@nareshmhaske धन्यवाद साहेब! 🙏
कोकणचे हक्काचे टर्मिनस होणे ही कोकणच्या विकासासाठी अत्यावश्यक बाब आहे, आपण हा विषय लवकरच मार्गी लावाल, याचा आम्हाला विश्वास आहे.
मुंबई ते कोकण धर्मवीर एक्सप्रेस सुरू व्हावी ही आमची जिव्हाळ्याची मागणी आहे. आपल्या प्रयत्नांतून हे स्वप्नही साकार होईल, हीच अपेक्षा!
दरवर्षी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील लाखो कोकणवासी गणेशोत्सवात आपल्या गावी गणरायाच्या स्वागतासाठी जात असतात. मात्र रेल्वे आरक्षणासाठी होणारी प्रचंड गर्दी, अपुऱ्या गाड्या, वाढती प्रतीक्षा यादी आणि सामान्य प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी या गंभीर बाबी लक्षात घेऊन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या आणि त्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी मी रेल्वे प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत.
रेल्वे आरक्षणासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, अपुऱ्या गाड्यांमुळे प्रतीक्षा यादी वाढते आणि अनेकांना आपल्या गावाकडे जाण्याची संधी मिळत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन मी रेल्वे प्रशासनाकडे ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात किमान दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्याची मागणी केली आहे. केवळ खिडक्या वाढवून उपयोग होणार नाही तर यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, तसेच तिकीट दलाल आणि गैरप्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी RPF आणि स्थानिक पोलिसांची विशेष यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशीही भूमिका मी मांडली.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेवरील प्रचंड ताण पाहता ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ सुरू करण्याची आग्रही मागणी मी केली आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल. आज मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असल्यामुळे सामान्य प्रवाशांना आरक्षण मिळणं अत्यंत कठीण झालं आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे.
याचबरोबर कोकणातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही मी सातत्याने प्रयत्नशील आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी दुसऱ्या टप्प्याचं काम अद्याप रखडलेलं आहे. प्रशासकीय इमारत, गाड्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था, अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि स्टॅबलिंग लाईन यांसारख्या सुविधा तातडीने उभारण्यात याव्यात, अशी माझी स्पष्ट मागणी आहे. भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा ‘पीएम गति शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ आणि ‘अमृत भारत स्टेशन योजना’ यामध्ये समावेश करण्यात यावा, अशीही मी मागणी केली आहे.
तसेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी स्थानकातून दररोज जवळपास ₹४ लाख ८८ हजारांहून अधिक उत्पन्न मिळतं आणि त्यातील बहुतांश उत्पन्न लांब पल्ल्याच्या प्रवासातून येतं. त्यामुळे या स्थानकाचं व्यावसायिक आणि प्रवासीदृष्ट्या असलेलं महत्त्व स्पष्ट होतं. म्हणूनच राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ, वंदे भारत, गोवा संपर्क क्रांती आणि इतर महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी मी रेल्वे प्रशासनाकडे केली.
कोकणातील चाकरमान्यांना त्यांच्या हक्काचा सन्मान, सुलभ प्रवास आणि आधुनिक रेल्वे सुविधा मिळाल्याच पाहिजेत. यासाठी त्या प्रत्येक कोकणवासीयाचा आवाज बनून मी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.
@AshwiniVaishnaw
#nareshmhaske #KonkanRailway #Ganeshotsav2026 #DharmaveerAnandDigheExpress #Thane #Mumbai #Konkan #RailwayReservation #Savantwadi #IndianRailways
#मंत्रिमंडळनिर्णय
कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. #मधुदंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis होते.
या मागणीला बळ देण्यासाठी कोकणवासीयांचा वतीने ठामपणे उभे राहणारे आमचे नेते पालकमंत्री श्री @NiteshNRane साहेब,आमदार श्री @dvkesarkar साहेब,मा.पालकमंत्री श्री @RaviDadaChavan साहेबांचे आम्हा कोकणवासीयांतर्फे जाहीर आभार.
कोकणच्या हक्काचे टर्मिनस पूर्ण होणार यात तिळमात्र शंका नाही.
सावंतवाडी स्थानकाला 'कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते' यांचे नाव देण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर मोहोर उमटवल्याबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेबांचे माननीय उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde साहेबांचे समस्त कोकणवासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार!
@NiteshNRane@CMOMaharashtra@Dev_Fadnavis चार दिवसांपूर्वी आमचे पदाधिकारी श्री.विनोद नाईक यांनी मंत्रालयात मंत्री राणे साहेबांची भेट घेतल्यानंतर अवघ्या आठवड्यात ही बातमी येणे,हा योगायोग नाही तर साहेबांच्या कार्याचा वेग आहे.मा. नितेश राणे साहेबांचे खूप खूप आभार!
पुढे देखील असाच प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पाठिंबा असावा ही विनंती
@NiteshNRane@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सावंतवाडी टर्मिनसचे नामकरण आता 'कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते' यांच्या नावाने होणार! 🚉✨
हा निर्णय केवळ पालकमंत्री मा. श्री. नितेश राणे साहेब यांच्यामुळेच शक्य झाला.
(१/२)
@satyajeettambe@Matapune कोकणातील महत्वाचे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस गेले दशकभर प्रलंबित आहे.
मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाताना होणारा त्रास हा सर्वश्रुत आहे. कोकणातील हे रेल्वे टर्मिनस झाल्यास कोकणवासीयांना दिलासा मिळेल.
01139/01140 Nagpur-Madgaon (Goa) bi-weekly special train-
Has been regularised from 16/05/2026 onwards.
It will run as a bi-weekly regular mail express train.
New train number- 11203/11204 exp.
Composition- 24 ICF coaches.
Halts in Mumbai division- Igatpuri, Kalyan, Panvel, Roha.
@marinebharat@KonkanRailway@marinebharat
I see you don't really grasp the actual demands regarding the Konkan Railway.
Fair enough.
Moving on, have you seen this picture before?
मराठी अभ्यास केंद्र आयोजित महाराष्ट्र रेल्वे परिषद'
सोमवार, दि. ०४ मे, २०२६ | संध्याकाळी ५ वा.
स्थळ : निवारा वृद्धाश्रम (पुणे इन्फर्म असायलम), ९६, ठोसर पागा, नवी पेठ, सदाशिव पेठ, पुण
संपर्क : प्रथमेश पाटील (७३०४२२८२५२)