सुरेश कलमाडी साहेब गेल्याची बातमी समजली आणि मला मोठा धक्का बसला.माझ्या आयुष्यात या माणसाचं मोठं महत्व होत आणि कायम राहील.आदरणीय पवार साहेबांच्याकडे मला घेऊन जाणारे कलमाडी साहेबच होते.
आज ते आपल्यात नाहीत.त्यांचे माझ्यावर कायमचे उपकार आहेत,ही जाण मात्र माझ्या मनात सदैव राहील.
सुरेश कलमाडी साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
TMC hospital in Kausa Mumbra. And police is accusing him . @mieknathshinde sir she has made the whole staff miserable in your name.
They’re ready to talk on record. The video is clear enough for anyone who can see and hear.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@TMCaTweetAway
महाविकास आघाडीतील सहकारी नेत्यांसह राज्यपाल भवनमध्ये आज राज्यपाल महामहिम सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
जनसुरक्षा कायद्याला राज्यातील नागरिकांचा असणारा विरोध, त्याच्या विरोधात आलेल्या हरकती आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पत्रामध्ये दर्शवलेल्या असहमतीच्या कारणांचा विचार करता या विधेयकावर स्वाक्षरी करू नये,अशी मागणी यावेळी राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली.आम्हाला आशा आहे की,राज्यपाल महोदय या निवेदनाला गंभीरपणे घेतील..!
🎬 अभिनंदन! मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ यांना २०२५ चा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे. हा सन्मान त्यांच्या कलेला मिळालेली योग्य दाद आहे. 🙏
#AshokSaraf#PadmaShri2025#MarathiCinema
या सरकारमध्ये पैसे कशात खाल्ले जातील, याची काहीच शाश्वती राहिलेली नाही. आता तर रक्तपेढ्यांमध्येही ३५ लाखांचा भाव लावलाय. मंगळवारी मिटींग आहे; जे अर्ज निकाली काढलेत अन् जे अर्ज नाकारलेत , असे अर्ज पुनःदाखल करून त्यांना वैद्यतेचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे. ही बाब गंभीर आहे. अरे, सगळ्यात खा... पण, रक्तात खाऊ नका !
मा.मिलिंदजी म्हैसकर साहेब,
अध्यक्ष राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई तथा अप्पर मुख्य सचिव आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
विषय: आर.टी.आय अंतर्गत प्राप्त माहिती मधून श्री साई रक्त केंद्र गारगोटी ता भुदरगड जि कोल्हापूर यांना नवीन रक्तपेढी सुरू करण्यासाठी दिलेले नियमबाह्य पद्धतीने (राजकीय हस्तशेप व आर्थिक देवाणघेवान) ना हरकत प्रमाणपत्रचा तात्काळ खुलासा करणे बाबत....
मा.महोदय,
आम्हाला राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आर.टी.आय अंतर्गत माहिती
मधून माणिकराज बहुउद्देशीय समाजसेवा संस्था गारगोटी ता. भुदरगड जि.कोल्हापूर यांच्या श्री साई रक्त केंद्र भुदरगड यांना तांत्रिक समितीने नाकारले होते. त्यानंतर आपल्या अध्यक्षतेखाली झालेल्या 50 व्या नियमक मंडळाच्या बैठकीमध्येही वरील प्रस्ताव नाकारण्यात आला होता.
परंतु त्यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे आरोग्य मंत्री महोदयांच्या फोनवरून आदेश दिल्यामुळे आपण तो तांत्रिक समितीच्या व नियमक मंडळाच्या शिफारस नसताना देखील पूर्णतः नियमबाह्य पद्धतीने राजकीय दबावापोटी व मंत्री कार्यालयातील अधिकारी व संबंधित कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून हा अर्ज मंजूर केल्याचे सिद्ध होते. या प्रकारे इतिहासात पहिल्यांदाच या पद्धतीने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे समजते. यामुळे रक्तदानासारखे पवित्र कार्य बदनाम होत असून, या सामाजिक कार्यावर समाजाचा विश्वास कमी झाला तर आरोग्य क्षेत्रालाच याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते.
त्यामुळे समाजमाध्यमावर जाहीररित्या हा खुलासा मी करण्यापूर्वी आपल्याकडून या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी व तो अहवाल मिळावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणास ही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
तसेच नियोजित 51 वी नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये विशेषकरून यापूर्वी 50 व्या बैठकी नियमक मंडळाने नाकारलेले काही ठराविकच प्रस्ताव राजकीय दबावातून, मंत्री कार्यालयातील अधिकारी व संबंधित कार्यालयातील अधिकारी यांच्या आर्थिक संगममताने आपल्याकडे प्रस्तावित केले असल्यास ते अर्ज कोणत्या नियमाआधारे परत नियम मंडळाकडे पाठवत आहेत, याचीही आपण गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करणार याचा आपल्याकडून तात्काळ खुलासा करावा.
ग्रामपंचायत शिंगणापूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांनी ठराव केला आहे की, अल्पसंख्यांक मतदारांची नोंदणीच होऊ द्यायची नाही अन् झाली और संपूर्ण गावाने ऑब्जेक्शन घ्यायचे ! आता जर आपण दलित, आदिव्सी, अल्पसंख्यांक आणि ओबीसी या सगळ्यांनाच मतदानापासून वंचित ठेवायला लागलो तर या देशात लोकशाही कशी नांदेल? त्यामुळे पोलिसांनी त्वरीत दखल घेऊन हा ठराव करणाऱ्यांविरूद्ध द्वेषप्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.
#kolhapur
💪आमचे आधारस्तंभ 💪
सन्मा.आ. व माजी गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपला प्रेम स्नेह आशीर्वाद व मार्गदर्शन असेच लाभो हीच ईश्वरीय चर्णी प्रार्थना 🙏
#साहेब_शतकवीर_व्हा#godfather@Awhadspeaks@samant_ruta
भोपाल में बीजेपी नेता और उसका नाबालिक बेटा ईवीएम के साथ खेल रहें हैं।
भोपाल में भाजपा के जिला पंचायत सदस्य विनय मेहर ने नाबालिग बेटे से डलवाया वोट। वोट डालते वक्त का विनय मेहर ने वीडियो भी बनाया। वीडियो फेसबुक पर विनय मेहर ने किया पोस्ट।
क्या कोई कार्रवाई होगी?