शास्त्रज्ञांचा एक गुण फार भारी असतो, तो म्हणजे जाणीव असणं की:
“आपल्याला खूप काही कळालं आहे, तरीही अजून असं बरंच काही आहे ज्यातलं आपल्याला काहीच माहिती नाहीये.”
..आपल्याला पण असा विचार करणं जमू शकलं ना तर आपण खूप काही शिकत राहू आणि तेवढेच जास्त जमिनीशी जोडलेले पण राहू!🎯🎯
बऱ्याच वेळेस आपण आपल्या सगळ्या समस्या स्वतःच सोडवायच्या अट्टहासामुळे स्वतःचं नुकसान करत असतो.. आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा वाढवून घेत असतो.
आपल्या जवळचे लोक मदत करायला तयार असताना ती मागणं किंवा घेणं हे काही चुकीचं नाही!❤️
#जगणं#MentalHealthMatters