सचिव - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,
संचालक - म.रा. सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ मुंबई.
अध्यक्ष - जय जगन्नाथ मल्टीस्टेट कॉ.क्रेडिट.सोसायटी #India#INC
मा. मल्लिकार्जुन खर्गे जी, मा. राहुल गांधी जी, मा. रमेश चेन्नीथला जी, मा. हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.
आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मानासह मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पणाने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
पक्षाच्या मूल्याधिष्ठित विचारधारेसाठी, कामगार, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी मी सतत कार्यरत राहीन. आपल्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
काँग्रेस बोलू, काँग्रेस आणू!
आपला,
संजय रामचंद्र खाडे
सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@IYC@INCIndia@RahulGandhi@INCHarshsapkal@kcvenugopalmp@kharge@chennithala@priyankagandhi@NANA_PATOLE@PSDhanorkar@VijayWadettiwar
#ThankYou
#धन्यवाद
#आभार
📍गांधी भवन | मुंबई
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राज्य नेतृत्वामार्फत ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत माझ्यावर अमरावती जिल्हा ग्रामीण भागाचा निरीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक मा. श्री. आफताफ अहमद, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कमिटीचे निरीक्षक मा. श्री. भाई जगताप तसेच निरीक्षक श्री. संजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी वेळेत विविध महत्त्वपूर्ण बैठका घेत, संघटनात्मक बळकटीसाठी आवश्यक अशा शिफारसींसह एक वर्षाचा सविस्तर कार्य अहवाल तयार केला.
आज मुंबई येथील गांधी भवन येथे पार पडलेल्या बैठकीत माननीय प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्यासमोर सदर अहवाल सादर केला. यावेळी अहवालातील मुद्द्यांवर सखोल चर्चा देखील करण्यात आली.
माननीय प्रदेशाध्यक्षांनी अल्पावधीत प्रभावी अहवाल सादर केल्याबद्दल माझ्या कामाचे कौतुक केले. तसेच भविष्यातही अशाच पद्धतीने कार्य करत राज्यातील काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
@INCHarshsapkal
#काँग्रेस
📍 टिळक भवन | मुंबई
हर्षवर्धन सपकाळ साहेबांकडून कौतुकाची पाठीवर थाप...
संघटन सृजन कार्यक्रमाअंतर्गत मुंबई येथील टिळक भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवत संघटन सृजन कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्हा ग्रामीणसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.
एका सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यासाठी ही केवळ कौतुकाची थाप नसून, पक्षासाठी केलेल्या कामाची आणि निष्ठेची मिळालेली महत्त्वपूर्ण दखल आहे. हा विश्वास आगामी काळात अधिक जोमाने आणि निष्ठेने काम करण्याची नवी ऊर्जा देणारा आहे.
टिळक भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत राज्यभरातील काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच काँग्रेसची विचारधारा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनात्मक बदल, पक्षाच्या रचनेत आवश्यक सुधारणा आणि कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने “संघटन सृजन” हा विशेष कार्यक्रम संपूर्ण एप्रिल महिनाभर राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, सक्रिय पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवणे आणि जनतेशी पक्षाचे नाते अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बैठकीदरम्यान पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्द्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
या बैठकीत ज्येष्ठ नेते मा. श्री. बाळासाहेब थोरात साहेब, आमदार श्री. विश्वजित कदम साहेब, खासदार कु. प्रणितीताई शिंदे आणि खासदार श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्यासोबत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली.
काँग्रेस बोलू… काँग्रेस आणू..!
#congress
" अचलपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाची तयारी पूर्ण जोमात सुरू आहे".
चांदूरबाजार आणि अचलपूर तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांसाठीची पूर्वतयारी करण्यासाठी निरीक्षकांच्या भूमिकेत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कार्यकर्त्यांनी उत्साहाने हजेरी लावली आणि भरघोस प्रतिसाद दिला. काँग्रेसचे सर्व नेते आणि पदाधिकारी यात सहभागी झाले होते. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.
- संजय खाडे, प्रभारी, अचलपूर विधानसभा मतदारसंघ
@INCHarshsapkal@INCIndia@IYC@RahulGandhi
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ,आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आहे आणि नव्या उंचीवर पोहोचत आहे.
आपल्याला सदैव निरोगी आनंदी आयुष्य लाभो ही प्रार्थना.
