@RRPSpeaks शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. मराठी माध्यमाच्या मुलांना सरकारने न्याय द्यावा.
@RRPSpeaks राज्यात शिक्षकांची ६७००० पदे रिक्त असून तीन-तीन वर्गांना एकच शिक्षक शिकवत आहे. अशा परिस्थितीत #शिक्षकभरती करून शिक्षणव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असताना राज्य सरकार मात्र शिक्षकभरतीबाबत #serious दिसत नाही. रिक्त पदांच्या ८०% म्हणजेच ५५ हजार जागा भरण्यास वित्त विभागाची मान्यता आहे.
mpsc कनिष्ठ लिपिक पदाची मुख्य परीक्षा दिनांक आणि वक्फ बोर्डाच्या अधिक्षक/जिल्हा वक्फ अधिकारी,कनिष्ठ लिपिक या परीक्षा एकाच दिवशी 17/12/2023 रोजी आयोजित असल्यामुळे महाराष्टातील विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या परीक्षांच्या तारखेत बदल करावा.
@NANA_PATOLE Z P chya शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी भाषा टिकली पाहिजे, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे हे सोडून शासनाने zp chya शाळा बंद करण्याचा जो घाट घातला आहे, तो शासन निर्णय मागे घ्यावा
@SanjivBhorPatil आगामी शिक्षक भरतीत खुल्या व EWS प्रवर्गातील उमेदवारांवरील अन्याय दूर करण्यासाठी रोस्टरची सखोल तपासणी व दुरुस्ती झाली पाहिजे.रोस्टर दुरुस्तीशिवाय शिक्षक भरती झाल्यास खुल्या प्रवर्गातील हजारो अभियोग्यता धारकांचे आयुष्य उध्वस्त होईल. म्हणूनच या अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा