Every completed project has a story behind it: challenges, tight deadlines, problem-solving, and a lot of teamwork.
Last month, we celebrated the teams behind Royal Wiseborn and Inverted Energy for successfully seeing their projects through.
Well done, team!
#TeamIndictrans
Shantanu Deshpande has entered into niche space where he guides in Marathi in the context of corporate, startup culture thru reels. I just love that how he is making content in Marathi. his content is really helpful for tier 2,3 college students
We can confirm that we don't wish to add Gautam Gambhir to our coaching staff. He clearly has talent, though. To take those Indian players and deliver those results in Ireland takes truly remarkable gifts.
तुकाराम महाराज हे फार गरीब कुटुंबातून होते असं नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये सावकारी होती त्यांच्या घरी अनेक कर्ज खताची कागदपत्र होती. एकदा डोंगरावर चिंतन करताना तुकारामांना साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं. त्या साक्षात्कारानंतर त्यांनी डोंगरावरून खाली येऊन आपल्या बंधूंशी चर्चा केली आणि चर्चा करून आपल्याकडील कर्ज खतं घेतली आणि ती इंद्रायणीत बुडवली. कर्ज खत बुडवून त्यांनी लोकांना कर्जमुक्त केलं. आपल्याकडून कोणाची फसवणूक किंवा नाडवणूक होता कामा नये तरच आपल्याला समाजाला काही सांगण्याचा अधिकार असतो अशी त्यांची धारणा असावी. गरिबाकडून व्याज वसूल करणे हेही शोषण आहे म्हणून त्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्र बुडवली. असंख्य लोकांना कर्जातून मुक्त केलं. यावरून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रणेते हे संत तुकारामांना म्हणता येईल. त्यांचा हा विद्रोही विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
"भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" हा तुकाराम महाराजांचा बाणा घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजल्या गांजल्यांना सहकार्य करताना नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचा तुकाराम महाराजांचा संदेश आजच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. तुकाराम महाराजांनी कर्मकांड, ढोंगीपणा, जातीभेद, सत्तेचा अहंकार यावर कठोर प्रहार केले हे विसरता कामा नये.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दारं खुली केली, संत तुकारामांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला आणि गांधर्व परंपरेने कलेचं लोकशाहीकरण केलं या तिन्ही परंपरांचा समान धागा हा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवलं. आज त्यांच्या जयंती, पुण्यतिथी वा वर्धापनदिनी साजरा करताना आपण त्यांच्या विचारावर चालण्याचा निर्धार केला पाहिजे. महाराष्ट्राची खरी ओळख मंदिराच्या कळसात नव्हे तर ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे अशी माझी धारणा आहे.
मला आनंद आहे की आज तुमच्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिलीत. कधीतरी वेळ काढून गांधर्व महाविद्यालय आणि या क्षेत्रात इथे चाललेलं संत विद्यापीठाचे काम हे मी अधिक गांभीर्याने बघू इच्छितो. कृपया कधीतरी वेळ काढून या ठिकाणी मला सहभागी होण्याची संधी द्या. मी त्या खोलात जाऊन अधिक यासंबंधीची माझी वैचारिक धारणा मजबूत करायला त्याची उपयुक्तता होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत !