“जर परमेश्वराकडे-निसर्गाकडे काजव्याच्या शेपटीत दिवा लावायला वेळ आहे, तर तुमच्या आयुष्यात उद्देश ठेवायलाही त्याच्याकडे वेळ आहे.”
रात्री अंधारात चमकणारा काजवा आपण पाहतो… इतका लहान जीव, पण त्याच्या शेपटीत प्रकाश आहे.
त्या छोट्या जीवाच्या आयुष्यात जर निसर्गाने इतकं सुंदर कार्य दिलं असेल, तर आपण, ज्यांना विचार करण्याची बुद्धी, स्वप्न पाहण्याची क्षमता आणि कृती करण्याची ताकद दिली आहे, तर आपण उद्देशाशिवाय कसे असू शकतो?
आपल्या आयुष्यात एक वेळ येते, जेव्हा आपण स्वतःलाच विचारतो,
“मी कोण आहे?”
“मी इथे का आहे?”
“माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे?”
कधी नोकरी मिळत नाही,
कधी नातेसंबंध तुटतात,
कधी प्रयत्न अपयशी ठरतात,
आणि आपण निष्कर्ष काढतो,
“बहुतेक माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही.”
पण मित्रांनो,
झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो. बी पेरल्या-पेरल्या लगेच झाडाची सावली किंवा फळ मिळत नाही.
काजवा दिवसा दिसतो का?
तो आहे तिथेच असतोच… पण त्याचा प्रकाश फक्त अंधारात दिसतो.
तसंच आपल्या आयुष्यात आहे.
तुमचं सामर्थ्य, तुमची ताकद, तुमची किंमत, ती संकटाच्या अंधारातच दिसते.
निसर्गाकडे पाहा,
प्रत्येक फुलाला रंग आहे,
प्रत्येक पक्ष्याकडे गाणं आहे,
प्रत्येक नदीला प्रवाह आहे.
कोणतीही गोष्ट निरर्थक नाही.
मग तुम्ही तरी विना उद्देशाचे का असाल?
आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो.
“तो डॉक्टर आहे, मी नाही.”
“ती श्रीमंत आहे, मी नाही.”
“त्याला प्रसिद्धी आहे, मला नाही.”
पण सूर्य आणि चंद्र दोघंही प्रकाश देतात. सूर्य दिवसा, चंद्र रात्री.
तुलना केल्याने उद्देश सापडत नाही. स्वतःला ओळखल्याने सापडतो.
आईलाही स्वतःची स्वप्नं असतात.
तिलाही शिकायचं असतं.
तिलाही जग पाहायचं असतं.
पण ती स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवते.
घराच्या प्रगतीसाठी काम करत असते.
रात्री थकलेली असली तरी हसते.
लोक म्हणतात,
“ती काहीच करत नाही. घरातच तर असते.”
पण तिचा उद्देश?
घर उभं ठेवणं.
तिचं नाव कुठे लिहिलं जात नाही…
पण तिच्या त्यागाशिवाय कोणाचं यश उभं राहत नाही.
उद्देश मोठ्या मंचावर नसतो.
तो अनेकदा स्वयंपाकघरात असतो.
तो रडणाऱ्या मुलाच्या डोक्यावरच्या हातात असतो.
आपण समजतो की उद्देश म्हणजे मोठं काहीतरी.
प्रसिद्धी, पैसा, कीर्ती.
नाही.
कधी कधी उद्देश म्हणजे
कुणाच्या आयुष्यात आशा बनणं.
जर आयुष्यात कधी दुःख आलंच नसतं, तर आनंदाची किंमत कळली असती का?
जर अपयश आलंच नसतं,
तर यशाची गोडी कळली असती का?
काजवा अंधारातच चमकतो.
तुमच्या आयुष्यातला अंधार म्हणजे
तुमच्या प्रकाशाची तयारी.
आता तुम्ही विचाराल उद्देश शोधायचा कसा?
तुम्हाला काय आवडतं?
