महाराष्ट्रात संवेदनशील गावांमध्ये महामानवांचे स्मारकवजा काहीतरी रातोरात उभे केले जाते आणि त्यावर प्रशासनही मूग गिळून बसते. अशी प्रकरणे तुमच्या गावी होत आहेत का?
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवरील हल्ल्याचा तीव्र निषेध! गृहमंत्र्यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून आरोपींना जेरबंद करावे, असे आवाहन मी एक शिक्षक म्हणून करत आहे!
#CMMaharahtra
महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्य आणि विचाराचा आवाका समजायला जी बुद्धी आणि परिपक्वता लागते, ती आजही दिसत नाही. त्यांच्या पायधूळ म्हणूनची पात्रता मिळवली तरी खूप झाले.
जेव्हा 'महात्मा' या लोकांनी दिलेल्या पदवीचा - व्यक्तित्वाचा अपमान होतो तेव्हा तो अपमान त्या महामानवांपेक्षा त्या लोकांचाच असतो. अशी भाषणे ऐकताना टाळ्या वाजवणाऱ्या भक्तांची ही कीव वाटू लागते!