जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना 2023-24 (सर्वसाधारण) जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. श्री. अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यामध्ये विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांना नादुरुस्त रोहित्र देण्याचे प्रमाण वाढले होते, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. याचं बरोबर पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी देखील समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे, असेही सुचविले.
सामाजिक न्याय विभागात अंतर्गत मंजूर असलेल्या विकास कामांमध्ये स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार राजेशजी टोपे, आमदार नारायणजी कुचे, आमदार कैलासजी गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, पोलीस अधीक्षक जालना यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
#जिल्हा #नियोजन #समिती #बैठक #भोकरदन #जाफ्राबाद #जिल्हाधिकारी #कार्यालय #जालना #Jalna #Meeting
लोकमान्य टिळक यांनी आपल्या लिखाणातून सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा मांडल्या. वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्या विचारांनी प्रभावित होऊन असंख्य तरुणांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. त्यांचे विचार तरुणांना आजही प्रेरणा देत आहेत आणि निरंतर देत राहतील.
महान समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीदिनी त्रिवार वंदन!
#लोकमान्य #टिळक #पुण्यतिथी #अभिवादन #LokmanyaTilak
शहापूर येथे समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना क्रेन कोसळून काही कामगार���ंचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली! जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना!
#शहापूर #समृद्धी #महामार्ग #क्रेन #दुर्घटना #Shahapur #Crane #Accident
राष्ट्रवादीच्या श्री. योगेश लोखंडे यांचा भाजपात प्रवेश !
भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. योगेश लोखंडे यांनी केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री. रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी श्री. लोखंडे यांचे पक्षामध्ये स्वागत करून पक्���ावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी मा.जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, रमेश मुरकुटे आणि शेख कौसर यांची उपस्थिती होती.
#पक्षप्रवेश #BJP #भोकरदन
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra
कु. आर्वीचा सुखद स्वागत आणि भारावून टाकाणारी आपुलकी !
मतदार संघात आज जाफ्राबाद दौऱ्यावर असताना जाफ्राबाद येथील माझे सहकारी मित्र निलेश जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. जाधव यांची कन्या कु. आर्वी हिने स्वतःच्या हाताने तयार केलेले शुभेच्छापत्र देऊन माझे स्वागत केले. तिचे हे आगळे-वेगळे स्वागत पाहून अतिशय आनंद झाला.
आज कु.आर्व��� हिने स्वतःच्या हाताने बनवलेले शुभेच्छापत्र भेट दिले ते मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. तिच्या या अनोख���या भेटवस्तूमुळे ती किती व कसा कल्पक विचार करते? याची जाणीव मला झाली.
मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आर्वीसारख्या अत्यंत हुशार व तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी काय करू शकतो? ते आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत असतात? त्यांना आपल्यात रोल मॉडेल दिसू शकतो? याचीही जाणीव झाली. कु.आर्वी हिच्या या अस्मरणीय भेटीबद्दल तिचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
#आगळे_वेगळे #स्वागत #��ौतुक #गाठीभेटी #BJP #भोकरदन #मतदारसंघ
श्री. बद्रीनाथ मारोती पठाडे यांची भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !
आपल्या नेतृत्वात ��ालना जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक भक्कम होईल, असा विश्वास आहे. संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने, सर्वतोपरी आणि खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आणि आघाडीवर असू !
#जालना #जिल्हाध्यक्ष #नियुक्ती #भाजपा #BJP #Jalna #बद्रीनाथ #पठाडे
देश में आर्थिक विकास और ऊर्जा स्थिरता को बढ़ावा देते हुए जून के महीने में कोयला उत्पादन में वृद्धि हुई है।
जून'23 में कोयला उत्पादन 8.51% की वृद्धि के साथ बढ़कर 73.91 MT हो गया, जो जून'22 में 67.36 MT से उल्लेखनीय वृद्धि है।
@narendramodi@JoshiPralhad@PMOIndia@CoalMinistry
समाजातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, भेदभाव यांवर आपल्या अभंगातून प्रहार करणारे संत सावता माळी महाराजांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ! महाराजांनी समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला. तसेच आपल्या अभंगातून समाजप्रबोधनाच�� शिकवण दिली. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
#संत #सावतामाळी #महाराज #पुण्यतिथी #विनम्र #अभिवादन #SavataMaliMaharaj
उत्तुंग भरारी चंद्राकडे !
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) 'चांद्रयान-३' चे प्रक्षेपण यशस्वी करून नवा इतिहास घडवला आहे. आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित करून सुवर्ण दिवस नोंदवला आहे.
'इस्रो' च्या संपूर्ण टीमला मनःपूर��वक शुभेच्छा !
#चांद्रयान३ #उड्डाण #Chandrayaan3 #ISRO
@isro