदविरहित आणि लोकशाही मूल्यांवर आधारित समाजाची पायाभरणी करणारे परिवर्तनावादी युगपुरुष, विश्ववंदनीय जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीदिनी भक्तिपूर्ण नमन. सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा🙏
सामाजिक क्रांतीचे उद्गाते,जगद्ज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माझ्या गावातील पुणेस्थित गावकऱ्यांचा स्नेह मेळावा आज हॉटेल रत्ना, पुणे येथे उत्साहात पार पडला.
आपुलकीने भरलेली ही भेट खूपच खास होती अनेक वर्षांनी भेटलेली चेहरे, गावच्या आठवणी, आणि एकत्रितपणे अनुभवलेले सुख-दुःख.
स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मनमोकळा संवाद साधला.ही भेट फक्त गप्पांची नव्हती, तर एकमेकांना समजून घेण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारी ठरली.
या स्नेह मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक बांधव व माझे मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
विठेवर उभी असलेली भक्तजनांची माऊली पंढरीच्या विठोबारायाचे आदरणीय अक्का यांच्या समवेत संपूर्ण कुटुंबासह दर्शन घेतले. मंदिरात विठूरायाची महापूजा करून माता रुक्मिणीचे दर्शन घेतले.
या प्रसंगी देवस्थानाचे सहअध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर बाबा यांची देखील भेट घेऊन दर्शन घेतले.
महाराष्ट्रातील तमाम जनतेची सुरक्षा, सुख-समृद्धी व शेतकरी बांधवांच्या भरभराटीचे दान यावेळी विठुरायाकडे मागितले.
#जयजयरामकृष्णहरी #श्रीविठ्ठलरुक्मिणी #पंढरपूरदर्शन #MahaPuja #Devotion #WarkariTradition #FaithAndHope #BhaktiVibes