कुठल्या कामात तुमचा वेळ कसा जातो कळत नाही?
कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही पैसे नसले तरी काम कराल?
तिथेच तुमचा उद्देश लपलेला असतो.
नक्कीच पैसा महत्त्वाचा आहे.
पण पैसा हा उद्देश नाही.
जर फक्त पैशासाठी काम केलं,
तर मन थकतं.
पण उद्देशासाठी काम केलं,
तर शरीर थकलं, तरी मन ताजं राहतं.
एक आई दिवस रात्र तुमच्यासाठी झटते.
एक बस कंडक्टर रोज हसत तिकीट देतो.
एक सफाई कामगार रोज शहर स्वच्छ ठेवतो.
एक शेतकरी उन्हात उभा राहून धान्य उगवतो.
त्यांचं नाव पेपरमध्ये येत नाही.
त्यांना टाळ्या मिळत नाहीत.
पण त्यांच्याशिवाय जग चालेल का?
म्हणूनच…
महान होणं म्हणजे प्रसिद्ध होणं नाही. महान होणं म्हणजे आवश्यक होणं.
आज समाज माणसाची किंमत त्याच्या पगारावर मोजतो.
पण एक बाप दिवसभर रिक्षा चालवतो आणि रात्री मुलाच्या फीची चिंता करत झोपतो.
त्याची किंमत काय?
पैशात मोजता येईल का?
त्याचा उद्देश —
“माझं मूल माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य जगावं.”
हा उद्देश करोडोंपेक्षा मोठा आहे.
कधी कधी आपण थकतो.
बसून राहतो.
स्वप्नं छोटी करतो.
पण लक्षात ठेवा,
देवाने तुम्हाला श्वास दिला आहे म्हणजे खूप काम बाकी आहे.
तुमचं पान अजून पूर्ण लिहिलं गेलेलं नाही.
प्रत्येक माणूस एक पुस्तक आहे.
काही पानं दुःखाची,
काही पानं आनंदाची.
पण शेवटचं पान अजून रिकामं आहे.
ते तुम्ही ठरवणार,
ते प्रेरणादायी असणार की अपूर्ण?
जर काजवा स्वतःवर शंका घेत बसला असता,
“माझा प्रकाश कोण पाहणार?”
तर तो चमकला नसता.
तुम्हीही विचार करत बसलात,
“लोक काय म्हणतील?”
तर तुम्ही कधीच उभे राहणार नाही.
या जगात अब्जावधी लोक आहेत.
पण तुमच्यासारखा कोणी नाही.
तुमचा आवाज वेगळा.
तुमचा विचार वेगळा.
तुमचं हसू वेगळं.
देवाने तुम्हाला कॉपी करून बनवलं नाही.
मग उद्देशाशिवाय कसा बनवेल?
तुम्ही काही चुकून जन्माला आलेले नाही.
तुम्ही निरर्थक नाहीत.
तुम्ही अतिरिक्त नाहीत.
तुम्ही आवश्यक आहात.
तुमचा प्रकाश आवश्यक आहे.
तुमचा आवाज आवश्यक आहे.
अंधार कितीही असू दे…
चमकणं थांबवू नका.
पण अंधाराला हरवायला फक्त सूर्याचीच गरज नसते.
एक छोटासा प्रकाशही पुरेसा असतो.
तुम्ही तो प्रकाश बना.
थोडं स्वतःसाठी ही जग मित्रा...
महिन्याच्या पहिल्या तारखेला SMS येतो- Salary credited.
क्षणभर छाती भरून येते…
आणि लगेच दुसरा विचार येतो
“चला, आता सुरू होईल गणितं.”
घरभाडं.
लाईट बिल.
पाणी.
EMI.
शाळेची फी.
उधारी.
कोणाचं तरी आजारपण.
कोणाचं तरी लग्न.
आणि शेवटी हातात काय उरतं?
एक सुप्त आशा “ठीक आहे, या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात स्वतःसाठी काहीतरी घेईन.”