संजय खाडे
सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal@INCIndia@RahulGandhi@imshivrajmore@IYC
आज, 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून वेकोलि खाण परिसरातील गावांतील रस्त्यांच्या खराब अवस्थेसह इतर ज्वलंत समस्यांविरोधात जोरदार विराट चक्काजाम आंदोलन यशस्वीपणे पार पडले. हे आंदोलन साडेतीन तास चालले. अखेर, वेकोलि अधिकाऱ्यांनी भेट देऊन रस्ते आणि इतर समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे ठोस आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात गावकरी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रचंड संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व सहभागींचे तीव्र आभार! जर वेकोलिने पुन्हा मागण्यांकडे कानाडोळा केला, तर यापेक्षा भयंकर आणि व्यापक आंदोलन उभे करू! आमचा लढा थांबणार नाही!
#वणी
@INCHarshsapkal@imshivrajmore@INCIndia@IYC@IYC@RahulGandhi
"देशाने हसत हसत नाकारलेला राहुल हाच तो आहे जो शांतपणे भारताला एकत्र करत राहिला!"
प्रिय राहुल,
@RahulGandhi
दिल्लीच्या या उष्ण दुपारी, जेव्हा ढग येऊन छतावर गुडघ्यावर बसले आहेत आणि खिडकीतून बाहेर डोकावणारे आकाश एखाद्या दुःखी कवीसारखे शांत आहे - मी तुला पत्र लिहित आहे. राहुल, तू खूप चांगले लढलास. हे पत्र फक्त अभिनंदन नाही, तर तुला मिळालेले प्रेम आहे, जे अनेकदा तुझ्या शांत चेहऱ्याने आणि थकलेल्या खांद्यांसोबत चालले आहे.
तुझ्याकडे पाहून मला नेहमीच असे वाटले आहे की राजकारणाच्या या गोंगाटाच्या बाजारात, एक माणूस अजूनही त्याच्या आईच्या डोळ्यांनी राजकारण करू इच्छितो - ज्यात दुःख, संयम आणि थकलेले हास्य आहे, जे सर्व काही सहन करूनही तुटलेले नाही.
तुझ्या नावात तो विराम आहे जो इतिहासात अनेकदा आढळतो. तू जालियनवाला बागेची उरलेली राख आहेस, जी विझली आहे, परंतु त्याची उष्णता अजूनही कोणाच्या तरी डोळ्यात अश्रूंच्या स्वरूपात येते. तू कदाचित क्रांती नाहीस, पण तू निश्चितच क्रांतीची वाट पाहणारा एक जुना वाक्य आहेस, जो लोकांना अजूनही वाचायचा आहे... फक्त हळूहळू.
लोक तुला 'पप्पू' म्हणतात, आणि तू हसत पुढे जातोस. मला वाटतं तुझा सर्वात मोठा गुन्हा हा आहे की तू या आवाजात गप्प राहिलास आणि या विषातही माणूस राहिलास. जेव्हा गर्दीने तुझ्या वडिलांच्या ओरडांची पुनरावृत्ती केली, जेव्हा तुझ्या आजीचा मृतदेह राजकारणाच्या छातीवर भोसकला गेला - तेव्हाही तू कोणाचा द्वेष केला नाहीस. मला माहित नाही की सत्तेच्या शर्यतीत हा गुण आहे की दोष... पण हा निश्चितच मानवतेच्या पानांमध्ये एक दुर्मिळ अध्याय आहे.
राहुल, जेव्हा तू भारताला एकत्र करण्यासाठी निघालास, तेव्हा तुझ्या पावलांचा आवाज त्यांनाही ऐकू येतो ज्यांच्याकडे बूट नाहीत आणि जमीन नाही. आणि जेव्हा तू थांबतोस तेव्हा तेही थांबतात, असा विचार करून की कदाचित कोणीतरी असा असेल जो फक्त पुढे जाण्यासाठी नाही तर एकत्र चालण्यासाठी आला आहे.
तुमच्याकडे पाहून अनेकदा असे वाटते की गांधी अजूनही जिवंत आहेत - विसरलेल्या पिशवीत ठेवलेल्या चष्म्यासारखे, ज्यांचे दर्शन अजूनही स्पष्ट आहे, परंतु ते पाहणारे लोक अस्पष्ट झाले आहेत.
राहुल, तुमच्यासाठी सत्ता सिंहासन नाही, कदाचित ती एक तुटलेली वचन आहे, जी तुम्ही पूर्ण करू इच्छिता. आणि म्हणूनच तुमचा प्रत्येक पराभव आमच्या आत्म्याचा विजय आहे. कारण जेव्हा तुम्हाला शिवीगाळ केली जाते तेव्हा आम्हाला खात्री असते की तुम्ही योग्य मार्गावर आहात.
तुमचा मार्ग खूप कठीण आहे, कारण तो 'हृदय जिंकण्याचा' मार्ग आहे आणि या युगात लोक निवडणुका जिंकतात - अजेंडा विकून - सत्य नाही.
पण मला माहित आहे, जेव्हा सूर्य शाईसारखा मावळतो, तेव्हा काही लोक भिंतींवर कविता लिहितात आणि तुम्ही तेच आहात, राहुल - एक कविता - जो या व्यवस्थेच्या भिंतीवर अजूनही जिवंत आहे.
मी लढल्याबद्दल तुमचे अभिनंदन करत नाही - परंतु तुम्ही अजूनही तिथे आहात याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. कारण तुमच्या उपस्थितीने, आशा अजूनही श्वास घेते.
पत्रे लिहिणारा मुलगा.
चाय, प्रेम आणि राजकारण.
@chayisquerajnit ह्यांच्या पोस्ट चा मराठी अनुवाद.
निवडणूक आयोगाला नेमकी कशाची भीती वाटते?
लोकशाही बळकट होण्यासाठी निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या पाहिजे. पण देशातील निवडणुकांमध्ये मतचोरी होत आहे, याविरोधात आज इंडिया आघाडीने आक्रमक आंदोलन केले.
हे आंदोलन म्हणजे मतदारांच्या मतदानाचा अधिकार शाबुत रहावा म्हणून होते. पण जेव्हा निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही तेव्हा ते पळवाटा शोधत आहे हे स्पष्ट झालं.
आज जरी विरोधकांना ताब्यात घेऊन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला असला तरी विरोधक थांबणार नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही लढाई सुरूच राहणार.
रवीश कुमार यांचा हा एपिसोड प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवा. 🔥
ही केवळ पत्रकारिता नाही —
ही सडलेल्या व्यवस्थेच्या थोबडावरचा आरसा आहे.
ऐका. शेअर करा. समजून घ्या.
राहुल गॉंधी जी का ये वीडियो देश के प्रत्येक नागरिक तक पँहुचना चाहिये, राहुल जी चुनाव आयोग की एकपक्षीय मदद का ख़ुलासा कर रहे हैं, चुनाव आयोग को सामने आकर राहुल जी जो कह रहे हैं उसका जवाब देना चाहिये, राहुल जी ये बातें सुबूत के साथ कह रहे हैं, चुनाव आयोग अब आप वोटचोरी को और नहीं छुपा सकते।
@RahulGandhi
चुनाव आयोग मुझसे हलफनामा मांगता है. कहता है मुझे शपथ लेनी होगी. मैंने संसद में संविधान की शपथ ली है
आज जब देश की जनता हमारे डेटा को लेकर सवाल पूछ रही है तो चुनाव आयोग ने वेबसाइट ही बंद कर दी
चुनाव आयोग जानता है कि जनता उनसे सवाल पूछने लगी तो उनका पूरा ढांचा ढह जाएगा
@RahulGandhi
🔥🔥🔥🔥
कालच्या पत्रकार परिषद ला समजावून सांगण्यासाठी RG चा अजून एक विडिओ आलाय.
सर्वांनी पहा. तुम्हाला समजून जाईल की ECI वोट चोरी कस करतंय ते.
भारतीय म्हणून जास्तीत जास्त शेअर करा 🙏🏻
@RahulGandhi एक सच्चे देशभक्त 🇮🇳
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांमध्ये मागिल 5 वर्षात वाढले नाहीत इतके मतदार केवळ 5 महिन्यांत वाढले. लोकसभा निवडणुकीनंतर 5 महिन्यांत महाराष्ट्रात 40 लाख मतदार वाढले. तसेच संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदान मोठ्या प्रमाणावर वाढून 1 कोटी मतदार वाढले. काही भागांमध्ये तर नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची संख्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त होती.
- लोकसभा विरोधी पक्षनेते @RahulGandhi जी