जगात खूप जणांचं हे फक्त आर्थिक वास्तवच नाहीये, तर ते आयुष्याचं वास्तवदेखील आहे.
कुणी आपल्याला शिकवलंच नाही स्वतःसाठी जगायला.
लहानपणापासून शिकवलं गेलं,
“आधी घर.”
“आधी कुटुंब.”
“आधी जबाबदाऱ्या.”
कोणी कधीच शिकवलं नाही,
“आधी तू.”
हळूहळू आपण इतके जबाबदार होतो की स्वतःची इच्छा असणं हे ही अपराध वाटायला लागतं.
नवीन कपडे दुकानात दिसतात…
हात पुढे जातो…आणि लगेच मन मागे ओढतं,
“नको… गरज नाही.”
आपण सगळे जबाबदार आहोत.
आपण कुटुंबासाठी उभं राहतो, जबाबदाऱ्या पेलतो, तडजोडी करतो.
पण हळूहळू आपण आपल्या स्वतःला ‘पुढच्या महिन्यावर’ ढकलत राहतो.
स्वतःचे शौक – पुढच्या महिन्यात.
स्वतःची विश्रांती – पुढच्या महिन्यात.
स्वतःची स्वप्नं – पुढच्या महिन्यात.
आणि तो “पुढचा महिना” कधीच येत नाही.
“या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात.” हे वाक्य भले आपल्याला आशा देतं-आपल्याला जिवंत ठेवतं, पण आयुष्य हळूहळू चोरून नेतं. आपण जगतो, पण आपल्याला जिवंत असल्यासारखं वाटत नाही.
कारण पुढच्या महिन्यातही
तेच बिल्स असतात.
तेच EMI असतात.
तेच ताण असतात.
जेव्हा माणूस स्वतःला विसरतो, तेव्हा तो हळूहळू आतून थकायला लागतो. मानसिक थकवा ही एक न बोललेली वेदना असते. पैसे कमी असले तरी माणूस जगतो. पण आशा कमी झाल्या, तर जगणं अवघड होतं.
एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस घ्या. सकाळी उठतो, धावपळ, ऑफिस, ट्रॅफिक, बॉसचा ताण, कामाचा प्रेशर.
महिन्याच्या शेवटी पगार येतो… पण तो खात्यात जास्त वेळ थांबतच नाही. जसं पाणी गळक्या भांड्यातून निघून जातं, तसाच पगार जबाबदाऱ्यांमधून निघून जातो.
आणि आपण स्वतःला समजावत राहतो, “अजून थोडं कष्ट करूया… नंतर बघू.”
पण नंतरचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांचं मोठं व्हर्जन असतं.
खरी समस्या पैशांची नाही.
समस्या कमी पगाराची नाही,
समस्या खर्चांचीही नाही.
समस्या आहे – स्वतःला कायम शेवटी ठेवण्याची.
आपण सगळ्यांना प्राधान्य देतो, आई-वडील, मुलं, जोडीदार, समाज, लोक काय म्हणतील…
पण “मी” हा शब्द आपल्या यादीत शेवटचा असतो, कधी कधी तर यादीतच नसतो.
स्वतःला विसरणं म्हणजे बलिदान नाही, ती हळूहळू केलेली आत्महत्या आहे. हे कटू आहे, पण खरं आहे.
दर महिन्याला स्वतःची इच्छा मारणं,
दर वर्षी स्वतःचं स्वप्न पुढे ढकलणं,
दर दिवस स्वतःला शेवटी ठेवणं,
हा त्याग नाही, हे हळूहळू स्वतःला मिटवणं आहे.
एक बाप.
मुलांसाठी सगळं करतो. स्वतः २-४ जोडी कपडे वर्षानुवर्षं वापरतो. तीच-तीच चप्पल-बूट वापरतो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो.
एक दिवस त्याचा जीव जातो. मुलं रडतात, घर कोसळतं,
आणि बापाच्या पश्चात बापाचे फाटके कपडे, तुटलेली चप्पल बघून सगळ्यांना जाणवतं,
“हा माणूस स्वतःसाठी कधीच जगलाच नाही.”
तो हिरो होता. पण स्वतःच्या आयुष्यात तो फक्त नोकर राहिला.
तुम्ही स्वतःसाठी जगलात,
तर तुम्ही कुटुंबावर प्रेम कमी करत नाही. उलट, आनंदी माणूसच इतरांना आनंद देऊ शकतो.
रिकाम्या माणसाकडून
कुणालाच भरभरून काही मिळत नाही.
रिकाम्या बॅटरीची पॉवरबँक कोणतंही उपकरण चार्ज करू शकत नाही.
तसाच थकलेला, तुटलेला माणूस
कुणालाही पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही.
स्वतःसाठी काही करणं म्हणजे काही स्वार्थ नाहीय.
आपल्या समाजात एक गैरसमज आहे,
“स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा.”
नाही.
स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वतःला जपणं.
पगार आला की थोडा खर्च स्वतःवर करायला शिका. तो खर्च भौतिक असायलाच हवा असं नाही.
कधी स्वतःला वेळ द्या. कधी विश्रांती. कधी फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा.
पण स्वतःला सांगा.
“मी ही महत्त्वाचा आहे.”
स्वतःचा आनंद पुढे ढकलू नका
नवं फोन, कपडे, सहल…
सगळं लगेच शक्य नसेल.
पण आनंदाला कायम ‘नंतर’वर ठेवू नका. स्वप्नं जिवंत ठेवा. स्वप्नं म्हणजे लक्झरी नाही. ती मानसिक गरज आहे.
लक्षात ठेवा…
जर आयुष्य सतत “पुढच्या महिन्यावर” ढकलत राहाल,
तर एक दिवस असा येईल
की आयुष्यच मागे वळून बोलेल,
“आता तुझा इथला वेळ संपला, इतकी वर्षं कुणासाठी जगलास…
आणि स्वतःसाठी किती जगलास?”
हे प्रश्न येण्याआधी थांबा.
तो दिवस येऊ देऊ नका.
जबाबदाऱ्या नक्की सांभाळा.
नक्की कष्ट करा.
पण स्वतःला विसरू नका.
कारण… घर चालवणारा माणूसही
कधी कधी स्वतःच्या आयुष्याचा मालक असायला हवा.
कारण,
पगार संपला तरी चालेल,
पण तुम्ही आतून संपता कामा नये.
तारीख ३ फेब्रुवारी वार मंगळवार वेळ संध्याकाळी ५ ची ! ह्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी घाटात "प्रोपेलिन गॅस" चा टँकर उलटला आणि एकच खळबळ उडाली !
महामार्ग पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली आणि इथूनच मोठ्या ट्रॅफिक जॅम ला सुरुवात झाली !
"टँकर तर उलटला आहे काय त्याला ? क्रेन ने उचला आणि मोकळा करा रस्ता" ! अशा प्रतिक्रिया येत होत्या पण अश्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना विषयाचे गांभीर्य माहिती नव्हते ! तेच सांगण्याचा हा खटाटोप !
सामान्य लोकांना रस्त्यावरून फिरणारे पेट्रोल टँकर माहिती आहेत परंतु परवा जो उलटला तो प्रोपेलिन गॅस टँकर होता !
पेट्रोल चा टँकर उलटला तर तो क्लिअर करणे तुलनेने सोपे असते कारण पेट्रोल डोळ्यांना दिसते
पेट्रोल जास्त पसरत नाही आणि पेट्रोल चां वास देखील येतो ! परंतु प्रोपेलिन मध्ये पूर्ण उलटे गणित असते ! प्रोपेलिन गॅस दिसत नाही तो बेमालूमपणे हवेत मिक्स होतो ! मिक्स झालेला हा गॅस वाऱ्या सोबत सर्वदूर पसरतो ! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या गॅस ला "वास" नसतो !
थोडक्यात प्रोपेलिन गॅस लीक म्हणजे "अदृश्य बॉम्ब" असतो !!
स्वेटर घालून खुर्ची वर बसल्यावर आणि अचानक उठल्यावर छोटासा स्टॅटिक करंट चां शॉक आपण प्रत्येकानेच खाल्ला असेल !
बास एवढा छोटासा स्टॅटिक चार्ज देखील प्रोपेलिन गॅस चा भडका उडवायला खूप झाला !
त्यामुळेच घटनास्थळी क्रेन उपलब्ध असताना देखील क्रेन ने टँकर हटवला गेला नव्हता !
कारण जरा जरी घर्षण झाले असते तर होत्याचे नव्हते झाले असते !
आता authoritis कडे एकच पर्याय होता तो म्हणजे नवीन गॅस टँकर आणणे, पडलेल्या गॅस टँकर ची गळती बंद करणे आणि त्यात उरलेला गॅस ट्रान्स्फर करणे ! आता जो रिकामा गॅस टँकर पाहिजे तो पण प्रोपोलिन गॅस नेऊ शकणारा म्हणजेच तसे मानके असणारा पाहिजे होता त्यानंतर ज्या कंपनीचे ते टँकर होते तेथील एक्सपर्ट देखील बोलवावे लागले !
मधल्या काळात ट्रॅफिक ची पर्यायी व्यवस्था करावी लागली , बघ्यांची गर्दी बाजूला करून सेफ झोन बनवावा लागला, फायर ब्रिगेड ला स्टॅण्डबाय वर ठेवावे लागले ! NDRF ची टीम बोलवावी लागली !
रात्र झाल्याने धोका आणखीन वाढला !
बोगद्याच्या शेजारी.टँकर असल्याने बोगदाच एक मोठा सिलेंडर बनला ! कारण बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला जरी एखादा स्पार्क झाला असता तरी गॅस ने पेट घेतला असता आणि किमान ५ किलोमीटर चां परिसर धमाक्याने उडाला असता!
एवढा भयंकर डिझास्टर टाळण्यासाठी प्रशासनाणे रात्रीचा दिवस केला आणि महत्प्रयासाने गॅस ट्रान्स्फर केला !
जरी सगळे काम झाले असले तरी अजून एक धोका.होता तो म्हणजे एवढ्या वेळात हवेत मिक्स झालेला.गॅस ! त्यामुळे गॅस चे मीटर घेऊन हवेची गुणवत्ता सतत तपासावी लागली !
समजा घाई घाईत ट्रॅफिक मोकळे केले असते तर वातावरणात जमा झालेला गॅस पेटून पुन्हा स्फोट होण्याची शक्यता होती !
त्यामुळे जेव्हा काही तासांनी हवेची गुणवत्ता सुधारली तेव्हाच टँकर उचलण्यात आला आणि मग रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला गेला!
ट्रॅफिक जॅम मोठा झाला त्याची बातमी झाली पण देवा भाऊंच्या प्रशासनाने अथक परिश्रमातून खूप मोठी दुर्घटना टाळली ही खरी मोठी बातमी आहे !
ह्या भीम पराक्रमासाठी महामार्ग पोलिस, NDRF चे जवान, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, गॅस कंपनीचे कर्मचारी, क्रेन वाले, फायर फायटर, अशा अनेक निनावी कर्मचाऱ्यांचे ,माणसांचे आभार मानावे तेव्हढे कमीच !🙏
नवीन वर्षात --
1) प्रचंड स्वार्थी व्हा..
2) लोकांना फाट्यावर मारायला शिका.
3) प्रत्येक वेळी प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे उपलब्ध राहू नका.
4) कोणाच्याही फार माग लागू नका. Stop chasing people.
5)कर भला तो हो भला हा खूप मोठा scam आहे..
हे जेवढ्या लवकर तुम्ही follow कराल तेवढ्या लवकर तुम्ही सुखी व्हाल 👍